पुरातन काळापासून भारतीयांच्या आहारात असलेलं बाजरी हे भरड धान्य गव्हापेक्षा पचायला हलकं आहे आणि म्हणूनच अनेक आजारात बाजरीची भाकरी आणि पालेभाजी हे पथ्य सांगितलेलं असतं. विशेषत: थंडीत वापरली जाणारी ही बाजरी कॅल्शियम, लोह, फायबर आणि ई-जीवनसत्त्वाचा चांगला स्त्रोत आहे. त्यामुळेच वजन कमी करणाऱ्यांना, त्यांच्या आहारात बाजरी असावी असा सल्ला दिला जातो. मुलांनीही ती खावी म्हणून हे बाजरीचे लाडू.
बाजरी चॉकलेट लाडू
साहित्य: दोन वाटय़ा बाजरीचं पीठ, दीड वाटी पिठीसाखर, एक मोठा चमचा कोको पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर, सजावटीसाठी बारीक रंगीबेरंगी गोळ्या(स्प्रिंकल्स), पाव वाटी अक्रोडचे बारीक तुकडे, पाव वाटी बेदाणे, अर्धी वाटी + एक मोठा चमचा साजुक तूप, पाव वाटी चॉकोलेट चिप्स.
कृती: अर्धी वाटी तुपावर बाजरीचं पीठ खमंग भाजून घ्यावं, गार झाल्यावर त्यात इसेन्स, साखर, जायफळ आणि कोको पावडर मिसळावी. उरलेलं साजूक तूप आणि चॉकोलेट चिप्स एकत्र करून मंद आचेवर किंवा डबल बॉयलरमध्ये ठेवावं आणि चिप्स वितळल्या की कोमट झाल्यावर पिठात मिसळाव्या. अक्रोड आणि बेदाणे मिसळून लाडू करावे, लाडू स्प्रिंकल्समध्ये घोळवावे.

500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!