sahrउर्दू साहित्यातील ‘फेमिनिस्ट पोएट्स’ म्हणून ओळखली जाणारी किश्वर नाहीदच्या भाषेतील आक्रमक बंडखोरी अधिक वेधक व प्रांजळ आहे. ती भूमिका घेत नाही. तिचं व्यक्तिमत्त्व अन् काव्य पारदर्शी आहे. आणि भाषा जहाल.

‘‘बुरी हर वो औरत होती है,
जो अपने खानदान से बग़ावत (विद्रोह, बंड) करती है..
मने सिर्फ़ जो दरवाजे बंद थे उन्हें खोला,
तो सब लोगोंने मुझे ‘बुरा’ कहा.’’

‘‘मेरी शायरी में पीडित बेबस और अजाब (यातना) में जकडम्ी औरत इस लिये नज़्‍ार आती हैं, क्योंकि मेरे समाज में ८७ प्रतिशत औरते इसी हाल में जिंदा हैं.’’

‘‘अपने समाज में औरत शुऊर नहीं हासिल करेगी जब तक उसका मर्द के साथ मुहब्बत का रिश्ता नहीं बनेगा, उस वक्त तक सेवक, गुलाम और स्वामी का रिश्ता है.’’
ही वक्तव्ये आहेत उर्दूची ‘फेमिनिस्ट पोएट्स’ म्हणून ओळखली जाणारी किश्वर नाहीदची (किश्वर म्हणजे देश, राष्ट्र, महाद्वीप आदी आणि नाहीद म्हणजे शुक्रग्रह) तसं पाहिलं तर उर्दूच्या बहुतांश शायरा स्त्रीवादीच आहेत. पण किश्वरच्या भाषेतील आक्रमक बंडखोरी अधिक वेधक व प्रांजळ आहे. ती भूमिका घेत नाही. तिचं व्यक्तिमत्त्व अन् काव्य पारदर्शी आहे. ती म्हणते,
कधी तरी डोकावून तर बघ हृदयरूपी मदिरालयात
अन् कधी जगताचा मायावी तमाशा पाहा
काहीच नाही तर निदान
माझं नखशिखांत वैराण अस्तित्व बघ..

किश्वरची शायरी संकुचित विचारांच्या पुरुषसत्ताक सम्राज्याला निर्भीडपणे, परिणामाची तमा न बाळगता आव्हान देणाऱ्या कवीची बंडखोरी आहे. ती प्रतीकात्मकता/रूपकं यांचा सहसा आधार घेत नाही, तर थेटपणे समस्येला भिडते. आपल्या समाजातील स्त्रीची स्थिती ती खालील काही काव्य ओळीत सांगते.
घास भी मुझ जैसी है   
जरा भी सर उठाने के काबिल हो
तो काटनेवाली मशीन
तो उसे मखमख बनाने का सौदा (उन्माद) लिए
हमवार (एकरूप) करती रहती है
औरत को भी हमवार करने के लिए
तुम कैसे कैसे जतन करते हो
न जमीन की उभरने की ख्वाहिश मरती है
न औरत की..

किश्वरच्या शायरीतील कविता व ग़ज़्‍ालमध्ये व्यक्त होणारी स्त्री वेगवेगळ्या रूप-स्वरूपाची आहे. वरील कवितेत परिपक्व विचारांची प्रौढ स्त्री आहे तर ग़ज़्‍ालेतून साकारणारी स्त्री म्हणजे गृहिणी आहे, जी सर्वार्थाने घरकामात स्वत:साठी वेळ काढण्यास असमर्थ आहे.
घर के धंदे कि निपटते ही नहीं हैं ‘नाहीद’
मैं निकलना भी अगर शाम को घर से चाहूँ
नातेसंबंध जपता जपता ती स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवही विसरू लागते का? एवढं करूनही ती एकटीच असते.
मेरे पीछे मेरा साया होगा
पीछे  मुडकर भी भले क्या करना
अशा निष्कर्षांप्रत ती येऊन ठेपते.
दूसरों की सेवा
पत्थरों की सेवा के बराबर है
बहन, बीबी और माँ के रिश्तों
की खातिर जीनेवाली
तुम अपने लिए भी तो जियो
देखो कंवल का फूल कैसे आलम  (स्थिती)
और कैसे माहोल में अपनी अना (स्वाभिमान)
और अपने वजूद (अस्तित्व) का  ऐलान करता है.
..
अपने लिए जीना क्यों मुमकिन नहीं?

