* टोमॅटो उकळलेल्या पाण्यात टाकून २-३ मिनिटाने बाहेर काढून त्याची साल काढा आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या. हा रस आइस ट्रेमध्ये टाकून डीपफ्रीजरमध्ये ठेवा. बर्फाप्रमाणे घट्ट झाला की त्यातील एक-एक खडा काढून हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजरमध्येच ठेवा. टोमॅटो नसल्यास या क्युबचा वापर करता येतो
*  स्वयंपाकघरात वेगवेगळे वास कोंडलेले असल्यास एका वाटीत व्हिनेगर घेऊन ती वाटी शेगडीच्या जवळपास ठेवावी किंवा व्हिनेगरमध्ये ४-५ लवंगा टाकून व्हिनेगरची वाफ होऊन जाईपर्यंत उकळत ठेवावे. सर्व वास निघून जातात.
 * कात्रीची धार बोथट झाली असेल तर काचेच्या बाटलीच्या तोंडाकडील खाचेत कात्री कापल्याप्रमाणे थोडा वेळ घासावी पात्याला धार येते.
 * टोमॅटो सॉसच्या नवीन बाटलीतील सॉस येत नसेल तर बाटलीत स्ट्रॉ तळापर्यंत घालावा. बाटलीतून सॉस सहज बाहेर काढता येतो.
* दोन भांडी एकात एक अडकल्यास बाहेरचे भांडे गरम पाण्यात ठेवावे व वरच्या भांडय़ात फ्रीजचे थंडगार पाणी टाकावे, भांडी लवकर वेगळी करता येतात.
* बरणीचे झाकण घट्ट बसल्यास झाकणाच्या कडेला तेल व मीठ चोळून ठेवावे व थोडय़ा वेळाने झाकण फिरवून काढावे
* कुकरमध्ये भात करताना बऱ्याचदा तो भांडय़ाबाहेर उडतो. अशा वेळी नेहमीपेक्षा पाणी कमी टाकावे व त्यात मीठ घालावे, भात भांडय़ाबाहेर येत नाही.
* पुऱ्या किंवा वडे करताना पिठात थोडा रवा टाकावा व पीठ भिजवावे. पुऱ्या-वडे खुसखुशीत होतात व तेलही कमी लागते.
* सुक्या लाल मिरच्या देठ काढून हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवाव्या. सादळत नाही किंवा बुरशीही पकडत नाही.
* सोललेले किंवा न सोललेले काजूगर प्लॅस्टिक बॅगेत ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात पोरकिडे होत नाहीत. ओल्या काजूगराची साले पटकन निघतात.
* कांद्याचे चार भाग करून कांदे सोलावे, साल पटकन निघते.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com