१९८९ मध्ये हिपॅटायटिस ‘’सी’ या विषाणूचा शोध लागला व कालांतराने नॉन ए, नॉन बी हिपॅटायटिसपकी मोठय़ा प्रमाणावरच्या केसेस या हिपॅटायटिस ‘सी’च्या असल्याचे आढळून आले.जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील लोकसंख्येपकी ३ टक्के लोक या विषाणूने बाधित आहेत. वेळीच सावधानता बाळगली तर या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही
पुण्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांनी एका कार्यक्रमामध्ये त्यांची आठवण सांगितली. एका नवजात बालकाला त्याचे कुटुंबीय उपचारासाठी त्यांच्याकडे घेऊन आले. डॉक्टरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची योग्य ती काळजी घेतली. बाळाचे हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे त्यास रक्त संक्रमणसुद्धा करण्यात आले. रुग्णाचे नातेवाईक बाळ बरे झाल्यानंतर सर्वाना दुवा देऊन घरी गेले. नंतर काही महिन्यांनी तेच बाळ कावीळ झाल्यामुळे परत रुग्णालयात आले. तपासणी केल्यानंतर हिपॅटायटिस विषाणू संसर्गामुळे कावीळ झाल्याचे लक्षात आले आणि त्याच आजारात ते दगावले.  ही घटना सांगण्यापाठीमागचा उद्देश एवढाच की, हिपॅटायटिस विषाणूचे गांभीर्य लक्षात यावे. ते सर्वाच्या लक्षात यावे यासाठी दरवर्षी २८ जुलैला जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत काविळीचे फक्त दोन प्रकार ज्ञात होते. हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी, जे विषाणूमुळे होतात. १९७० च्या सुमारास ‘हिपॅटायटिस ए/बी’ व्यतिरिक्त काही इतर विषाणूंची शक्यता व्यक्त झाली होती. इतर प्रकारच्या काविळीला नॉन ए, नॉन बी हिपॅटायटिस असे संबोधले जायचे. १९८९ मध्ये हिपॅटायटिस ‘सी’ या विषाणूचा शोध लागला व कालांतराने नॉन ए, नॉन बी हिपॅटायटिसपकी मोठय़ा प्रमाणावरच्या केसेस या हिपॅटायटिस ‘सी’च्या असल्याचे आढळून आले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील लोकसंख्येपकी ३ टक्के लोक या विषाणूने बाधित आहेत.
हिपॅटायटिस ‘सी’ कसा होतो?
* रक्त व रक्तघटक यांच्या संक्रमणाने या विषाणूची लागण होते.  * शिरेतून अमली पदार्थ घेणाऱ्यांमध्ये एकमेकांची सुई वापरल्यामुळे एचआयव्हीप्रमाणेच हिपॅटायटिस ‘सी’चा संसर्ग होण्याचा मोठा धोका संभवतो. * दूषित उपकरण वापरून गोंदवणे, कान टोचणे, अ‍ॅक्युपंक्चर.           * संसर्गित व्यक्तीच्या खासगी वस्तू जसे दूषित ब्लेड, टुथब्रश वापरणे. * वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना हिपॅटायटिस सी संसर्गित रुग्णांवर उपचार करताना, त्यांचा रक्तनमुना हाताळताना या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता राहतेच. * संसर्गित व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंधातून किंवा गरोदर मातेकडून आपल्या बाळाला या विषाणूची बाधा होऊ शकते.
* अवयव प्रत्यारोपण व डायलिसिसचे उपचार घेणारे रुग्ण हेही बऱ्याचदा हिपॅटायटिस ‘सी’चे बळी ठरतात.
हिपॅटायटिस ‘सी’ची लागण पुढील गोष्टींमुळे होत नाही हे लक्षात घ्यावे-
* ही कावीळ दूषित पाणी/दूषित अन्नाद्वारे.         * हिपॅटायटिस सी झालेल्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, त्याच्या श्वासाद्वारे अथवा स्पर्शाद्वारे, स्वयंपाकात भांडी वगैरे एकत्रित वापरल्याने. * संपूर्ण संलग्न त्वचेतून विषाणू आत शिरू शकत नाही.        * स्तनपानातून बाळाला या विषाणूचा संसर्ग होत नाही असे आढळून आले आहे.
