‘शिवसंहिते’त सेक्सच्या स्नायूंशी संबंधित तंत्रे व्यवस्थितपणे समजावून दिलेली आहेत. त्यातील चतुर्थ पटलातील श्लोक १०१ व १०२ यामधे जी तंत्रे सांगितले आहेत तीच तंत्रे डॉ. अर्नोल्ड केजेल या पाश्चात्त्य गायनॅकॉलीजिस्टने स्वतची व्यायाम-तंत्रे म्हणून विसाव्या शतकाच्या मध्यावर स्त्रियांसाठी म्हणून प्रसिद्ध केलीत. पण जगाला याचा पत्ताही नव्हता, अजूनही नाही की डॉ. केजेलच्या जन्माच्या कित्येक शतके आधी ‘शिवसंहिते’मध्ये विस्तृतपणे ती सांगितलेली आहेत.
‘अरे डॉक्टर, मी आता आहे ऐंशी वर्षांचा. माझी बायको जाऊनही अकरा वष्रे होऊन गेली आहेत. तुला माहीत आहेच माझी दोन्हीही मुलं आता कित्येक वर्ष अमेरिकेत राहात आहेत, त्यांच्या संसारात पूर्णपणे गुंतून गेलेली आहेत. आणि मी आता इथे एकटाच असतो. त्यांच्याकडे तरी किती दिवस राहाणार. मला करमत नाही तिथे. इथे एवढय़ा मोठय़ा बंगल्यात शेवटी मी एकटाच. म्हणून माझ्या दोन्हीही मुलांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता कम्पॅनियन बघा, दुसरं लग्न करा. आम्हाला तुमच्या इस्टेटीतून काही दिलं नाही तरी चालेल.’
ऐंशी वर्षांचे यशवंतराव सरकारी नोकरीतून उच्च पदावरून निवृत्त झालेले. उच्चभ्रू वर्गात मोडणारे. मला लहानपणापासून ओळखत होते. त्यांच्या कुटुंबाची साधारण माहिती मला होती.
‘काका, तुमची मुलं जर म्हणताहेत तर माझा सल्ला कशाला पाहिजे?’ मी जरा बुचकळ्यातच पडलो होतो. कोणासाठी जोडीदार निवडण्याचे काम तर काही माझे नव्हते.
‘अरे, तुझ्याकडे मी वेगळ्याच कामासाठी आलो आहे. मला कम्पॅनियनची गरज आहे हे माझ्या लक्षात आले. मुलांचं म्हणणं मी शेवटी मनावर घेऊन वधूसाठी जाहिरात दिली. आणि तुला सांगतो, जाहिरातीत माझ्या वयाची व गरजेची पूर्ण माहिती देऊनही प्रस्तावांची नुसती रीघ लागली. आणि तुला खोटं वाटेल तरुणींची सुद्धा भरपूर ‘स्थळं’ आली.’
‘अहो काका, तुमच्या सांपत्तिक स्थितीची सगळी खरी माहिती दिल्यावर असं घडणारच.’ मी त्यांना म्हटलं.
मला एक विनोद आठवला. एका पंचाहत्तरीच्या माणसाबरोबर त्याच्या नवीन तिशीतल्या बायकोला पाहून त्याच्या एका मित्राने आश्चर्य व्यक्त केले त्यावेळी त्या माणसाने त्याला सांगितले, ‘अरे मी तिला माझं वय खोटं सांगितलं.’ मित्राने चकित होऊन विचारले, ‘अरेच्चा, तू काय साठ वगरे सांगितलेस की काय?’ तो माणूस हसून म्हणाला, ‘नाही रे, मी नव्वद सांगितले!’
थोडक्यात, आमच्या या यशवंतरावकाकांची स्थिती काही वेगळी नव्हती. पण आमचे काका सरळमार्गी असल्याने त्यांनी सत्य सांगूनच नातं निवडायचं ठरवलं होतं. असो. काका सांगत होते, ‘मी पूर्ण विचार करून शेवटी एका सत्तरीच्या स्त्रीचा प्रस्ताव मान्य केला आहे. माझ्या मुलांनी आणि तिच्याही मुलांनी आम्हा दोघांना ग्रीन सिग्नल दिला आहे.’
काय गंमत आहे बघा. पूर्वी मुलं आईबाबांच्या ग्रीन सिग्नलने नातं फायनल करीत, आता..कालाय तस्म नम: आणखी काय?़़ मी यशवंतरावकाकांची रोमँटिक स्टोरी उत्सुकतेने ऐकत होतो.
‘पण तिनं मला एक अट घातली आहे.’ काका थोडे थांबले.
