कल्पना ही अत्यंत रोमँटिक स्वभावाची, आयुष्याकडे आनंदाने बघणारी आणि प्रेमासाठी आसुसलेली होती. पण महेशच्या सात्त्विकपणामध्ये सेक्सचा राजसपणा आढळत नव्हता. त्यामध्ये त्याच्या धार्मिकपणाचाही महत्त्वाचा वाटा होता. सेक्सचं एवढं काही महत्त्व नसतं आणि वाढत्या वयानुसार त्याची फार गरजही नसते, या विचारांनी तो त्याच्या आयुष्याकडे बघत होता. त्यांच्या वैवाहिक जीवनात कमतरता होती ती व्हिटॅमिन ‘एस’ ची.
‘सर हिला गेली तीन वष्रे एका मानसोपचारतज्ज्ञाचे उपचार चालू आहेत. तरीही अजून तिला वेगवेगळे भास होतच आहेत. त्यामुळे तीसुद्धा त्रासते आणि तिच्या कामावरही परिणाम होतो. आणि खरं सांगतो मलाही बराच मनस्ताप होतो.’
महेश अतिशय हताशपणे बोलत होता. माझ्यासमोर बसलेले ते मध्यमवर्गीय जोडपे. महेश आणि कल्पना. तो बेचाळीसचा तर ती साधारण अडतीस वर्षांची. ती सरकारी ऑफिसमध्ये कामाला होती. दोघेही दिसायला बऱ्यापकी व नेटनेटके होते. त्यांच्या लग्नाला जवळजवळ १२ वष्रे झाली होती. दहा वर्षांचा एक मुलगाही होता. आíथक विवंचनाही नव्हत्या. म्हणजे साधे, सरळ, समाधानी आयुष्य जायला काहीच हरकत नव्हती. पण तसं होत नाही हेच खरं!
महेशने सांगितले, ‘डॉक्टर, तुम्हाला खरं सांगतो मी धार्मिक वृत्तीचा माणूस. पण तरीसुद्धा काहीजणांनी सांगूनही मी इतर काही करण्याच्या भानगडीत पडलो नाही.’
गेली चार पाच वष्रे कल्पनाला सतत काही ना काही तरी भास होत होते. सुरुवातीला ते कधी कधीच व्हायचे, पण गेली दोन वष्रे तरी ते सतत होत होते. तिच्या मेंदूत काहीतरी ‘केमिकल लोचा’ झाल्याचे महेशचे मत झाले होते. मानसोपचारतज्ज्ञाचे उपचार नियमितपणे चालू होते, तरीही तिच्या भासांचे प्रमाण वाढलेले असल्याने गोष्टीत काहीतरी गंभीर असावे असे त्याला आता वाटू लागले होते. आणि बरेच भास सेक्ससंबधित होत असल्याने माझेही मत घेण्याचे ठरले.
‘कल्पना, तुला काय काय भास होतात आणि कधीपासून?’ मी तिला मन मोकळे करण्यासाठी विचारले.
‘डॉक्टर, मला सतत कोणीतरी माझ्यामागे येतंय, मला पकडतंय, मला स्पर्श करतंय असे भास होतात. पूर्वी ते कधीतरी व्हायचे. पण आता मात्र वारंवार होत असतात.’ कल्पनाला हे सांगतानासुद्धा खूप दडपण आलेले जाणवत होते.
‘कोण असते ते? कोणी एक विशिष्ट व्यक्ती का कोणी अनोळखी? आणि एक का अनेक?’ मी एकामागून एक प्रश्न विचारायला सुरुवात केली.
कल्पना जरा हळू आवाजामध्ये बोलली, ‘तसे कोणीही. काहीवेळा तर अनेकसुद्धा.’
‘हं, आणि काही विशिष्ट प्रकारचेच भास होतात का ..?’ मी वाक्य मुद्दामच अर्धवट सोडून दिले.
‘माझा पाठलाग करतायेत, मला पकडतायेत, मला स्पर्श करतायेत’ कल्पना त्या भास-विश्वात गुंग झाली.
