आजच्या जागतिकीकरणाच्या युगात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे कायदा शिक्षण. समाजाच्या जडणघडणीत पूर्वीपासूनच कायद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कायद्याच्या उच्च शिक्षणाबाबत आपण माहिती करून घेऊ या.
मधल्या काळात फारसा न स्वीकारला जाणारा कायदाविषयक अभ्यासक्रम आता नव्या संदर्भात चांगल्या सामाजिक, व्यावसायिक प्रतिष्ठेसह, आíथक स्थर्य देणारा अभ्यासक्रम आणि व्यवसाय म्हणून अनेक विद्यार्थी स्वीकारताना दिसतात. आपल्या देशात उत्तम कायदेतज्ज्ञांची नितांत आवश्यकता आहे, तसेच विपुल संधी उपलब्ध असल्याने विधि शाखेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे जरूर वळावे.
राज्य सरकारने मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्‍‌र्हसिटीची स्थापना केली. त्यापकी नुकतीच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्‍‌र्हसिटी मुंबईतर्फे ‘कायदा विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश’ देण्यासाठी प्रवेश परीक्षेसंबंधी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
या वर्षी सुरू झालेला लॉ विद्यापीठाचा कारभार स्वत:ची जागा नसल्याकारणाने सध्या मुंबई येथून दोन कॅम्पसमधून सुरू केला आहे. इस्माईल युसूफ कॉलेज कॅम्पस, जोगेश्वरी, मुंबई व टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, देवनार  मुंबई येथून चालतो. या विद्यापीठात बारावीनंतर पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर पदवी एलएल.एम. हा एक वर्षांचा अभ्यासक्रम  करता येतो.
नॅशनल लॉ कॉलेज प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत संबंधित विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इंग्रजी, भाषा, तर्कशास्त्र, वैचारिक आकलन, विधि शिक्षणाकडे असलेला कल इत्यादी चाचपणी करण्यात येऊन त्यानुसार उमेदवारांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येते. या परीक्षेचे राज्यातील केंद्र – मुंबई.
वेबसाइट -www. clat.ac.in ईमेल-  helpdesk@clat.ac.in कायदाविषयक पदवीसह शिक्षण घेऊन ज्यांना आपले करिअर सुरू करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर कायदा विषयातील पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा तर कोणत्याही विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा कायदा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.    (पूर्वार्ध)

मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था-
०    गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
०    सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, फोर्ट, मुंबई.
०    डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळा, मुंबई.
०    के. सी. लॉ कॉलेज, चर्चगेट, मुंबई.
०    न्यू लॉ कॉलेज, माटुंगा, मुंबई.
०    रिझवी लॉ कॉलेज, वांद्रे, मुंबई.
०    जी. जे. अडवाणी लॉ कॉलेज, वांद्रे.
०    जीतेन्द्र चौहान कॉलेज ऑफ लॉ, विलेपाल्रे.
०    चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, मालाड.
०    नालंदा लॉ कॉलेज, बोरिवली.
०    व्ही. ई. एस. कॉलेज ऑफ  लॉ, चेंबूर.
०    अस्मिता कॉलेज ऑफ लॉ, विक्रोळी.
०    डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ, नवी मुंबई.
०    कॉलेज ऑफ लॉ, ऐरोली, नवी मुंबई.
०    ठाणे लॉ कॉलेज, ठाणे.
०    कांदिवली एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज, कांदिवली.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

cv-01cv-02
– आनंदराव शेडगे
anand_shedge@hotmail.com