sahrमातृभाषा उर्दू नसतानाही उर्दू शायरीत आपल्या लक्षणीय सृजनाद्वारे मानाचं स्थान प्राप्त करणारे राजेश रेड्डी, एक बुद्धिवान व संवेदनशील कवी म्हणून ओळखले जातात. जगताना जे बरेवाईट अनुभव आले त्यावर त्यांची ग़ज़्‍ाल बेतली आहे, त्यामुळे त्यांची शायरी त्यांच्या जीवनाचा आईनाच आहे.

गो ष्ट असेल १९८४-८५ सालातील मुंबईतील एका उर्दू-िहदी मुशायऱ्याची. पस्तिशीतला एक शायर   
                माझ्यासमोर आला,  
  मेरे दिल के किसी कोने में इक मासूम सा बच्चा,
बडमे की देखकर दुनिया बडम होने से डरता है
हा शेर त्या शायराने म्हटला अन् व्यासपीठावरील शायरांनी, उपस्थित प्रेक्षकांनी त्याला उभं राहून दाद दिली. एवढंच नव्हे तर वन्स मोअरची बरसात झाली. पुढच्या ग़ज़्‍ालचा एक शेर असा होता-
गीता हूँ, कुरान हूँ मैं
मुझको पढम् इन्सान हूँ मैं
पुन्हा तसाच जल्लोष अन् वन्स मोअरची मागणी. हा शायर होता, राजेश रेड्डी.
‘उडान’ या आपल्या पहिल्याच ग़ज़्‍ालसंग्रहाने राजेश रेड्डींनी उर्दू-िहदी ग़ज़्‍ालप्रेमी व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ‘उडान’ देवनागरीत प्रथम व नंतर उर्दू लिपीत प्रकाशित झाले. राजेश रेड्डींची भाषा निदा फाजली, इब्ने इंशा, निगार सहबाईंची भाषा आहे, तिला हिन्दुस्थानी असं म्हटलं जातं. ही प्रचलित संस्कृत, अरबी, फारसी शब्दांचाच वापर करते. (तिन्ही भाषांतील जनसामान्यांच्या आकलन कक्षेबाहेरचे शब्द तिला ग्राह्य़ नाही.) याचमुळे राजेश रेड्डी हे एकाच वेळी दुष्यंत कुमारप्रमाणे हिन्दीचे व निदा फाजलीप्रमाणे उर्दूचेही शायर गणले जातात. याच भाषेमुळे अमीर खुसरौला दोन्ही भाषिक आपला आद्य कवी मानतात.
राजेश रेड्डींची ग़ज़्‍ाल जीवनानुभवातून साकारते. ते सांगतात.
जिन्हें देखना हो शेरों में जिन्दगी की झलक
वो शेर बारहा* मेरी ग़ज़्‍ाल के देखते हैं    
 (* वारंवार)
जग, जीवन, मत्री, एकनिष्ठता, मनुष्य बंडखोरी, ईश्वर, समाज, सत्य अशा विभिन्न पण परस्परपूरक विषयांवर त्यांचे शेर कधी गंभीर तर कधी उपहासात्मक भाष्य करतात –
अखबार से हटती ही न थी मेरी निगाहें
इक अच्छी ख़बर देख के हैरत में पडम् गया मैं
सणाच्या वेळी आनंदी वातावरणाऐवजी शहरात भीतीचे सावट का?
ये सारे शहर में दहशत सी क्यूँ है?
यकिनन कल कोई त्यौहार होगा
आता राजकारण म्हणा किंवा अन्य कोणतंही क्षेत्र म्हणा, त्यात बंडखोरी करणाऱ्यांच्या संदर्भात रेड्डी म्हणतात,
बिलआखिर बिक ही जाती है बगावत  
हर इक बागी* का कोई दाम तय है
(*बंडखोर)
म्हणूनच ते बजावतात,
जब फिर मिलो किसी से तो रखना ख़याल में
इन्सां बदलता रहता है दो-चार साल में
राजेश रेड्डीचा जन्म २२ जुल १९५२ ला नागपूर येथे झाला. नुकतेच ते विविध भारती- आकाशवाणीच्या संचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे तीन ग़ज़्‍ालसंग्रह हिन्दी-उर्दूत प्रकाशित झाले आहेत. ‘उडान’ (१९९६), ‘वजूद’ (२०११), ‘आस्मा से आगे’ (२०१५) याव्यतिरिक्त त्यांनी तीन नाटकेही लिहून स्वत: दिग्दíशत केली आहेत. भूमिका, नेता कुर्सीप्रसाद सिंघ आणि एक था राजा अशी त्यांची नावे आहेत.