हिपॅटायटिस ‘सी’ – प्रकार व लक्षणे
सामान्यत: दोन प्रकारांमध्ये हिपॅटायटिस ‘सी’चा आजार दिसून येतो. अ‍ॅक्युट हिपॅटायटिस ‘सी’मध्ये  संसर्गानंतर कमी कालावधीमध्ये या आजाराची लक्षणे दिसण्यास प्रारंभ होतो. १५ ते २० टक्के लोकांना हा आजार दिसून येतो, ज्यामध्ये भूक मंदावणे, वजन भराभरा कमी होणे, अतिशय थकवा, उलटी, मळमळ, हातपाय दुखणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. या प्रकारात पिवळेपणा (त्वचा/डोळे/लघवी पिवळी होणे) सुरुवातीला सहसा दिसून येत नाही. हे लक्षण वगळता वरील सर्व लक्षणे हिपॅटायटिस ए किंवा इतर काविळीच्या प्रकारांप्रमाणेच आढळतात.
क्रोनिक हिपॅटायटिस ‘सी’
हिपॅटायटिस ‘सी’ बाधित बहुतांश लोकांमध्ये क्रोनिक हिपॅटायटिस ‘सी’ हा प्रकार दिसून येतो. या रुग्णांमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्यापासून १० ते २० वर्षे अनेक वेळा काहीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. (A symptomatic stage).
रुग्णास साधारण २० ते ३० वर्षांनंतर यकृताची कार्यक्षमता कमी होण्याची लक्षणे दिसू लागतात. यात प्रामुख्याने पोटात दुखणे, जलोदर, रक्तस्राव, त्वचेवर लाल चट्टे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. आजार बळावल्यावर नंतर बोलण्यातील असंबद्धपणा व इतर चेतातंतूविषयक लक्षणे आढळतात. (Hepatic Encephalopathy)
रुग्णांमध्ये जर एचआयव्ही, गुप्तरोग अथवा अन्य प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार असतील तर त्या रुग्णांमध्ये हिपॅटायटिस ‘सी’ आजार लवकर बळावतो. हिपॅटायटिस ‘सी’मुळे काही रुग्णांमध्ये यकृताची कार्यक्षमता नष्ट पावते तसेच त्यांच्यामध्ये यकृताचा कर्करोगसुद्धा होताना दिसतो. मद्यपान करणाऱ्या किंवा कुपोषित व्यक्तींमध्ये हिपॅटायटिस ‘सी’मुळे लिव्हर सिरॉसिस आणि कर्करोगाची शक्यता अधिक असते. या सर्व प्रकारांमध्ये रुग्ण दगावू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका पाहणीनुसार ४२ टक्के यकृताच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हिपॅटायटिस ‘सी’ची बाधा झालेली आढळलेली होती.
निदान व तपासण्या
रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करून हिपॅटायटिस ‘सी’चे निदान करता येणे आता सहज शक्य झाले आहे. त्यातील अचूकता वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानांचा वापर केला जातो, ज्यामध्ये सोप्या रॅपिड कार्ड टेस्ट तर यंत्रसामग्री लागणाऱ्या एलायझा टेस्ट आहेत. या तपासण्यांमध्ये हिपॅटायटिस संसर्ग झाल्यानंतर शरीराने प्रतिक्रिया म्हणून निर्माण केलेल्या अ‍ॅन्टिबॉडीज शोधल्या जातात. विषाणूचा डीएनए शोधणाऱ्या अत्यंत आधुनिक न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लिफिकेशन टेस्ट (NAT) सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच यकृताच्या कार्यक्षमता तपासण्यासाठीसुद्धा विविध तपासण्या उपलब्ध आहेत ज्यांना लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) असे म्हणतात. सोनोग्राफीच्या साहाय्याने यकृतामध्ये होणारे बदलसुद्धा तपासले जातात. ज्यामुळे लिव्हर सी-हॉसीस व कर्करोग याची शक्यता आढळल्यास लिव्हर बायोप्सीच्या साहाय्याने सी-हॉसीस व कर्करोग याचे निदान करता येते.