‘कोणती अट काका?’ मीही गोष्टीत गुंगून गेलो होतो.
‘अरे, ती म्हणाली, ‘मी रोमँटिक आहे आणि मला तुमच्याकडून काही ना काही प्रमाणात तसे संबंध हवेत.’ काकांनी माझ्या विषयाकडे संभाषण आणले. मला त्या स्त्रीच्या या वयातही होणाऱ्या इच्छेचे काही आश्चर्य वाटले नाही, पण तिने लग्नापूर्वीच तिच्या ‘लग्नसिद्ध अधिकारा’ची जाणीव या ऐंशी वर्षांच्या नरोत्तमाला ज्या धाडसाने दिली त्याचे कौतुकमिश्रित आश्चर्य जरूर वाटले. (आणि नवविवाहित तरुणींनाही हे असे ठणकावून सांगणे अजूनही जमत नाही याचे वैषम्य वाटते.)
‘काका, ती बाई जर एवढी स्पष्टवक्ती आहे तर, ती मनाने पण मोकळय़ा स्वभावाची असणार.’ मी.
‘अरे, खरं आहे. म्हणून तर मी तिला पसंत केले आहे. आयुष्याच्या शेवटच्या घटका तरी एकटेपणात न जाता सहजीवनात जातील असा मी विचार केला. पण त्या सहजीवनात आता कामजीवनाचं त्रांगडं असेल असे काही अपेक्षित नव्हतं मला. अरे, अकरा, बारा वर्षांपूर्वी बायको गेल्यानंतर मी हा विषयच विसरलो होतो. पण पुन्हा तो अशा पद्धतीने येईल असे काही वाटले नव्हते. आणि म्हणूनच तुझ्या सल्ल्यासाठी आलो आहे. काही तरी टिप्स मला दे बाबा.’ काकांनी माझ्याकडे येण्याचे प्रयोजन शेवटी सांगितले.
माझ्याकडे आलेल्या आजवरच्या केसेसमधील यशवंतराव ही सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होती. मी त्यांची मेडिकल हिस्टरी घेऊन त्यांची काळजीपूर्वक सेक्सॉलॉजिकल तपासणी केली. आणि त्या कामघातक व्यसने नसणाऱ्या, स्वतचे आरोग्य व्यवस्थित व काळजीपूर्वक जपणाऱ्या काकांना तीन-चार वेळा बोलावून टप्प्या टप्प्याने माझ्या काही ‘कामसंवर्धक’ सेक्स फिटनेस थेरपीच्या गोष्टी शिकवल्या. वैद्यकीय दृष्टीने कामजीवन हृदयसंजीवनी व तारुण्यवर्धक असते हे त्यांना समजावून देऊन सेक्सकडे सकारात्मक बघायला सांगितले. त्यांचा भावी जोडीदार तसा विचार करतोय याबद्दल त्यांचे मी अभिनंदन केले. कामजीवन ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे हे पटवून समाजाने आणि कायद्याने मान्यता दिलेल्या या गोष्टीला लग्नबंधनात संकोचाने बघण्याची गरज नाही हे समजावले. रोमँटिकपणाला वयाचे बंधन नसते हे कळल्यावर काका खुशीने गेले. त्यानंतर त्यांचा संपर्क जो झाला तो फोनवर साडेचार वर्षांनी.
‘माझे एकदम मजेत चाललंय बघ. बायकोही खूश आहे. ती म्हणते की मी लग्नापूर्वी होतो त्याच्याहीपेक्षा आता जास्तच तरुण दिसतोय. आणि तेही कुठलीही औषधं न घेता! तुझ्या टिप्स चालू आहेतच.’ काका एकंदर खुशीत होते.
सत्तर, पंचाहत्तरीचे कितीतरी ‘तरुण’ अशा सल्ल्यासाठी माझ्याकडे येऊन गेले. सेक्स फिटनेस थेरपीच्या टिप्स उपयोगी पडण्यापूर्वी त्या सर्वानाच कामघातक तंबाखू, गुटखा, स्मोकिंग ही व्यसने पूर्णपणे बंद करण्यासाठी भाग पाडले होते. (दारू व्यसन अर्थातच कुटुंबघातक असल्याने अशांना गरज लागल्यास काही सेवाभावी संस्थांची मदत आवश्यक असते.) मधुमेह, वाढलेले वजन यांचा विचारही आवश्यकच असतो.