राजेश रेड्डींच्या ग़ज़्‍ालांत इश्किया किंवा रोमँटिक शेरांची संख्या कमी आहे पण जिथे आहे तिथे ती उत्कटतेने अनुभवास येते,
हथेलियों पे तेरा नाम तो नहीं लेकिन,
    तेरा ही अक्स* है, इस अक्स को मिटा के दिखा       
    नजर से दूर बहुत दूर जा चुका है मगर
तू एक पल भी मेरे दिल से दूर जा के दिखा
    (*प्रतिबिंब)
 राजेश रेड्डींची शब्दांप्रमाणे छंदावर चांगली पकड आहे. ‘मेनका’सारखा छोटा छंद असो वा ‘स्वैरिणीक्रीडण’सारखा चाळीस मात्रांचा छंद असो ते त्या छंदात आशयगर्भ ग़ज़्‍ाल लीलये रचतात.
जब कभी हम जमीं से रवाना हुए,
राह में बारहा आसमाँ आ गया
चंद कदमों पे थी अपनी मंजिल मगर,
इक बडा फ़ासला दरमियाँ आ गया
या छंदाला ‘बहरे मुतदारिक सालिम शांजदा रुकनी’ म्हणतात फार कमी उर्दू शायरा यांत ग़ज़्‍ाल म्हणतात. ग़ज़्‍ालेचा आत्मा म्हणजे ग़ज़्‍ालियत ऊर्फ शेरीयत किंवा तगज्जुल. रेड्डींच्या ग़ज़्‍ालेतील ग़ज़्‍ालियतच वाचक व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. ग़ज़्‍ालकार अन्य कवींना (जे ग़ज़्‍ाल लिहीत नाहीत.) ग़ज़्‍ालियतची भीती घालतात. खरं तर ग़ज़्‍ालियत म्हणजे आपल्या संस्कृत काव्यज्ञानी काव्यगुणांची जी लक्षणे सांगितली आहेत त्याहून फारशी काही भिन्न नाही. प्रासादिक रचनाच होय. मात्र मराठी ग़ज़्‍ालकारांच्या मते ग़ज़्‍ालियत म्हणजे जी माझ्या ग़ज़्‍ालेत आहे पण दुसऱ्यांच्या ग़ज़्‍ालेत नाही ती ग़ज़्‍ालियत होय.
वाचताच वा ऐकताच आपल्या मन व बुद्धीचा ठाव घेणारे शेर ग़ज़्‍ालियतचे म्हणावे. उदा. –
इस अहद* के इन्साँ में वफ़ा ढूँढ रहे हैं
हम ज़्‍ाहर की शीशी में दवां ढूंढ रहे हैं (*युग)

शाम को जिस वक्तखाली हाथ घर जाता हूँ मैं
मुस्करा देते है बच्चे और मर जाता हूँ मैं
यूँ देखिये तो आँधी में बस इक शजर* गया     
(*झाड)
लेकिन न जाने कितने पिरदो का घर गया
यूँ बहाया वक्त के दरिया ने हमको, जिस तरह
कागज़्‍ाी कश्ती को लहरों की रवानी* लेके जाय     
(*प्रवाह)
शेरांत विरोधाभास नसताही ते मन व बुद्धीवर अंकित होऊ शकतात ते असे.
राजेश रेड्डी जीवनाची व्याख्या अशी करतात,
कुछ अधुरी ख़्वाहिशों का सिलसिला है जिन्दगी
मंजिलों से इक मुसलसल* फ़ासला है जिन्दगी
(*निरंतर)
अन् त्यांना प्रश्न पडतो,
मेरे दरवाजे पे दस्तक दे के छुप जाने का खेल
कब तलक खेलेगी ये, क्या बचपना है जिन्दगी
खलनायक केवळ कथेतच मरतात, हे वास्तव जाणल्यावर ते म्हणतात,
मारे गए कथाओं में रावण भी कंस भी,
अफ़सानों से अलग है मगर जिन्दगी का सच
अशा स्थितीत-
बेच डाला हमने कल अपना जमीर*   
(*अंतरात्मा)
जिन्दगी का आखिरी जेवर* गया  (*दागिना)
पुन्हा ते स्वत:लाच बजावतात,
ज़्‍ामीर बेच के दुनिया खरीदकर खुश है
ये लोग अपनी तबाही* पर किस कदर खुश है (*विनाश)
अप्राप्य गोष्टींची अभिलाषा अन् त्याचे परिणाम ते प्रतीकात्मक शब्दांत सांगतात,
हिरन सोने का चाहेगी जो ‘सीता’
बिछड जाएँ उससे राम तय हैं
आमचे ज्येष्ठ स्नेही ग़ज़्‍ालकार निदा फाजली म्हणतात,
राजेश ग़ज़्‍ाल के हिन्दी करण के धोके में न इसमें (ग़ज़्‍ाल में) कठीन शब्द खपाते है.. न फारसी तरकीबों और इजाकतों का (मिश्रण व जोड) इस्तेमाल करके इसे उर्दूवाले है बताते है- वह बोलचाल की आम भाषा को रागात्मक बनाते है और सहज अंदाज से अपने युग को आईना दिखाते हैं।
एक बुद्धिवान व संवेदनशील कवी म्हणून राजेश रेड्डींचा उल्लेख होत आला आहे. जीवनाची विविध स्तरांवर जे बरेवाईट अनुभव आले त्यावर त्यांची ग़ज़्‍ाल बेतली आहे, त्यामुळे त्यांची शायरी त्यांच्या जीवनाचा आईनाच आहे असे म्हणणे सयुक्तिक ठरेल.