प्रतिबंध – हाच खरा इलाज
* हिपॅटायटिस ‘सी’ या विषाणूशी लढण्यासाठी इंटरफेरॉन हे औषध उपलब्ध आहे. ते बऱ्याच कालावधीसाठी घ्यावे लागते आणि तरीदेखील रुग्ण पूर्णपणे बरा होईलच याची खात्री देता येत नाही.
* सी-हॉसीस झाल्यानंतर सध्या तरी केवळ यकृताचे प्रत्यारोपण करणे हा एकमेव उपचार उपलब्ध आहे. एकंदरीतच हिपॅटायटिस ‘सी’चे उपचार खूप खर्चीक आहेत म्हणूनच हा आजार होऊ न देण्यासाठी खूप काळजी घेण्याची आवश्यकता असते.
हिपॅटायटिस ‘बी’ प्रकारच्या काविळीप्रमाणे हिपॅटायटिस ‘सी’करिता सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. या विषाणूची लागण होणार नाही याची काळजी घेणे हेच सर्वोत्तम प्रतिबंधक शस्त्र आपल्याकडे आहे. इंजेक्शनच्या सुया, रेझर, धारदार ब्लेड यांचा एकमेकांसाठी पुनर्वापर न करणे व रक्त व रक्तघटकांचा रुग्णांसाठी वापर होत असताना ते हिपॅटायटिस सी विषाणू यापासून मुक्त असल्याची खात्री करून घेणे हे या संसर्गापासून दूर राहण्यासाठी सगळ्यात योग्य मार्ग आहेत.
रक्तालाही गरज असते सुरक्षिततेची  (नॅट तपासणी)  –
 रक्त व रक्तघटक हे रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात; परंतु विविध आजारांचा संसर्ग दूषित रक्तामुळे रुग्णास होऊ शकतो. याच कारणांमुळे भारतामध्ये रक्तदात्याकडून रक्त संकलित केल्यानंतर त्यावर हिपॅटायटिस बी आणि सी, एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग यांची तपासणी करणे बंधनकारक आहे. या तपासण्यांमुळे रुग्णांमध्ये वरील आजारांचा संसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे रक्तावाटे हिपॅटायटिस ‘सी’सारखे आजार रोखण्यासाठी अत्यंत आधुनिक आणि अचूक तपासण्यांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. सध्या सर्वदूर एलायझा तंत्रज्ञानाचा वापर या तपासण्यांसाठी केला जातो; परंतु हे तंत्रज्ञान पूर्णत: सुरक्षित नाही. विषाणू शरीरात आल्यापासून प्रतिक्रिया म्हणून अँटिबॉडी तयार होणे या कालावधीमध्ये एलायझा हिपॅटायटिस ‘सी’ संसर्ग ओळखू शकत नाही. यास ‘विंडो पीरियड’ असे म्हणतात. हा विंडो पीरियड ७० ते ७५ दिवसांचा असतो. या कालावधीमध्ये रक्तदात्याकडून संकलित रक्त रुग्णांस दिल्यास हिपॅटायटिस ‘सी’चा धोका संभवतो. म्हणून हिपॅटायटिस ‘सी’चा संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा डीएनए शोधणारी न्यूक्लिक अ‍ॅसिड तपासणी शोधली गेली. आताच्या घडीला ही जगातील सर्वात सुरक्षित रक्त तपासणी पद्धत आहे आणि आज सर्व प्रगत देशांमध्ये अशी तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता भारतामध्येसुद्धा काही ठिकाणी या तपासण्या करून रक्त व रक्तघटक देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीमध्ये ही नॅट तपासणी आता उपलब्ध झाली आहे. हिपॅटायटिस ‘सी’चा संसर्ग टाळण्यासाठी नॅट तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याची आवश्यकता आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!