* आल्याची पेस्ट करताना आले स्वच्छ धुऊन घ्यावे. ते कोरडे करून पाणी न घालता मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. त्यात थोडे मीठ व थोडे तेल घालून एकजीव करावे व घट्ट झाकणाच्या डब्यात भरून डीप फ्रिजरमध्ये ठेवावे. लागेल तेव्हा काही तास आधी फ्रिजरमधून काढून वापरून झाल्यावर पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवावे. पेस्टचा रंग व चव न बदलता खूप दिवस टिकते. याच पद्धतीने हिरव्या मिरच्या व लसूण याची पेस्ट करावी.
* पुदिन्याची पाने काचेच्या बाटलीत घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास ८-१० दिवस चांगली राहतात.
* शेंगदाण्याचा कूट करताना शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून भाजावे म्हणजे दाण्याची साले पटकन निघतात.
* पोळ्या, भाकरी डब्यात ठेवताना गरम भांडे ठेवण्यासाठी जे स्टॅण्ड वापरतो ते स्टॅण्ड पोळीच्या डब्यात ठेवून त्यावर पोळी, भाकरी, थालीपीठ ठेवावे. म्हणजे वाफेमुळे साचलेल्या पाण्यामुळे तळाची पोळी चिकट होणार नाही.
* कढईत भाजी, पुऱ्या, भजी करण्यापूर्वी कढई पूर्णत: कोरडी करून त्यात तेल घालावे व नंतर कढई गॅसवर ठेवावी. म्हणजे तळताना पदार्थ कढईला चिकटत नाही.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
how to make jackfruit sabzi recipe
Recipe : तेल न लावता, हात चिकट न करता चिरा भाजीसाठी फणस! ट्रिक आणि रेसिपी दोन्ही पाहा
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video