आपल्या समाजात स्त्रीचं स्थान किती गौण आहे याचं किश्वरला भान आहे. स्त्रीच्या अंतरंगाचा मागोवा कोणी घेत नाही. हे तिला खटकतं.

जिस्मों कीं हैंत (रूप-आकार) तो सब की एक -सी है
अंदर भला किसने झांका है
अंदर तो घोर अंधेरा है
हां सब का बाहर एक सा है

मानवी नशिबाचा आलेख लिहिणाऱ्याला ती बजावते,
मेरी जैसी माँ ने जनी थी
मीराबाई मतवारी
जिसके इश्क की गहरी प्यास को
पमानों ने लूट लिया
आशा, प्रेम इत्यादीपासून वंचित स्त्री आपली स्थिती सांगते,
ख्वाहिश मेरा पीछा करती रहती है
मैं कांटों के हार पिरोती रहती हूँ
देख के बाहर मंजर  नये बुलावे का
मैं खिडकी इंटों से चुन देती हूँ
जागते में लकडम्ी की तरह सुलगती हूँ
और सोते में चलती हवा से लडम्ती हूँ
किश्वर आपल्यातल्या स्त्रीची ओळख करून देते,
उम्र की खुशबू से थे दिल के भी तेवर जुदा
शाम की धूपों में अब जहर की रंगत हूँ मैं
गुलाब का रंग मेरे चेहरे पे नहीं ठहरता
और मेरी जुबान की सुर्खी
लाल पेन्सिल से बनी लगती है
कि मौसम बदलने के रुत मेरे अन्दर नहीं आती है
 किश्वर नाहीद तत्कालीन भारतातील बुलंद शहर येथे १९४० साली जन्मली. ती सय्यद कुटुंबातली असल्याने घरात बुरखा घालण्याचे बंधन होते. पण विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर तिने बुरखा घालणे सोडले. फाळणीनंतर कुटुंबासह ती लाहोरला स्थायिक झाली. लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. केलं. उर्दू शायर युसूफ कामरानशी तिचा विवाह झाला. मूल झाल्यानंतर युसूफच्या अकाली मरणामुळे तिने नोकरी स्वीकारली ती ‘पाकिस्तान नॅशनल कौन्सिल ऑफ द आर्ट’ची डायरेक्टर जनरल होती. ‘माहे नॉ’ या उर्दू साहित्यिक मासिकाची संपादकही होती. आर्थिक मिळकत नसलेल्या स्त्रियांना आíथक आधार देण्यासाठी ऌअहहअ ही संस्था तिने स्थापन केली.
किश्वरचे काव्यसंग्रह ‘लबेगोया’, ‘दश्ते कैस में लला’, ‘मलामतों के दरमियाँ’, ‘बेनाम मसाफत’, ‘खयाली शख्स से मुकाबिले’, ‘सियाह हाशिये में गुलाबी रंग’ अन् ‘दायरों में फैली लकीर’ हे आहेत. ‘बुरी औरत की आत्मकथा’ हे तिचे चरित्र वादग्रस्त ठरले.
‘लबेगोया’ या संग्रहासाठी १९६९ मध्ये किश्वरला ‘आदमजी प्राइज ऑफ लिटरेचर’ मिळाले तसेच बालसाहित्याचे युनोस्को अवॉर्ड, अनुवादाचे कोलंबिया युनिव्हर्सिटिचा पुरस्कार, मंडेला अवॉर्ड व २००० मध्ये सर्वोच्च सन्मान ‘सितारा ए इम्तियाज’ने पाकिस्तान सरकारने तिचा यथोचित गौरव केला.
किश्वर नाहीदच्या विद्रोही स्वरांच्या काव्यासह काही तरल क्षणांच्या शब्दचित्रांचेही अवलोकन करू या-
बाहों के समन्दर में उतरुँ