मत्रीच्या संदर्भात आलेला प्रत्यय ते या शब्दात नमूद करतात,
दोस्तों का ख़ौफ़ ही काफ़ी है अब
मेरे दिल से दुष्मनों का डर गया
अन् याच्या विपरीत एक असाही अनुभव शेरात सांगतात-
हमने देखा है कई ऐसे खुदाओं को यहाँ
सामने जिनके वो सचमुच का ख़ुदा कुछ भी नहीं
सुख, ध्येय प्राप्त करण्याची साऱ्यांनाच इच्छा असते. मात्र साध्य गाठण्यासाठी लागणारी साधनं, कष्ट करण्याची तयारी किती जण दाखवितात?
सब चाहते है मंजिले पाना, चले बगर
जन्नत भी सब को चाहिए लेकिन मरे बगर
नियतीची करणी अगम्य आहे हे समजावताना राजेश रेड्डी म्हणतात,
बाहर है आदमी के समझ से खुदा के खेल
कोई चिराग़ जान न पाया हवा हे खेल
जगाच्या तराजूत आनंद आणि व्यथांचं पारडं कधीच समतोल नसतं.
हमसफ़र चंद ही क़दमों की रही खुशियाँ तो
दर्द ही दूर तलक साथ निभाने निकले
सरत चाललेल्या वयाची जाणीव होताच आयुष्याकडे त्रयस्थपणे पाहत भावविवश न होता राजेश रेड्डी उद्गारतात-
उम्र अब देने लगी रोज इशारे कुछ-कुछ
अब सफ़र के लिए सामान समेटा जाए
राजेश रेड्डी मुशायऱ्यात सहभागी असताना इतरांचे शेर डोळे बंद करून शांतपणे ऐकतात. शेर भावला तर उत्स्फूर्त दाद देतात. अन्यथा ते चिंतनमग्नच भासतात. ग़ज़्‍ाल मात्र खडय़ा आवाजात, स्पष्ट शब्दोच्चारासह ऐकवितात. मुशायऱ्यात ज्यांची ग़ज़्‍ाल, हासिले-ग़ज़्‍ाल (मुशायऱ्यातील उत्कृष्ट ग़ज़्‍ाल) म्हणून वाखाणली जाते अशा भारतातील निवडक ग़ज़्‍ालकारांपकी ते एक आहेत.
धाडस निर्भीडता अन् निश्चय यावरील एक शेर पाहा-
हमें मालूम है कितने भंवर है मुंतजिर* अपने (*प्रतीक्षारत)
मगर हमने समुंदर में उतर जाने की सोची है
बहुत कुछ सुनके आए है तेरी दुनिया के बारे में
सो हमने भी यहाँ कुछ दिन ठहर जाने की सोची है
उर्दू शायरीत मातृभाषा उर्दू नसतानाही आपल्या लक्षणीय सृजनाद्वारे मानाचं स्थान प्राप्त करणारे फिराक, दत्तात्रय कैफी, चकबस्त, दयाशंकर नसीम, आजाद, कुमार पाशी, बानी, शीन. काफ. निजाम अशी शंभरच्यावर नावे आहेत. त्यातच राजेश रेड्डी यांचे नाव अलीकडे सन्मानाने अंतर्भूत झाले आहे.
जनसामान्यांना एक वेळ कविता वाचणं सोपं आहे पण माणूस, जीवन यांना वाचणं कठीण आहे. शायर त्या दोन्हींना वाचतो अन् आपल्या क्षमतेनुसार भाष्यासह विश्लेषितही करतो. तरीही त्याला एक खंत असते की-
रख्खी हुई है सीने में सब के किताबे-दिल
पढम्ता कहां है कोई मगर इसको ध्यान से?   
डॉ. राम पंडित -dr.rampandit@gmail.com