‘दोन आठवडय़ांपूर्वीचीच गोष्ट. आम्ही सर्व, म्हणजे मी, महेश आणि आमच्या जवळच्या दोन कुटुंबातली आमची मित्रमंडळी जवळच एका ट्रिपला गेलो होतो. कोणाचीच मुले नव्हती. मस्त मजेत फिरणे, जेवणखाण, खेळ यामध्ये वेळ घालवत होतो. महेश आणि मी तर पूर्णपणे रमलो होतो. दुपारच्या विश्रांतीच्यावेळी मला अचानकच काही तरी वाटू लागले. मी घाबरले. महेशला मी सांगितले की मला कसंतरीच होतंय. कोणीतरी मला पकडतंय. मी महेशला घट्ट धरून ठेवले. त्याला आता याची सवय झाल्यामुळे त्याने न घाबरता मला जवळ धरून ठेवले आणि माझ्या केसांवरून हात फिरवू लागला. मी डोळे घट्ट बंद करून त्याच्या कुशीत अंग आवळून बसले. थोडय़ा वेळाने त्या व्यक्तीने मला सोडले. पण मला मात्र त्या धक्क्यातून बाहेर पडायला वेळ लागला ..’ कल्पना रडवेली झाली होती. तिच्यासमोर तो प्रसंग पुन्हा उभा राहिला.
‘असे प्रसंग किती वेळा येत असतात?’ मी.
‘त्याबद्दल काही सांगता येणार नाही.’ महेशने पुन्हा बोलायला सुरुवात केली, ‘कधी कधी आठवडय़ातून एखादेवेळी, तर कधी कधी तीन चार वेळासुद्धा. पण आता मात्र याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मला हिची फार काळजी वाटायला लागली आहे. एकतर मला माझ्या कामामुळे वेळ मिळत नाही. मुलाला पण आईला काहीतरी आजार आहे, असं जाणवत असल्याने तोही काळजी करत असतो. बाळाच्या जन्मानंतरच हे प्रकार सुरू झाल्याने काही लोकांना वेगळीच शंका येत आहे. अर्थात मी आधुनिक विचारसरणीचा असल्याने अशा शंकांकडे मी दुर्लक्षच केले आहे. आणि म्हणूनच आधुनिक वैद्यकीय उपचार करीत आहे. मानसोपचार चालू आहेत. झोप व्यवस्थित लागत आहे तरी हे तिचे अ‍ॅटॅक जात नाहीयेत. काही तरी उपाय सांगा.’
मला कल्पनाच्या समस्येची सर्वसाधारण कल्पना आली. निश्चितच याचा संबंध त्या दोघांच्या वैवाहिक जीवनातील महत्त्वाच्या कमतरतेशी होता. त्या दोघांचे कामस्वास्थ्य ठीक नव्हते हेच खरे. त्याचा विचार करणे आता गरजेचे होते. त्यासाठी सविस्तर माहिती मिळवणे आवश्यक होते. मी त्या दोघांपकी प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलायचे ठरवले.
कल्पनाच्या माहितीवरून लग्नाच्या सुरुवातीच्या काळापासूनच महेश हा वैवाहिक संबंधांच्या बाबतीत उदास होता. कल्पना ही अत्यंत रोमँटिक स्वभावाची, आयुष्याकडे आनंदाने बघणारी आणि प्रेमासाठी आसुसलेली होती. आतूर होती. पण महेशच्या सात्त्विकपणामध्ये सेक्सचा राजसपणा आढळत नव्हता. त्यामधे त्याच्या धार्मिकपणाचाही महत्त्वाचा वाटा होता. सेक्सचं एवढं काही महत्त्व नसतं आणि वाढत्या वयानुसार त्याची फार गरजही नसते या विचारांनी तो त्याच्या आयुष्याकडे बघत होता.
पहिल्यापासूनच त्यांचे संबंध हे महिन्यातून दोन किंवा तीनवेळाच येत गेले. त्यात मुलाचा जन्म झाल्यावर आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण पार पाडली आणि आता सेक्स हा विषय नगण्य झाला आहे याच विचारांनी त्याचे वागणे सुरू होते. आता तर तीन-चार महिन्यांतून एकदा या प्रमाणावर त्यांचे कामजीवन येऊन थांबले होते.
रोमँटिक कल्पना आणि तिच्या कामगरजांकडे पूर्ण दुर्लक्ष करणारा महेश यांचे आयुष्य जगाच्या दृष्टीने जरी सुखी दांपत्य म्हणून होते, तरी कल्पनाच्या नजरेत ते रूक्ष वाळवंटासारखे होते. तिला तिच्या मनाची ही कुतरओढ फारच त्रासदायक झाली होती. परंतु तिचा स्वभावच सोज्वळ असल्याने ती तिच्या या अशा लंगिक कुचंबणेविषयी सोशीक बनली होती.
