कोमेलिया थिआ नावाच्या छोटय़ा वृक्षाची पाने तोडून त्यापासून चहा तयार केला जातो.  चहा हा थीएसी या कुळातला आहे. सुमारे १५०० ते १७०० वर्षांपूर्वी चिनी लोकांनी चहा हे पेय शोधून काढले आहे असे मानले जाते. भारतामध्ये आसाम, केरळ, दार्जििलग, बंगळुरू, डेहराडून या ठिकाणी पर्वतमय भागांत चहाची लागवड केली जाते.
चहा बनविण्याची प्रक्रिया
चहाच्या अनेक जाती आहेत.  चहाचे वृक्ष थंड हवामानात डोंगर-उतारावर लावले जातात. चहाची नाजूक पाने खुडून ती सुकविली जातात. त्यानंतर त्यांना गरम करण्यात येते या प्रक्रियेमुळे चहाच्या पानातील सुगंध व स्वाद वाढतो.  चहाची किंमत ही त्या पानांचा चुरा व सुगंधावर अवलंबून असते. चहाचा चुरा जेवढा मोठा तेवढा किंमत जास्त, म्हणून मोठा चुरा, लहान चुरा, बारीक पावडर इत्यादी प्रकारात त्याची विभागणी केली जाते. बारीक पावडर स्वरूपातील चहामध्ये टॅनिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते व हे टॅनिक अ‍ॅसिड शरीरावर विषाप्रमाणे काम करते त्यामुळे सहसा पावडर स्वरूपातील चहा खरेदी करु नये.  चहामध्ये असणाऱ्या कॅफिन, टॅनिक अ‍ॅसिड व सुगंधित तेल द्रव्यांमुळे चहा हा मादक होतो,  तरीही अजूनच चहा मादक, कडक बनविण्यासाठी कारखानदार, त्याच्यावर टॅनिक अ‍ॅसिड व कॅफिनचे कृत्रिमरीत्या वेगवेगळे थर चढवितात व त्यात भेसळ करतात. या चहा बनविण्याच्या रासायनिक प्रक्रियेमुळे नसíगकरीत्या पानांमध्ये असलेली प्रथिने (प्रोटीन) नष्ट होतात व त्यामुळे चहामध्ये कोणतेही शरीरास आवश्यक असलेले पोषक घटक राहत नाहीत.
गुणधर्म
चहामध्ये टॅनिक अ‍ॅसिड (६ ते १२ टक्के), कॅफिन (१.६ टक्के)उडनशील तलद्रव्ये व सुक्ष्म प्रमाणात थिओफायिलन असते.  चहाचा स्वाद त्यामधील तल द्रव्यांवर अवलंबून असतो.  चहाचा रस हा कषाय, विपाक कटू आणि उष्ण आहे. रोज अर्धा कप चहा पिण्याने उत्साह वाढतो म्हणून      बुद्धीजीवी व्यक्तींचे चहा हे आवडते पेय आहे. परंतु चहा जास्त प्यायल्याने त्याची व्यसनाधीनता निर्माण होते व त्यातूनच विविध आजारांची लागण होते. चहा प्यायचाच असेल तर दिवसभरातून फक्त अर्धा कप सकाळी व अर्धा कप संध्याकाळी असा घ्यावा. त्यासाठी ग्रीन टीचा वापर करावा ग्रीन टी म्हणजे चहाच्या झाडाची तोडलेली कोवळी सुकवलेली पाने! या ग्रीन टी वर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे या ग्रीन टी मधून शरीराला आवश्यक असलेली अ‍ॅन्टी ऑक्सिडंट मिळतात.  त्यामुळे शरीर उत्साही राहाते व चहामधील सर्व नसíगक मूलद्रव्य मिळतात. चहा जितका जास्त प्रमाणात उकळला जातो तितके अधिक टॅनिक अ‍ॅसिड चहामध्ये उतरते.
चहा करण्याची योग्य पद्धत म्हणजे पातेल्यात पाणी उकळून घ्यावे त्यानंतर गॅस बंद करून, उकळलेल्या पाण्यात चहाच्या वाळलेल्या पानांचा चुरा टाकावा व त्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवावे.  हे चहाचे पाणी गाळून त्यात साखर व दूध एकत्र करावे अशा पद्धतीने बनविलेला चहा फक्त अर्धा कप घ्यावा. हा चहा पिल्याने मज्जासंस्थेला उत्तेजना मिळून शरीराचा थकवा दूर होतो व उत्साह वाढतो.
चहा घेतल्याशिवाय कामच करता येत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. परंतु अधिक उकळून वर आपण त्यामध्ये साखर मिसळतो. त्याने  चहामधील सर्व पोषणमूल्यं नष्ट होऊन उरते ते फक्त रासायनिक द्रव्य ! अशा चहामुळे शरीराची हानी मोठय़ा प्रमाणात होते. उदा.  यकृतात निर्माण होणाऱ्या स्रावाला हानी पोहचते त्यामुळे यकृताचे व पित्ताशयाचे आजार जडतात. * रक्तवाहिन्या लवचिक न राहता त्यांच्यात काठिण्य निर्माण होते त्यामुळे शरीराला रसरक्तपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होतो व यातूनच रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा हे आजार होतात. *अतिचहा प्यायल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो.* अति चहामुळे गुद्भागातील रक्तवाहिन्यांमध्ये काठिण्य निर्माण होऊन त्या तुटतात व मुळव्याधाची निर्मिती होते. * अति चहामुळे शरीरात लोहाचे व कॅल्शिअमचे शोषण कमी होते व त्यामुळेच अ‍ॅनिमिया व हाडांचा ठिसूळपणा(ऑस्टिओपोरॉसीस) हे विकार जडतात.
  पूर्वीच्या काळी अतिथींचे स्वागत करण्यासाठी गूळ पाणी, नुसते दूध, खजुरांचे सरबत असे पदार्थ वापरत असत. हे सर्व पदार्थ पौष्टिक आणि आरोग्यमय होते.  सध्याही आपण लाल गूळ, गवती चहा, सूंठ, तुळशीची पाने, पुदिना यांचे कपभर पाण्यातील मिश्रण उकळून नसíगक आरोग्यपूर्ण चहा देऊ शकतो. अशाच पद्धतीने आवळा पावडर उकळून त्याचाही आवळाचहा बनविता येतो.  अतिथींसाठी गरमागरम चहा न देता त्याऐवजी िलबू-गूळ पाणी, नसíगक चहा, विविध ताज्या फळांचा रस, नारळ पाणी, खजूर सरबत देता येईल.
 डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Gold Silver Price
Gold-Silver Price on 23 March 2024: होळीच्या पूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण, खरेदी करण्याआधी पाहा आजचे दर