आपल्या प्राचीन विचारवंतांनी ऋृग्वेदापासूनच सेक्सला डोळसपणे पाहिले, निरामयपणे पाहिले. सृष्टीनिर्मितीला ‘काम’बीज कारणीभूत आहे हे जनमानसावर ठसवून त्यांनी  त्यातून शास्त्र निर्माण केले. मथुन क्रियेशी संबंधित कामशास्त्र आणि स्वतशीच संबंधित असणारे स्व-कामशास्त्र म्हणून हठयोग यांचा उगम झाला. कामसूत्र रूपाने कामशास्त्र महर्षी मल्लनाग वात्स्यायनांनी इसवी सन चौथ्या शतकात सूत्रबद्ध केले. हठमध्ये स्वततच असलेली कामऊर्जा, सेक्शुअल एनर्जी कार्यान्वित करून मेंदूतील अमृतानंदाचा, ऑरगॅझमचा अनुभव घेण्याची क्रिया अभिप्रेत आहे. ही कामऊर्जा लैंगिक अवयवांशी संबंधित असणाऱ्या मज्जातंतूंच्या जाळय़ांशी, नव्‍‌र्ह प्लेक्ससशी निगडित असते हे हठयोगाचे गृहीत आहे. यालाच त्या विचारवंतांनी कुंडलिनी शक्ती, सेक्शुअल एनर्जी म्हटले आहे.
एका एनर्जी पॉइंटपासून, िलग/योनीमुळाच्या मज्जातंतूंच्या जाळीपासून, मूलाधार चक्रापासून म्हणजेच मज्जातंतूंच्या पेल्वीक प्लेक्ससपासून सेक्शुअल उत्तेजनाच्या मेंदूतील केंद्रांपर्यंत, हायपोथॅलॅमसपर्यंत, ही कामऊर्जा काही विशिष्ट क्रियांनी उत्तेजित करीत वाहून नेण्याची संकल्पना हठयोगात मांडली गेली. या िलग-योनी संबंधित मज्जातंतूंच्या उत्तेजनाने मेंदूकेंद्रामधे नव्‍‌र्ह इम्पल्सेस, मज्जा-संवेदना जाऊन चतन्य निर्माण होत आहे असे जाणवायला लागते. कारण मेंदूतील या विशिष्ट भागात ऑक्सीटोसीन हा हॉर्मोन त्यावेळी तयार होत असतो.
जेव्हा मी हठयोगाचा अभ्यास वैद्यकीय दृष्टीने करू लागलो तेव्हा एका कल्पनेचा जन्म झाला – सेक्स फिटनेस. हठयोगातील मूलतत्त्वे लक्षात घेऊन त्यांच्यातील वैद्यकीय तथ्ये लक्षात घेऊन सर्वसामान्यांसाठी उपयुक्त अशी वैद्यकीय प्रणाली विकसित केली – तांत्रिक सेक्स थेरपी. तंत्रशास्त्रावर आधारित म्हणून तांत्रिक. कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी ही फायदेशीर ठरू शकते असे माझ्या लक्षात आले. लैंगिक समस्या दूर करण्यासाठीच नाही, तर मुळातच त्या टाळण्यासाठी या फिटनेस थेरपीचा उपयोग होऊ शकतो. आपल्या पूर्वजांच्या या अलौकिक ज्ञानाचा वैद्यकीय दृष्टीने बदल करून केलेला वापर आधुनिक काळातही लाभदायक होऊ शकतो. लैंगिक समस्यांच्या प्रत्यक्ष केसेसमध्ये जेव्हा या तंत्रांचा वापर उत्साहवर्धक जाणवला तेव्हा ही सेक्स-फिटनेसची संकल्पना मी मांडली.
ऑक्टोबर १९९७ मध्ये इम्पोटन्स, नपुंसकतेची सहावी आशिया-पॅसिफिक परिषद क्वालालंपूरला झाली. त्यामध्ये नपुंसकतेच्या वैद्यकीय कारणांमध्ये एक नवीन संकल्पना मी मांडली – मस्क्युलर फॅक्टर, सेक्सच्या स्नायूंचा सहभाग. आजवर लैंगिक समस्यांमध्ये शारीरिक कारणांमध्ये केवळ न्युरो-व्हॅस्क्युलर म्हणजे रक्त-मज्जासंस्थेशी संबंधित किंवा हॉर्मोनल म्हणजे सेक्स हॉर्मोनशी संबंधित जर कारणे सापडली तरच ती शारीरिक लैंगिक समस्या नाहीतर मानसिक असा वैद्यकक्षेत्रात विचार होता, किंबहुना अजूनही आहे.
