नैसर्गिक खत तयार करण्यासाठी माठाचा चांगला वापर होतो. ओला, हिरवा कचरा या माठात टाकल्यास त्याचेही छान खत तयार होते. ही पद्धतही फ्लॅटमध्ये उत्तमरीत्या अंमलात आणता येते.

रोजचा हिरवा कचरा सुरीने अगदी बारीक करावा..तो वर्तमानपत्रावर तास दोन तास वाळवावा. सावलीत वाळवला तरी चालतो. माठात टाकावा. त्यावर झाकण ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवसाच्या कचऱ्यावर वरील प्रमाणेच प्रक्रिया करावी. दुसऱ्या दिवसाचा कचरा टाकण्यापूर्वी माठातील कचरा वर्तमानपत्रावर घेऊन मिक्स करावा. पुन्हा माठात टाकावा. असे रोजचे करत गेल्यास छान मऊ, काळ्या रंगाचे खत ४५ ते ६० दिवसांत मिळते. या पद्धतीत थोडी निमपेंड वापरल्यास उत्तम. तसेच हिरवा कचरा हा रोजसारखाच प्रमाणात वापरावा. हे खत आठवडय़ाला चमचा भर याप्रमाणे प्रत्येक कुंडीला द्यावे. या प्रकारात खरकटे अन्न व पातळ पदार्थ वापरू नयेत.
प्लॅस्टिक क्रेट्स..
बाजारात भाजीपाला व फळे वाहून नेणाऱ्या प्लॅस्टिकचे क्रेटस मिळतात. यात रोजचा हिरवा कचरा हवा तसा टाकून द्यावा.हिरवा कचरा सुरीने कापून घेतल्यास उत्तम.. तो अडोशाला, निर्मनुष्य जागी ठेवता येतो. खुल्या वातावरणात गच्चीवर किंवा ऊन पावसात ठेवला तर उत्तम. पहिला क्रेट्स भरला की त्यावर दुसरा क्रेट ठेवावा, तो भरला की त्यावर तिसरा क्रेट् ठेवावा. तिसरा क्रेट भरला की पहिला रिकामा करून घ्यावा. त्यात छान खत तयार झालेले असते. या प्रकारात आपण आठवडय़ातून एकदा या प्रमाणे ताक किंवा गुळाचे पाणी यापकी एक किंवा आळीपाळीने दर आठवडय़ास स्पे केल्यास कचरा कुजण्याची प्रक्रिया लवकर होते. हिवाळ्यात यात गरम पाण्याचा शिडकावा द्यावा. कारण हिवाळ्यात नसíगक जीवाणूच्या निर्मितीची प्रक्रिया थंडावते. आठवडा पंधरा दिवसांतून एकदा गोमुत्राचा स्प्रे केल्यास चिलटे होत नाही. या क्रेट्सला शेडनेटचे हिरवे कापड किंवा नायलॉनच्या साडीचे अस्तर दिल्यास उत्तम. कचरा सुकवून संग्रही करता येतो. अधिकची काळजी म्हणून यात िहग किंवा हळद ही चिमूटभर महिन्यातून एका शिपंडावी. तसेच छोटय़ा प्रमाणातील कचऱ्यासाठी क्रेटसऐवजी प्लॅस्टिकच्या बास्केटही आळीपाळीने वापरता येतात.

संदीप चव्हाण
sandeepkchavan79@gmail.com