० पावसाळ्यात आपल्या मोबाइलसाठी वॉटरप्रूफ कव्हर्स, पाऊच किंवा पारदर्शी प्लॅस्टिक बॅगचा वापर करा. ते वॉटरप्रूफ असल्यामुळे मोबाइलमध्ये पाणी जाणार नाही.
० पावसाळ्यात इअरफोन किंवा ब्ल्यूटुथ हेडसेटचा वापर करावा. कारण पाऊस सुरू असताना फोन आल्यास इअरफोन वा ब्ल्यूटुथ डिव्हाइसचा वापर केल्यामुळे तुमचा फोन बॅगेत किंवा खिशात असल्याने सुरक्षित राहील.
० पाऊस सुरू असताना कॉल घेऊ -करू नका किंवा मेसेजही करण्याचा प्रयत्न करू नका. थोडय़ाशा निष्काळजीपणामुळे फोनमध्ये पाणी जाऊन फोनचे नुकसान होण्याचा धोका अधिक असतो.
० मोबाइलमध्ये पाणी गेल्यास तो बंद करून त्याचे वेगवेगळे भाग बाहेर काढून तो पूर्ण सुकवून घ्या आणि मगच सुरू करा, ओला असताना ऑन केल्यास हॅण्डसेटचे नुकसान होऊ  शकते.
० मोबाइलमध्ये पाणी गेल्याचा संशय जरी आला तरी तो चाìजगला लावू नये. त्याने हॅण्डसेट खराब होऊ  शकतो.
० मोबाइलमध्ये गेलेले पाणी सुकल्यावर प्रथम मोबाइल ऑन करा. तो व्यवस्थित ऑन होत असेल तरच मोबाइल चाìजगला लावा.
० मोबाइलमध्ये पाणी गेल्यास आधी बॅटरी काढून सुकत ठेवा आणि हॅण्डसेट सुकण्यासाठी उन्हात ठेवा किंवा मऊ  कोरडय़ा कपडय़ाने पुसून घ्या. चुकूनही बॅटरी उन्हात ठेऊ  नका.
० फोनमध्ये नाजूक आणि हलके घटक असल्यामुळे उष्णता आणि आग यांमुळे ते खराब होऊ  शकतात. म्हणूनच हॅण्डसेट सुकवण्यासाठी ड्रायरसारख्या उपकरणांचा उपयोग करू नका.
० मोबाइल, टॅब, लॅपटॉपमध्ये रिचार्जेबल बॅटरी वापरली जाते. तिची क्षमता हळूहळू कमी होत जाते. ती वाढवण्यासाठी बॅटरी पूर्णत: संपण्याची वाट न बघता ६० किंवा ७० लाइफ असतानाच बॅटरी चार्ज करावी.
० मोबाइलची बॅटरी १० किंवा त्याहीपेक्षा कमी झाली असेल तर शक्यतो डिवाइस बंद करा. तशीच वापरू नका.
० रात्री मोबाइल चाìजगला लावल्यास त्याचे कव्हर काढून चार्ज करावा. कव्हर काढल्याने चाìजगमुळे निर्माण होणारी उष्णता बाहेर पडण्यास मदत होईल. यामुळे आपण आपल्या हॅण्डसेट आणि बॅटरीचे आयुष्य वाढवू शकतो.