वसंत स्मृती महर्षी दयानंद फाऊंडेशन आयएएस अकादमीच्या सुसज्ज ग्रंथालयात यूपीएससी प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी करण्यासाठी सर्व विषयांची सुमारे एक लाखांहून अधिक पुस्तके आहेत. तसेच प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी यूपीएससी २०१३ प्रीलिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल अथवा ज्या उमेदवारांनी यूपीएससी, एमपीएससी मुख्य परीक्षा आधी दिली असेल, अशा सर्व परीक्षार्थीना ग्रंथालय आणि प्रशिक्षण सुविधा विनामूल्य उपलब्ध होतील. ज्या उमेदवारांनी याआधी यूपीएससी, एमपीएससी किंवा अन्य स्पर्धा परीक्षा दिली नसेल त्यांनाही स्पर्धा परीक्षांची विनामूल्य तयारी करण्याची संधी उपलब्ध आहे. ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना घरी घेऊन वाचायला मिळू शकतात, त्यासाठी त्यांना सुरक्षित ठेव म्हणून काही रक्कम भरावी लागेल आणि ही ठेव नंतर त्यांना परत मिळेल. या संस्थेत परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सदस्य शुल्क आकारले जात नाही. प्रशासकीय सेवांसोबत बँकिंग (आयबीपीएस) एसएससी, सीमाशुल्क, आयकर, सीबीआय, रेल्वे, संरक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सीए, एमबीए, या स्पर्धा परीक्षांची तयारी विनामूल्य करता येईल.
तसेच स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या ज्या गुणी विद्यार्थ्यांना आíथक परिस्थिती आणि माहितीच्या अभावामुळे परीक्षा देणे शक्य होत नाही, त्यांना योग्य ती संधी मिळावी, म्हणून वसंत स्मृतीतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. निवडक ३० जणांना संस्थेतर्फे विनामूल्य प्रशिक्षण, ग्रंथालय सुविधा, इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा विनामूल्य पुरविण्यात येईल. प्रशिक्षणार्थीकडून प्रवेशाच्या वेळेस पाच हजार रु. अनामत रक्कम आकारण्यात येईल. अभ्यासाच्या सर्व अटी पूर्ण करून परीक्षा दिल्यानंतर गुणपत्रिका (परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट नाही) सादर केल्यावर अनामत रक्कम परत केली जाईल.
अधिक माहितीसाठी महर्षी दयानंद फाऊंडेशन आयएएस अकादमी, वसंत स्मृती, चौथा मजला, भरतक्षेत्र साडी शोरूमच्या वर, दादासाहेब फाळके मार्ग, दादर (पू ), मुंबई १४ अथवा vrajppatel@gmail.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.