आँखों में लिखी किताब सोचूँ
हंसते रहे हम उदास होकर
आँसू भी गिरे तो दिल के अन्दर
कब्रों को बहन बनाना सीखे
बालों में नयी रूतें सजाकर
पानी का बहाव थम गया हैं
निकली है नदी से वो नहाकर
ख्वाहिश भर के पिचकारी में, मन होली कब खेलोगे
कुण्डी दरवाजे की खुली थी, छत पे दिया भी रख्खा था
श्रेष्ठ उर्दू कथाकार सआदत हसन मंटोने निर्भीडपणे केलेल्या सडेतोड लिखाणासाठी ‘धडनतख्ता’ हा शब्द योजला होता. उर्दू शायरीतील सारा शगुफ्ता अन् किश्वर नाहीदच्याच लिखाणास हा शब्द उपयुक्त ठरेल.
बंधे है पेट से बच्चे भी और पसे भी
जमीन की बेटी की तस्वीर देख जाना
मर्दो को सब खाँ प है औरत को नारवाँ
शर्मो-हया के शहर में चर्चा भी अजीब है अजीब
किश्वर नाहीदची कविता ‘हम गुनहगार औरते’ अत्यंत गाजली.  ‘वुई सीनफुल वुमेन’ या नावाने ती इंग्रजीत अनुवादित झाली. आणि कन्टेम्पररी उर्दू फेमिनिस्ट प्रोएट्री या इंग्रजी संग्रहाला तेच शीर्षक देण्यात आलं. पंजाबी, हिन्दीसह स्पॅनिश आदी अनेक विदेशी भाषांत ही कविता अनुवादित झाली.
आम्ही गुन्हेगार स्त्रिया
होय
आम्ही गुन्हेगार स्त्रिया आहोत
ज्या कफनीधारी मुल्लांच्या दरारा, रोबाला
जुमानत नाही
स्वत्व विकत नाही.
मान तुकवत नाही
की हात जोडीत नाही
या आम्ही गुन्हेगार स्त्रिया आहोत
ज्यांच्या देहाचं पीक विकतील जे लोक
ते सन्माननीय ठरतील, त्यांच्या माना उंचावतील
ते  सृजनकार गणले जातील.
आम्ही गुन्हेगार स्त्रिया आहोत
ज्या सत्याची पताका उचलून निघालेल्या
तेव्हा असत्याशी राजमार्ग भिडलेला दिसतो
प्रत्येक उंबरठय़ावर शिक्षांच्या आख्यायिका ठेवलेल्या
आढळल्या.
बोलू शकणाऱ्या जिभा कापलेल्या दिसल्या
होय आम्ही गुन्हेगार स्त्रिया आहोत
की जेव्हा रात्रदेखील पाठलाग करेल
तेव्हा आमचे हे डोळे विझणार नाहीत
आता ती भिंत कोसळली आहे
तिला पुन्हा नव्याने बांधण्याचा हट्ट करू नका
होय आम्ही गुन्हेगार स्त्रिया आहोत
 किश्वरच्या मूळ भाषा व शैलीत ही कविता अत्यंत
प्रभावी जाणवते.
१९६० मधली पाकिस्तानातील समाजाची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक विचारप्रणाली व सय्यद घराण्यातून आलेल्या किश्वर नाहीदचे आचार-विचार यांच्यातील वैचारिक संघर्षांची कल्पना आज येणे शक्य नाही. आजही पंचाहत्तरीत किश्वर नाहीदची लेखणी बोथट न होता अधिक धारदार झाली आहे. आपल्या पुरुषसत्ताक समाजाला ती सुनावते,
मैं तो वही हूँ, रस्मो-रिवाज के बोझ तले
जिसे तुमने छुपाया
ये नहीं जाना
रोशनी घोर अंधेरों से कभी डर नहीं सकती..
पत्थर से आवाज कभी दब नहीं सकती    
डॉ. राम पंडित- dr.rampandit@gmail.com