नासिर काजमीच्या ग़ज़्‍ालात रात्रीच्या अंधाराची तीव्र जाणीव अन् उद्याच्या पहाटेची प्रतीक्षा, जीवनातील नराश्य अन् आशेची मिणमिणती ज्योत तेवत असते. त्यातूनच ते म्हणतात, कौन इस राह से गुजरता है, दिल यूं ही इंतजार करता है। शाम से सोच रहा हूँ नासिर, चांद किस शहर में उतरा होगा।

यूँ तो हर शख्स अकेला है भरी दुनिया में
फिर भी हर दिल के *मुकद्दर में नहीं तनहाई

तेरे करीब रह के भी दिल *मुतमई न था
गुजरी है मुझ पे ये भी कयामत कभी कभी

देख मुहब्बत का *दस्तूर
तू मुझे से मं तुझसे दूर
त्याचे असे अनेक शेर ग़ज़्‍ाल प्रकाशित होताच दुसऱ्या दिवशी लाहोरच्या कॉफी हाऊसमध्ये साहित्यिक मित्रात चíचले जात. हा उदास एकांताचा अनोळखी प्रवासी शायर होता, ज्याचं नाव नासिर काजमी.
उर्दूचे श्रेष्ठ कथालेखक इंतजार हुसन लाहोरच्या मालरोडवरून दुपारी जात होते. पर्णझडीचा ऋतू होता. तोच त्यांना समोरून एक व्यक्ती आपल्याच तंद्रीत सिगरेट ओढत येताना दिसली. ती व्यक्ती म्हणजे नासिर काजमी होते.
‘‘नासिर साहिब इस वक्त किधर?’’
नासिर उत्तरले, ‘‘पत्ते देखते जा रहा हूँ।’’
‘‘पत्ते?’’
‘‘हॉं, पत्ते, आज पत्ते बहुत गिरे है, यह पतझड की रुत है, यह रुत मुझे बहुत खराब करती है, गिरते पत्तों को देखकर मैं उदास हो जाता हूँ..’’
वृक्ष, चिमण्या, हरवलेले चेहरे या गोष्टी नासिरना प्रिय होत्या. शामा चिडियाचा उल्लेख करताच त्यांनी इंतजार हुसनला तिची समग्र माहिती सांगितली. इंतजार म्हणतात, ‘‘जणू मी प्रत्यक्ष शामा चिमणी बघतोय असं मला जाणवलं.’’
नासिरच्या ़ग़ज़्‍ालात रात्रीच्या अंधाराची तीव्र जाणीव अन् उद्याच्या पहाटेची प्रतीक्षा जीवनातील नराश्य अन् आशेची मिणमिणती ज्योत तेवत असते.
कौन इस राह से गुजरता है
दिल यूं ही इंतजार करता है

