उर्दू शायरी अर्थात कविता, गीत, गझल, रुबाई सारंच. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या शायरीला असंख्य शायरांनी अर्थ दिला. त्यांनी अनेक प्रकारच्या दु:खाला, व्यथेला, प्रेमाला, जगण्याला शब्दरूप दिलं. प्रेमाला अर्थ दिला, तसं जगण्याचं भानही दिलं. जगणं, आयुष्य हे संध्याकाळच्या बदलत्या रंगासारखं असतं, संध्याकाळला अपरिहार्यपणे रोज उगवावंच लागतं. नाना रंग घेत घेत ती रात्रीपर्यंत पोहोचते. जगण्याचं तसंच असतं, सगळं आयुष्य यातायात करण्यातच जातं, पण पुढे सकाळ होणार आहे, याची जाणीव कुठे तरी असतेच. आयुष्याचे हे रंग दाखवणारी ही शायरी ‘सहर’ वा ‘सकाळ’चं भानही देते म्हणूनच ‘शमा हर रंग में जलती है, सहर होने तक’ अशाच या ‘सहर’ची आशावादाचीही जाणीव देणाऱ्या उर्दूतल्या या शायरीची आणि शायरांची ही ओळख. दर पंधरा दिवसांनी..
 उर्दूची पहिली अँग्री यंग पोएट्स मानल्या जाणाऱ्या बंडखोर सारा शगुफ्ताविषयी ..

उर्दू शायरी हा उर्दू गजलसाठी पर्यायी शब्द बनलेला आहे. खरं तर शायरीत कविता, गीत, गझल, रुबाई असे अन्य अनेक काव्यप्रकार अंतर्भूत असतात. फक्त कविता आणि त्याही गद्यस्वरूपाच्या कविता लिहून उर्दू काव्यजगतात ज्यांनी प्रतिष्ठा प्राप्त केली त्यात अख्तर उल ईमान, काजी सलीम, बलराज कोमल यांच्या व्यतिरिक्त कवयित्रींतील एकमेव नाव म्हणजे सारा शगुफ्ता.
खरं तर सारा शगुफ्ता फक्त गृहिणीच व्हायची, पण नियतीने म्हणा किंवा परिस्थितीने म्हणा तिच्या आयुष्यात अशा काही वळणवाटा आणल्या, की तिच्यात बंडखोरी येत गेली. आणि ती बाहेर पडण्याचं माध्यम तिला सापडलं ते म्हणजे कविता. तिला एकामागोमाग चार लग्नं करावी लागली. चार तलाक अनुभवावे लागले. तत्कालीन समाजातील रूढी परंपरांचे आघात सोसत आयुष्य घालवावे लागले. नवऱ्याचे, सासू-सासऱ्यांचे अत्याचार, मारहाण सहन करीत असताना मात्र तिच्यात बंडखोरपणा येत गेला तसा आक्रमकपणाही. प्रत्येक नवऱ्याने तिला त्रासच दिला. आपलं वर्चस्व गाजवायच्या नादात तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमानच होत गेला.
 एक उर्दू शायर तिच्या प्रेमात पडला, तिचा तो तिसरा नवरा झाला पण फक्त नावाचा. आíथक विपन्नावस्था असूनही त्याने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. तो स्वतही काही न कमवता साहित्यिक मित्रांबरोबर पाश्चात्त्य विचारवंत व कवींवर दिवसभर चर्चा करीत असे. अशातच साराला दिवस गेले, तरीही त्याच्यात कोणताच बदल होईना. प्रसूतीची वेळ जवळ आली असतानाही तो आपल्या ‘ज्ञानचच्रेत’ मग्न होता. शेजारणीने साराला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कुपोषणामुळे मृत मूलच जन्माला आले. जवळ पसे नसल्याने साराने मेलेले मूल हॉस्पिटलमध्येच ठेवून घराचा रस्ता पकडला. आणि तिच्यातल्या हळूहळू वाढत गेलेल्या बंडखोरीने रौद्ररूप धारण केलं. स्तनातून वाहणारे दूध तिने एका ग्लासात काढून शपथ घेतली, की यापुढे या नवऱ्यापेक्षा सकस कविताच ती लिहील..
आणि आपली शपथ सार्थ करत पाचशे कविता जन्माला घालून अडतीस वर्षांच्या अल्पायुष्यात सारा शगुफ्ता उर्दू साहित्यविश्वातील एक निर्भीड कवयित्री म्हणून ओळखली जाऊ लागली. सारा शगुफ्ताच्या निधनानंतर तिच्या नावाने सईद अहमद यांनी एक स्मृती अकादमी स्थापन केली आणि ती उर्दू काव्यात अजरामर झाली.
साराच्या जीवनात आलेली विविध वळणे, आणि त्यातून उद्भवलेली वादळे यांतूनच साराची समग्र कविता साकारली आहे. म्हणूनच ती म्हणते,
सारे मौसम मुझसे शुरू होते हैं
देखनेवालो!
मुझे पत्थर की आँख से देखना.
साराने चार लग्नं करण्यामागे तिच्या विधवा आईची आत्यंतिक इच्छा हेच एकमेव कारण होते. अन्यथा तिची शारीरिक भूक अन्याय व अत्याचाराने मेली होती. तिच्या जीवनाबाबत ती म्हणते,
आंगन में धूप न आये तो समझो
तुम किसी गर आबाद इलाके में रहते हो..
गम मेरे दिल से जन्म लेता ही है
जमीन हैरत करती है और एक पेड उगा देती है।
 तिला तलाकच्या ज्वाळेत एकामागोमाग ढकलणाऱ्या पूर्व पतींना ती म्हणते,
साये की खामोशी