कल्पनाच्या मनावर त्याच्या या कामवर्तणुकीचा परिणाम झाला असणार याची अंधूकसुद्धा कल्पना महेशला नव्हती. त्याला याचा गंधही नव्हता की त्याचे दांपत्य जीवनातील वादळाचे मूळ कारण तोच होता. महेशला आपलं काही चुकतेय असं अजिबात वाटत नव्हते. कारण त्याच्या विचारांमध्ये बदल करण्यासारखी चर्चा त्याच्याबरोबर कुणाचीच झाली नव्हती. ना कल्पनाने सेक्सचा विषय त्याच्याबरोबर काढला होता. कल्पनाला गेली काही वष्रे मानसोपचार चालू होते, औषधोपचार नियमित चालू होते, पण तिथेही त्यांच्या सेक्सलाईफची चर्चा कधीही झाली नाही.
दाबली गेलेली लंगिकता आणि शृंगाराच्या अभावाने बनलेली रूक्ष जीवनशैली यामुळेच कल्पनाला कल्पनाविश्वात रमण्याचा छंद लागला. मनामध्ये घोळत राहणाऱ्या सेक्सच्या संवेदनांनी कळत नकळत ती सेक्सच्या कल्पनाविश्वात स्वतला रमवू लागली होती. त्यातून ती आनंद शोधत होती, मिळवत होती. जे जे प्रत्यक्षामध्ये घडावेसे वाटत होते ते ते तिच्या कल्पनेत ती आणत होती. याची तीव्रता इतकी होती की तिच्या कळत नकळत त्या कल्पनांचे घटनांमध्ये रूपांतर करून ती जगू लागली. त्या घटनांना ती अनुभवू लागली.     (पान ६ वर )
(पान ३ वरून) त्यातून तिचे मानसिक संतुलनही बिघडायला लागले. तिच्या मनाच्या नतिकतेच्या जाणिवा जेव्हा टोचू लागायच्या, तेव्हा मात्र अपराधी भावना जाणवून ती हवालदिल व्हायची.
‘हॅल्युसिनेशन्स’मुळे कल्पनाचेच नव्हे, तर महेशचेही विश्व ढवळून निघाले होते. याचा उपाय एकच होता तो म्हणजे व्हिटॅमिन एस् (सेक्सलाईफ)चे महत्त्व समजावून देऊन त्या दोघांचे कामस्वास्थ्य सुधारणे. जीवनसत्त्वांची शारीरिक निकड वैद्यकशास्त्राला जेव्हापासून लक्षात आली तेव्हापासून शरीरस्वास्थ्यासाठी विशिष्ट व्हिटॅमिनची कमतरता तर नाहीयेना याचाही विचार होऊ लागला. मग तसे असल्यास त्या जीवनसत्त्वाचा वापर करून शरीरस्वास्थ्य टिकवण्याचा उपाय आवश्यक ठरू लागला. कामस्वास्थ्यासाठीही असेच व्हिटॅमिन एस् (सेक्सलाईफ) आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यक असते. त्यामुळेच दांपत्यस्वास्थ्य व पर्यायाने समाजस्वास्थ्य सुधारत असते.
 महेशच्या मनावर मला हे िबबवावे लागले की, कामजीवन ही महत्त्वाची प्रापंचिक जबाबदारी आहे. ‘सेक्स’ हा प्राणीजगताचा स्थायीभावच असल्याने ते टाळणे हे अनसíगकच मानले पाहिजे.
तहान, भूक यासारखी ती मूलभूत प्रेरणा असल्याने मेंदू जिवंत असेपर्यंत तीही जिवंतच असते आणि म्हणून या भावनेपासून निवृत्ती नसते हेही महेशला जाणवून दिले. माकड, एप आणि मानव यांसारख्या उच्चवर्गीय सस्तन प्राण्यांमध्ये सेक्स केवळ प्रजननासाठी नसून मनोरंजनासाठीही असते व प्रौढावस्थेतही त्याची आवश्यकता असते हे महेशला कळल्यावर त्याला आश्चर्य वाटले नसते तरच नवल!
गरसमजुतींमधून कामस्वभाव हा दाबला जात असतो. पती-पत्नींनी जर कामजीवनाविषयी सुसंवाद राखला नाही व योग्य मार्गदर्शन घेतले नाही तर अशी परिस्थिती निर्माण होते. त्याच्या बायकोची मनस्थिती तिच्या दाबल्या गेलेल्या कामेच्छांमुळे असून तिच्या मनोकल्पना भास-आभासचे रूप घेऊन जन्माला येत होत्या हे महेशला समजले व त्याची वैवाहिक जीवनातील काम-जबाबदारी त्याला लक्षात आली. मला ते बरेचदा त्यांना पटवून द्यावे लागले हे मात्र तितकेच खरे.                                              
shashank.samak@gmail.com

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच