आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो.  गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.
 मदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मदा वापरतात. उदा – बिस्किट्स नानकटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, रोटी, नान, नूडल्स, केक हे सर्वच पदार्थ मद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.
मदा बनविण्याची प्रक्रिया : गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मदा असे म्हणतात. हा मदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मदा जास्त दिवस टिकण्यासाठी परिरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मदा होय.
गुणधर्म  खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मद्यामध्ये असतो. मद्यांमध्ये फक्त काबरेहायड्रेट्स, जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर होते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.
मदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात. मद्यामध्ये शरीराला पोषक अशी नसíगक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते. उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.
आधुनिक काळातदेखील मदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मदा करण्याच्या क्रियेत  क्रोमियम, िझक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नसíगक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो कमी प्रमाणात खावा. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नसíगक मूलद्रव्ये आवश्यक आहेत; परंतु समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मद्याच्या पदार्थाना गरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
पर्यायी पदार्थ- सर्व पदार्थ बनविण्यासाठी मद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा मद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.
मुलांना पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नसíगक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
tiffin box recipe chavli masala in marathi
Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा