* मेणबत्ती फ्रिजमध्ये ठेवली की जास्त वेळ जळते.
* मेणबत्तीच्या बाहेरील बाजूने वॉर्निश लावावे, वॉर्निशच्या थरामुळे मेण लवकर वितळत नाही, त्यामुळे मेणबत्ती बराच वेळ जळते.
* घरात झुरळे फार झाली असतील तर बुस्ट, हॉर्लिक्सच्या बाटली सारखी रिकामी बरणी धुऊन कोरडी करावी आणि मुरंबा वा जाम बरणीच्या आतील बाजूला सर्वत्र लावावे. रात्री ही बाटली ज्या ठिकाणी झुरळे आहेत अशा ठिकाणी ठेवावी. गोडसर-आंबट वासाने झुरळे बाटलीत आकर्षित होतात. आणि त्यांना पकडणे सोपे जाते.
* वॉश बेसिन किंवा किचन सिंक तुंबत असेल तर त्याच्या जाळीमध्ये अर्धा कप बेकिंग सोडा घालावा आणि त्यावर अर्धा कप व्हिनेगर घालावे. नंतर पाणी घालून व्यवस्थित धुऊन घ्यावे. कचऱ्याचा निचरा होऊन पाणी सहजपणे निघून जाते.
* शर्टची कॉलर, हाताचे कफ, ड्रेसचा मानेकडील भाग तेलकट झाले असल्यास रात्री तेवढय़ा भागावर कोणतीही टॅल्कम पावडर चोळून ठेवावी व सकाळी नेहमीप्रमाणे धुवावे.
* मऊ  कपडा लिंबाच्या रसात बुडवून चामडय़ाच्या बॅगा किंवा चामडय़ाच्या वस्तू पुसून काढाव्यात, त्यामुळे वस्तूला चकाकी येऊन अगदी नव्यासारख्या दिसतात.
* फ्रिजवरील डाग काढायचे असतील तर स्पंजवर किंवा ओल्या कपडय़ावर टुथपेस्ट घेऊन डाग पुसावेत.
* काचेचे ग्लास एकमेकांत अडकलेले असल्यास रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावेत, सकाळी सहज अलग होतात.
* ओव्हनला खूप वास येत असेल तर रिकाम्या ओव्हनमध्ये साल काढलेला कांदा ठेवावा. १५ मिनिटे ओव्हन चालू ठेवावे, वास कमी होतो.
* वेलची, लवंग, मिरी हे कोरडेच कुटायचे झाल्यास कपडय़ात गुंडाळून कुटा. यामुळे ते सगळीकडे उडणार नाही.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com