केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत आणि आस्थापनांमध्ये स्टेनोग्राफर निवडीकरता घेण्यात येणाऱ्या स्टेनोग्राफर्स निवड परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. उपलब्ध जागा १०६४ असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतील लघुलेखनविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २६ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया :  अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे लेखी निवड परीक्षा व कौशल्य चाचणीसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड चाचणी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रावर घेतली जाईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी १०० रु.ची रिक्रुटमेंट तिकिटे अर्जावर लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या

८ ते १४ ऑगस्ट २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर ७ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.     ल्ल ल्ल