युवावस्थेतील लंगिकता (अ‍ॅॅडल्ट सेक्शुआलिटी) ही संबंधित व्यक्तींना समाधानकारक व आनंददायी असली पाहिजे. तसेच ती समाजालाही हानी न पोचवणारी असणे आवश्यक आहे. तरच लंगिक मनोगंड, लंगिक समस्या व लंगिक गुन्हे यांचे प्रमाण घटेल. त्यासाठी युवावस्थापूर्व लंगिकता (अ‍ॅडोलेसन्ट सेक्शुआलिटी) व्यवस्थितपणे विकसित होणे आवश्यक असते आणि या युवावस्थापूर्व लंगिकतेचा संबंध लंगिक व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी असतो.
लैंगिकता ही मानवी व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वापासून तिला वेगळेही काढता येत नाही. सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वावरील तिच्या प्रभावालाच लंगिक व्यक्तिमत्त्व म्हणता येईल. मात्र या प्रभावाचे प्रमाण हे व्यक्ती-व्यक्तींमध्ये वेगवेगळे असू शकते. वासना-तीव्रता व कामस्वभाव (सेक्स-ड्राइव्ह) हे गुण आनुवंशिक गुणसूत्रांवर अवलंबून असल्याने व्यक्तिगत असतात. लंगिक व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण ही सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाप्रमाणे जन्मापासूनच बनत असते.
युवावस्थेतील लंगिकता (अ‍ॅॅडल्ट सेक्शुआलिटी) ही संबंधित व्यक्तींना समाधानकारक व आनंददायी असली पाहिजे. तसेच ती समाजालाही हानी न पोचवणारी असणे आवश्यक आहे. तरच लंगिक मनोगंड, लंगिक समस्या व लंगिक गुन्हे यांचे प्रमाण घटेल. त्यासाठी युवावस्थापूर्व लंगिकता (अ‍ॅडोलेसन्ट सेक्शुआलिटी) व्यवस्थितपणे विकसित होणे आवश्यक असते आणि या युवावस्थापूर्व लंगिकतेचा संबंध लंगिक व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी असतो. लंगिक व्यक्तिमत्त्वाचा विकास हा पाया धरून लंगिक शिक्षण बाल्यावस्थेपासूनच दिले पाहिजे.
लंगिक शिक्षण कसे व किती?
अ‍ॅडोलेसन्ट व अ‍ॅडल्ट लंगिक शिक्षणाचा समावेश असलेल्या शिक्षणक्रमाचे तीन टप्पे पडू शकतात. १. बाल्यावस्था- बारा वर्षांखालील मुलामुलींचा २. किशोरावस्था- तेरा ते अठरा वर्षांचा ३. युवावस्था- अठरा वर्षांपुढील
बाल्यावस्थेतील लंगिक शिक्षण – या वयात मुलावर पालकांचा व शालेय शिक्षकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे असे लंगिक शिक्षण देणे ही या दोघांचीही एकत्रित जबाबदारी असते. त्यापूर्वी पालक व शिक्षक यांच्या लंगिकतेविषयीच्या स्वत:च्या कल्पना स्पष्ट व शास्त्रीय असणे जरुरीचे असते. बाल्यावस्थेचेही पूर्वप्राथमिक गट (आठ वर्षांपर्यंत) व प्राथमिक गट (आठ ते बारा वर्षांपर्यंत )असे दोन उपगट करता येतील.
मुलांचे लंगिक शिक्षण हे बालवयातच सुरू होत असते. मुलांचे हे वय अजाण असते, परंतु त्यांची या विषयातील उत्सुकता व शंका यांचे निरसन त्यांना समजेल अशा प्रकारे व त्यांच्या भाषेत केले नाही तर ती मुले नाराज होतात. एवढेच नाही तर त्यांचा चौकसपणा वाढून त्यांच्या मनाला या विषयाची अबोध ओढ लागून राहाते. त्यातूनच मनोगंड व लंगिक व्यक्तिमत्त्वाचा अपुरा किंवा विकृत विकास यांना ते बळी पडतात.
लंगिक शिक्षणाची मुख्य जबाबदार व्यक्ती : पालक- या गटातील बालचमूंच्या लंगिक शिक्षणाची सुरुवात ही त्यांच्या पालकांनीच करणे जरुरीचे असते. यासाठी त्यांच्या स्वत:च्याच कल्पना स्पष्ट असणे व वृत्ती संकुचित नसणे हे महत्त्वाचे आहे.