शाम से सोच रहा हूँ नासिर
चांद किस शहर में उतरा होगा

जिन्दी जिसकी तमन्ना में कही
वो मेरे हाल से बेगाना रहा
अशा वैफल्यग्रस्त शेरांनंतर नासिर कधी कधी म्हणतात.
*नहर क्यों सो गयी चलते-चलते
कोई पत्थर ही गिराकर देखो
आश्वस्त करणारा हा शेर वाचल्यावर दुष्यंत कुमारचा एक लोकप्रिय शेर आठवला-
कैसे आकाश में सुराख हो नहीं सकता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों
आधुनिक ़ग़ज़्‍ालच्या या शिल्पकाराचा जन्म  ८  डिसेंबर १९२५ ला अंबाला येथे झाला. वडील सुल्तान काजमी, सुभेदार मेजर होते. फाळणीमुळे हे कुटुंब लाहोरला स्थायिक झाले. नासिरचे शिक्षण पेशावर, अंबाला व लाहौर येथे झाले. त्यांच्या पत्नीचे नाव शफीका बेगम होते.
नासिर काजमीने ‘औराके नौ’ (नवीन पाने) या नावाचे मासिक काढले होते. त्यानंतर ‘हुमायूँ’ , ‘खयाल’, ‘हम लोग’ अशी साहित्यविषयक मासिके संपादित केली. ते १९६४ ते १९७२ पर्यंत रेडिओ पाकिस्तानचे स्टाफ आर्टस्टि होते. नासिर म्हणत माझा संबंध शायरीशी आहे. शायरी म्हणजे फक्त शेर लिहिणे नाही. शायरी एक दृष्टिकोन, विचारधारा असते. वस्तू गोष्टींचे अवलोकन करून त्यांचे लालित्यपूर्ण विवेचन करणे म्हणजे शायरी. माझ्यापुरतं सांगायचं तर मी असा विचार करतो की ती कालसापेक्षही असावी अन् माझ्या युगाचा आत्मा तिच्यात असावा
नासिर काजमींचा एक शेर जागतिक स्तरावर मशहूर झाला तो असा-
ऐ दोस्त हमने *तर्के-मुहब्बत के बावजूद
महसूस की है तेरी जरुरत कभी-कभी
हजारों ठिकाणी हा शेर वापरला गेला. पुढे पुढे काही वर्षांनी या शेराचा उल्लेख होताच नासिर वैतागू लागले होते. नासिर व्यथित हृदयाचे शायर होते. बरेचसे आत्ममग्न प्रकृतीचे, त्यामुळे त्यांच्या शायरीत राजकीय, सामाजिक व्यथा, वेदनांचे प्रतििबब प्रकर्षांने साकारताना दिसत नाही. पण त्यातून साकारणारे व्यक्तिगत दुख, व्यक्तिनिष्ठ नराश्य सार्वकालीन व बरंचसं वैश्विक बनतं एवढं मात्र खरं.
नासिर रंगाचे काही शेर ऐका
*तनहाई को कैसे छोडूँ
बरसों में इक यार मिला है

हमारे घर की दीवारों पे नासिर
उदासी बाल खोले सो रही है

जब जरा तेज हवा होती है
कैसी सुनसान फिजा होती है
नासिर तरन्नुममध्ये ग़ज़्‍ाल पेश करीत असत. लयदार छंद त्यांच्या ग़ज़्‍ालेचे सौंदर्य अधिक खुलवीत असत. काही शेर –
पिछले साल के *मलाल दिल से मिट गये
ले के फिर नई चुभन वसंत आ गई

अपनी धून में रहता हूँ
मं भी तेरे जैसा हूँ
न अब वो यादों का चढता दरिया
न फुर्सतों की उदास बरखा
यूँ ही जरा सी कसक है दिल में
जो जख्म गहरा था भर गया वो
जिसे सुने के रुह महक उठे
जिसे पी के दर्द चहक उठे
तिरे साज में वो-सदा नहीं
तिरे *मकदे में वो मय नहीं
ये किस खुशी की रेत पर गमों को नींद आ गयी
वो लहरा किस तरफ गई, ये में कहाँ समा गया
अनुक्रमे कलापति, अचलगति, हिरण्यकेशी व सूरनिम्नगा, किलदनंदित या वृत्तातल्या ़ग़ज़्‍ालांतील हे शेर आशयघनता व गीतात्मकता अंगभूत लेवून आले आहेत.
नासिर काजमीचा ‘बग्र न’ हा ़ग़ज़्‍ालसंग्रह १९५२ मध्ये प्रकाशित झाला. नंतर मात्र ते काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबाबत उदासीन होते. ‘दीवान’ हा संग्रह त्यांच्या निधनानंतर १९७२ मध्ये प्रकाशित झाला. ‘पहली बारिश’ हा २४ क्रमबद्ध ़ग़ज़्‍ालशृंखला संग्रह १९७५ मध्ये, ‘वसूर की छाया’ हे काव्यनाटक १९८१ मध्ये प्रकाशित झाले. यही शेर है मेरी सल्तनत.. असं म्हणत नासिर सांगतात.
*उरुज पर है मेरा दर्द इन दिनों नासिर
मेरे ़ग़ज़्‍ाल में धडकती हैं वक्त की आवाज
विरोधाभास हा दादलेवा ़ग़ज़्‍ालचा हुकमाचा एक्का पण तो ़ग़ज़्‍ालचं सर्वस्व नव्हे, त्याने प्रतीकात्मकतेने काही सुचवलं तर त्यास वाङ्मयीनदृष्टय़ा वाखाणता येईल. उदा.
इक तरफ झूमकर बहार आयी
इक तरफ *आशियाँ जलाये गये
*हराम है जो सुराही को मुँह लगाया हो
ये और बात कि हम भी शब्दीके-महफिल थे
बहुअर्थच्छटा असलेले हे शेर अनेक संदर्भात सहजपणे उद्धृत करता येतील. प्रेयसीची आठवण तिचा विरह आदी पारंपरिक विषयांच्या कैदेतून उर्दू गज़्‍ाल जामिनावर सुटली असावी पूर्णपणे अद्याप मुक्त झाली नाही असे दिसते. नासिर यांचे हे काही शेर पहा-
इस कदर रोया हूँ तेरे प्यार में
आईनें आँखों के धुंधले हो गये

