० स्वयंपाकघरात दुधाच्या पिशव्या, शीतपेयांच्या किंवा औषधाच्या रिकाम्या बाटल्या, वाणसामानाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, वर्तमानपत्राची रद्दी यांची दाटी करू नये. त्यामुळे झुरळ, पाल, मुंग्या आणि किडे यांचा मुक्त संचार वाढतो.
० कडधान्य, मसाले जास्त प्रमाणात खरेदी करू नयेत. दुर्लक्ष झाल्यास त्यांना कीड लागते.
० बाजारातून आणलेले हवाबंद पदार्थाचे डबे जेव्हा गरज लागेल तेव्हाच उघडा आणि उघडलेल्या डब्यातील पदार्थ उरल्यास तो  लवकर संपवा.
० सिंकमध्ये भांडी घासून झाली की, सिंक डिर्टजट पावडर टाकून धुऊन टाका.
० सिंकचा पाइप नियमित स्वच्छ करा. कचरा गेल्याने सिंकमध्ये पाणी तुंबल्यास त्यात बेकिंग सोडा घालून ठेवा व अध्र्या तासाने जोराने पाणी ओतून धुवा.
० सिंक नेहमी झाकण लावून बंद करा, कारण त्यातून झुरळ किंवा अन्य किडे बाहेर येणार नाहीत.
० गॅसचे काम झाले असेल तर शेगडीवर सांडलेले पदार्थ लगेच साफ करा. तसेच राहिल्यास त्यावर मुंग्या, माश्या येतात.
० झालेला स्वयंपाक व्यवस्थित झाकून ठेवा. त्यामुळे जेवण गरम राहील आणि धूळ, माशा, मुंग्या, पाली, झुरळ यांच्यापासून सुरक्षित राहील.
० नियमित वापरात नसलेल्या, पण सणासमारंभासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींसाठी, भांडय़ांसाठी सिलिंग शेल्फ हा चांगला पर्याय होऊ  शकेल.
० किचन सुटसुटीत आणि मोकळे असावे. २-३ महिन्यांतून एकदा किरकोळ सामानाची अडगळ काढून टाकावी म्हणजे नंतर येणाऱ्या सामानासाठी जागा तयार होईल.
० वापरलेली भांडी साफ करून जागच्या जागी लावून ठेवावी. म्हणजे ओटय़ावर पसारा होणार नाही.
० काचेच्या भांडय़ांसाठी वेगळे शेल्फ असावे. काचेची भांडी इतर भांडय़ांबरोबर साफ करू नयेत. अन्यथा तडा जाऊ शकतो .
० किचन सफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू (डिर्टजट पावडर, क्लिनिंग ब्रश, स्क्रबर, लिक्विड सोप, भांडय़ांचा साबण, डस्टर इत्यादी) ठेवण्यासाठी सिंकच्या खालील मोकळ्या जागेचा वापर करता येईल.
० दुधाच्या पिशव्या वापरून झाल्यावर मध्ये फाडून टाकाव्यात, औषधांच्या बाटल्यांवरील लेबल काढून टाकावे, तेल किंवा इतर खाद्यपदार्थाच्या पिशव्याही फाडून कचऱ्यात टाकाव्यात. त्यामुळे या गोष्टींचा गैरवापर होणार नाही.
उषा वसंत unangare@gmail.com