लंगिक शिक्षणामध्ये या वयोगटात खालील गोष्टींचा विचार केला पाहिजे-
१. जन्माची गूढता
२. पुरुष व स्त्री यांच्यातील लंगिक फरक
३. लंगिक आरोग्याची जाणीव
या काळामध्ये मुलांचे लंगिक विषयासंबंधीचे प्रश्न हे नसíगक उत्सुकतेमुळे उत्पन्न होत असतात. मी कुठून आलो? किंवा भावाबहिणींमधील लंगिक अवयवांचा फरक लक्षात आल्याने काही मूलभूत शंका बालमनाला भेडसावत असतात. या  प्रश्नांना शरीरशास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्टीने योग्य असलेलीच उत्तरे द्यायला पाहिजेत. आई-बाबांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे, जवळीकतेमुळे बाळाचा जन्म होतो असे त्याला समजावून देणे आवश्यक असते. म्हणजेच बाळ होण्यासाठी आई आणि बाबा दोघेही आवश्यक असतात हे त्यांच्या बालमनावर ठसेल.
लंगिक अवयव हे ‘घाण’ असतात आणि ‘तिथे’ हात लावू नये असे रागावून सांगणे किंवा तसे घडल्यास शिक्षा करणे या ‘पालकीय’ जबाबदारीच्या गोष्टी असतात आणि बालकांना असे ‘वळण’ लावणे आत्तापासूनच गरजेचे आहे नाहीतर मोठेपणी केस ‘हाताबाहेर’ जाईल अशा कल्पना मनात घट्ट रुजवून बहुतेक आईबाप असा ‘ब्रेन वॉश’ फारच जागरूकतेने करत असतात. परिणामस्वरूप बालपणापासूनच बालकांना लंगिकतेची धास्ती व भीती वाटणे सुरू होते. हे सर्व टाळले पाहिजे.
याउलट बालकांनाच आंघोळ घालताना लंगिक अवयवांची स्वच्छता करायला शिकवणे आवश्यक असते. हीच सवय त्यांना पुढे येणाऱ्या पौगंडावस्थेसाठी फायदेशीर ठरते.
मुलामुलीतील फरक हा अशा बालकांचा कुतूहलाचा विषय असतो. हा फरक अशा बालकांना मोघम भाषेत पण स्पष्टपणे सांगितला पाहिजे. निसर्ग वगरे कल्पना अशा बालचमूंना न कळणाऱ्या असल्यामुळे ‘बाप्पा’ ही कल्पना रुजवली तरी चालेल. कालांतराने हाच बाप्पा निसर्गस्वरूप असतो हे त्यांना उमगणे अवघड जात नाही. पण ‘बाप्पा’ने ‘शू’च्या जागेत फरक केल्यामुळे तू ‘मुलगी’ व तो ‘मुलगा’ असतो, इतपतच ज्ञान अशा आठ वर्षांखालील मुलांना पुरते. जास्त खोलात किंवा चेहरा ‘गोरामोरा’ करून उत्तर द्यायची काहीही आवश्यकता नसते.
लंगिक मनोगंडांची सुरुवात
पालकांच्या आपसातील संबंधात प्रेम, सलोखा असेल तर पाल्याच्या लंगिकतेची वाढ निरोगीपणे होऊ शकते. नाहीतर विविध ‘आकर्षण गंड’ तयार होऊ शकतात. आई व मुलातील ईडिपस कॉम्प्लेक्स, वडील व मुलीतील इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स, भावा-बहिणीतील कलिग्युला कॉम्प्लेक्स असे सर्वसाधारणपणे आढळणारे लंगिक मनोगंड व इतरही न्यूनगंड निर्माण होण्यास या काळात सुरुवात होते. सर्वप्रथम अशा केसेस असतात हेच सर्वसामान्यांना कळले पाहिजे. आम्हा सेक्सॉलॉजिस्ट वा मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांकडे या उघड होत असतात. मुलांवरील प्रेम ठीक आहे परंतु सात-आठ वर्षांनंतर मुलांना वेगळे झोपायला शिकवणे गरजेचे असते.  
आई-वडिलांचा विभक्तपणा किंवा घटस्फोट या गोष्टी पाल्याच्या सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर दुष्परिणाम करतातच, पण त्यामुळे एखाद्या पालकाविषयी घृणा निर्माण होऊन लंगिक व्यक्तिमत्त्वाचा विकासही प्रभावित होऊ शकतो. विषमिलगी आकर्षण कमी होऊन लंगिक तुसडेपणा (सेक्शुअल अ‍ॅव्हर्जन) येऊ शकतो किंवा समिलगी आकर्षण (होमोसेक्शुअल अ‍ॅट्रॅक्शन) निर्माण होऊ शकते. अशांच्या वैवाहिक जीवनात मग ‘त्सुनामी’ येतात.
पुरुष व स्त्री हा भेद िलगाच्या फरकावर असतो हे मुलांना लक्षात आलेले असतेच, परंतु तो व्यवस्थित समजून देऊन लंगिक अवयवांविषयी त्यांच्या मनात बाऊ करू नये. पाप-पुण्याच्या कल्पना लंगिकतेशी निगडित व्हायला अशीच सुरुवात होते व पाल्याचा लंगिकतेविषयीचा दृष्टिकोन हा संकुचित होऊ शकतो. पुढील आयुष्यात तो मोकळेपणाने स्वत:च्या व दुसऱ्यांच्या लंगिकतेकडे बघूच शकत नाही. ही पाल्याच्या लंगिक मनोगंडाची पायाभरणीच आहे.
इतर व्यक्तींशी संबंध कसे असावेत याचे ज्ञान या वयातील मुलांना देणे सध्याच्या काळात तर अत्यावश्यक झाले आहे. लंगिक अत्याचार, बाल-बलात्कार, पिडोफिलिया (लंगिक बालाकर्षण) यांचे वाढते प्रमाण धक्कादायक असल्याने या वयात ‘बॅड टच’ किंवा ‘दु:स्पर्श’ ओळखण्याची बुद्धी जरी पूर्णपणे विकसित होत नसली तरी ‘परस्पर्शा’विषयी जागरूकता व आईबाबांना त्याची माहिती लगेच देण्याची सवय लावली गेली पाहिजे. विशेषत: आईवडिलांनीच याबद्दल जास्त जागरूक व ‘चौकस’ राहिले पाहिजे. पुष्कळसे लंगिक प्रकार याच काळात बालकांच्या अनवधानाने होत असतात आणि तेसुद्धा ओळखीच्याच व्यक्तींकडून. म्हणून मुलांना ‘कुठल्याही’ िलगाच्या (स्त्री वा पुरुष), कितीही वयाच्या (पौगंडावस्थेतील, तरुणवर्ग वा प्रौढ), ओळखीच्या वा अनोळखी व्यक्तींबरोबर, पाहुण्यांबरोबर झोपू देणे ही आईवडिलांची ‘चूक’ ठरू शकते, हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे.   
लंगिक शिक्षण देताना हे लक्षात ठेवले पाहिजे –
१. मुलांच्या रोल प्लेइंगच्या विचारांमध्ये लवचिकता आणणे. एकुलत्या एक मुलाचे किंवा मुलीचे प्रमाणाबाहेर लाड न करणे. तसेच त्यांना भिन्न िलगी कपडे वारंवार घालून व तसे वागायला लागून स्वत:च्या अन्य िलगी अपत्याची भूक भागवायचा कृत्रिम प्रयत्न न करणे.
२. एकत्र शिक्षणामुळे मुलगा व मुलगी यांच्यातील बुजरेपणा दूर कसा होईल हे पाहणे.
३. जीवशास्त्राच्या आधाराने लंगिक अवयवांची रचना समजावून देणे. अंडे व शुक्राणू (एग व स्पर्म) या जीवनाच्या दोन मूलतत्त्वांची ओळख करून देणे.
४. कौटुंबिक वातावरण मोकळेपणाचे व संवादाचे ठेवून मुलांना लंगिकतेविषयीच्या शंका विचारण्याची मुभा देणे.
५. आई-वडिलांचे परस्परांशी असणारे संबंध मुलांच्या लंगिक व्यक्तिमत्त्व विकासावर खोलवर परिणाम करीत असल्याने ते सलोख्याचे, प्रेमाचे ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. वादावादी, टोकाची भांडणे, विभक्तपणा व घटस्फोट यांसारख्या दुर्दैवी घटना मुलांच्या सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करतातच, परंतु लंगिक व्यक्तिमत्त्व विकासही धोक्यात आणतात. अशी मुले भीतीगंड, न्यूनगंड यांना बळी पडतात व पुढील लंगिक समस्यांची बीजे मनात रोवून जीवनाला सामोरे जात असतात.
  ६. आई-बाबा ही मुलांची दैवते असण्याचा हा काळ असतो. त्यांच्या नजरेत बाबा हे सामर्थ्यांचे प्रतीक तर आई ही सर्व समस्या सोडविणारी देवता, तसेच मुले व आदरयुक्त पण भीतिदायक बाबा यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा असते. ती शॉक ऑॅब्सॉर्बर असल्याने मुलांना बाबांपेक्षाही ती जास्त जवळची वाटते. म्हणून आई-बाबा यांच्यावर मुलांशी प्रेमाने व आपलेपणाने वागण्याची जबाबदारी येते. म्हणजेच कुटुंबात सुसंवाद राखणे हे महत्त्वाचे. प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमधील जवळीक असे समीकरण त्यांच्या मनावर ठसण्यास मदत होते. त्यांची लंगिकता मानसिक दृष्टीने परिपक्व व्हायला मदत होते.
shashank.samak@gmail.com

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’