जरा-सी बात से ही तेरा याद आ जाना
जरा-सी बात बहुत देर तक रुलाती थी
फिर उसकी याद में दिल बेकरार हैं नासिर
बिछड के जिससे हुई शहर-शहर रुसवाई
अन् आता तिच्या अभिलाषेच्या संदर्भात-
मुझे ये डर है तेरी *आरजू न मिट जाये
बहुत दिनों से बतीयत मेरी उदास नहीं
पुन्हा स्वतलाच कदाचित आरशात बघून विचारतात-
जहाँ में यूँ तो किसे चन है मगर प्यारे
ये तेरे फूल-से चेहरे पे क्यूँ उदासी है
इंतजार हुसनच्या मते, नासिर काजमीला जाणून घ्यायचे असेल तर मीर तकी मीर, फिराक यांच्यासवे मीराबाई, सूरदास व कबीर यांनाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
अद्वैतवादाचा हा शेर
दिल से हर वक्त कोई कहता है
मं नहीं तुझसे जुदा, गौर से सुन
दुनियेबद्दल ते म्हणतात-
दुनिया तो सदा रहेगी नासिर
हम लोग है यादगार कुछ देर
इस दुनिया में अपना क्या है
कहने को सबकुछ अपना है
साहिर ही असंच म्हणतात- पण उपहासाच्या स्वरात
चीनो-अरब हमारा, हिन्दोस्तॉं हमारा
रहने को घर नही है, सारा जहॉं हमारा
प्रेयस वृत्ती त्यातील विषाद, उद्वेग भाव नासिरच्या शेरांत सहज व सुबोधपणे साकारतात.
हमने तुझको लाख पुकारा तू लेकिन खामोश रहा
आखिर सारी दुनिया से हम तेरे बहाने रुठ गए
असे शेर वाचताना अनेकदा रसिकांना तो आपल्या मनाचा अव्यक्त अनुवाद वाटतो हेच नासिर यांचे वैशिष्टय़ होय.
लाहोरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये २३ मार्च १९७२ ला नासिर काजमींनी अंतिम श्वास घेतला जाण्यापूर्वीच्या भेटीत ते मित्र इंतजार हुसनला म्हणाले, लाहौरच्या भूमीला, मित्र-मंडळींना, कॉफी हाउसला, वृक्षांना, पक्ष्यांना, चिमण्यांना माझा सलाम सांगा. मी त्यांची आठवण काढीत असतो..
कहीं-कहीं कोई रोशनी है
वो आते जाते से पूछती है
कहाँ है वो अजनबी मुसाफिर
कहाँ गया वो उदास शायर
————————————
मुकद्दर – नशीब, भाग्य, मुतगई – संतुष्ट, तृप्त,दस्तूर – प्रथा, परंपरा, रिवाज,नहर – कालवा, तर्के मुहब्बत – प्रेम त्याग,
तनहाई – एकांत,फिजाँ – वातावरण, मलाल – दुख
कसक – ठणका, वेदना,मकदा – मद्यालय,
उरुज – चरमसीमा, शिखर, उन्नती, आशियाँ – घर, घरटे, हराम – त्याज्य, निषिध, अयोग्य,बेकरार – बेचन, अस्वस्थ, आरजू – अभिलाषा, इच्छा
डॉ. राम पंडित -dr.rampandit@gmail.com