लैंगिक समस्या या समस्या असतात, लैंगिक आजार किंवा रोग नाहीत म्हणून त्यासाठी औषधे, सेक्स टॉनिक शोधण्यात वेळ घालवू नये. सेक्स ही यांत्रिकतेने घडणारी क्रिया नाही. त्या दोघांची मने, विचार आणि भावना यांचा पगडा लैंगिक संबंधांवर पडत असतोच. त्यामुळे लंगिक समस्यांचा विचार र्सवकष करावा लागतो.    
परंतु आजवरच्या माझ्या बत्तीस वर्षांच्या व्यावसायिक अनुभवातून बहुतेक लैंगिक समस्यांच्या केसेसमध्ये लंगिक स्नायू अकार्यक्षम असणे किंवा शीघ्र वीर्यपतन समस्येमध्ये त्यांची प्रतिक्षिप्त क्रिया अतिजलद असणे, स्त्रीच्या लैंगिक स्नायूंच्या अकार्यक्षमतेमुळे, ढिलेपणामुळे विशेषत नसíगक प्रसूतीमुळे ना तिला ना तिच्या जोडीदाराला समाधानकारक आनंद मिळणे अशी महत्त्वाची कारणे आढळली. वाढतं वय, कामसंबंधांमध्ये बराच काळाच्या गॅप्स, रेंगाळलेला मानसिक ताणतणाव (क्रॉनिक स्ट्रेस), मधुमेह, दारू-तंबाखू-धूम्रपानाचे व्यसन,  इत्यादी गोष्टींनी लैंगिक स्नायूंचा फिटनेस कमी होत असतो. अशा वैद्यकीय निरीक्षणांमुळे सेक्स-फिटनेस या संकल्पनेचे महत्त्व कामजीवनात तसेच सेक्सच्या समस्यांमध्ये निश्चितच लक्षात येईल.
‘शिवसंहिता’ वाचताना लक्षात आले की, सेक्सच्या स्नायूंशी संबंधित तंत्रे व्यवस्थितपणे समजावून दिलेली आहेत. त्यातील चतुर्थ पटलातील श्लोक १०१ व १०२ यामधे जी तंत्रे सांगितले आहेत तीच तंत्रे डॉ. अर्नोल्ड केजेल या पाश्चात्य गायनॅकॉलीजिस्टने स्वतची व्यायाम-तंत्रे म्हणून विसाव्या शतकाच्या मध्यावर (सन १९४८) स्त्रियांसाठी म्हणून प्रसिद्ध केलीत. पण जगाला याचा पत्ताही नव्हता, अजूनही नाही की  डॉ.केजेलच्या जन्माच्या कित्येक शतके अगोदरच शिवसंहितेमध्ये विस्तृतपणे सांगितलेली आहेत.
आपल्याकडचेच हे मूळ ज्ञान आता दुसऱ्याच्या नावाने जगप्रसिद्ध होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्यातील कामशास्त्राविषयीचा संकुचित दृष्टिकोन! त्यामुळेच हे सर्व अमूल्य व लोकोपयोगी ज्ञान अडगळीत पडले होते. आदिनाथांची शिवसंहिता, स्वात्मारामरचित हठप्रदीपिका, गोरक्षनाथांची गोरक्षसंहिता यामधेही जी तंत्रे सांगितली आहेत त्यात वैद्यकशात्र दृष्टय़ा योग्य प्रकारे, काळानुरूप योग्य बदल, आणि सर्व वयातील स्त्री-पुरुषांना अल्प काळातच सहजपणे, सुलभपणे शिकता येतील असा मी तयार केलेला हा औषधांविना असणारा सेक्स फिटनेस थेरपीचा ट्रेन्िंाग प्रोग्रम, फर्स्ट लाइन थेरपी म्हणून पुष्कळ लंगिक समस्यांमधे वापरता येऊ शकतो.
यात ‘केजेलची व्यायाम तंत्रे’ नसून आपल्याकडील प्राचीन हठयोगातील बंध व मुद्रावर आधारित ‘आयसोटोनिक’ व ‘आयसोमेट्रिक’ व्यायामतंत्रेही आहेत व कामसंबंधातील अत्युच्च आनंद स्त्री-पुरुष या दोघांनाही मिळावा म्हणून विकसित केलेली विशिष्ट कामशास्त्रीय तंत्रेही आहेत. आणि कुठल्याही वयातील सर्वसामान्यांना ती शिकता येतील अशी आहेत. प्राचीन भारतीय तंत्रशास्त्राला आधुनिक सेक्सॉलॉजी वैद्यकात मानाचे स्थान देण्याचा हा माझा प्रयत्न आहे हे निश्चित.  कुठल्याही वयातील व्यक्ती त्यामुळे सेक्स फिटनेस आणून म्हणू शकेल.. नो सेक्स-रिटायरमेंट, अजून यौवनात मी!

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क