नाचणी, नागली किंवा रागी या नावाने ओळखलं जाणारं हे भरड धान्य गरिबांचं अन्न म्हणून आजवर माहीत होतं, पण या गुणी नाचणीचं महत्त्व हल्ली खूपच जाणवायला लागलं आहे. लोह आणि कॅल्शियम यांनी युक्त असलेली नाचणी मुलांच्या वाढीसाठी अप्रतिम आहे. म्हणूनच नाचणी सत्त्वाची लापशी मुलांना देतात. तसेच मोड आलेल्या नाचणीच्या सेवनामुळे नाचणीतलं नैसर्गिक लोह शरीराला मिळतं आणि बाळंतिणीला दूध येण्यासाठी मदत होते. नाचणी ग्लुटेनफ्री आहे, नाचणीला कीड लागत नाही, हा तिचा आणखी एक गुण.
नाचणी सूप                                               
साहित्य : एक मोठा चमचा नाचणीचं पीठ, एक वाटी ताक, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळी मिरपूड, गाजर, भोपळी मिरची इ. भाज्यांचे बारीक तुकडे १ वाटी, ३-४ अक्रोड किंवा बदाम यांचे काप, चवीला मीठ, लसणीच्या दोन पाकळ्या बारीक चिरून, १ चमचा तूप, २ वाटय़ा पाणी आणि कोथिंबीर.
कृती : तूप गरम करून त्यात लसूण परतावी, भाज्या आणि अक्रोडचे बारीक तुकडे घालून परतावे, पाणी घालून शिजवावं, पाणी घालून उकळत ठेवावं. ताक आणि नाचणीचं पीठ एकत्र करून उकळत्या पाण्यात घालावं आणि शिजेपर्यंत ढवळत राहावं, मीठ, जिरेपूड, मिरपूड घालून खाली उतरावं, कोथिंबीर घालून गरम प्यायला द्यावं.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’