What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या

रात की दो आँखें
मैं चलना चाहती हूँ
ये अपाहिज रंग ही तो जाग रहा है
ख़ौफ़ की हर गुल्लक तोड़ती हूँ
कभी ज्यादा हो जाती हूँ और कभी कम
पन्द्रह मिनट पे घर है
कोई न कोई कान्धा देने आ ही जाता है
मुर्दे समझते हैं
औरत से अच्छी कोई क़ब्र नहीं होती
दरवाज़े को आ़जाद करते ही
मेरा घर शुरू होता है
वतन से निकलती हूँ तो जमीन शुरू हो जाती है
जमीन से निकलती हूँ तो वतन शुरू हो जाता है
लिबासों के रंग भी तो जिस्म पे रंग छोड़ते हैं

सिर्फ जमीन सहती है
खोखला पेड नहीं
तुम! समुंदर की लहरों में तरतीब मत दो
कि तुम खुद अपनी तरतीब नहीं जानते
तुम जमीन पे चलना क्या जानो
प्रत्येक तलाकनंतर जीवन सुंदर होईल अशी आशा तिच्या मनात उगवत असे. तिच्या जन्मदात्यांनी तिच्या आईला तलाक देऊन वाऱ्यावर सोडले होते. त्यातली धग व्यक्त करताना ती लिहिते,
मेरा बाप नंगा था
मने अपने कपडे उतार उसे दे दिए
जमीन भी नंगी थी मंने उसे मकान दाग दिया
शर्म भी नंगी थी मंने उसे आँखे दी
प्यास को लम्स दिया
और होंठों की क्यारी में जानेवाले को बो दिया
आपला एक नवरा बाहेरख्याली आहे हे लक्षात आल्यावर कडवट झालेली सारा लिहून जाते,
वफादारी की गलियों में कुतिया कम
और कुत्ता जादा मशहूर है!
तिच्या या वागण्याचा त्रास घरच्यांना व्हायला लागला. साहजिकच तिच्या भाऊबंदांनी, सासू-नणंदांनी तिच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास सुरुवात केली. तेव्हा ती लिहून जाते,
विद्वांनानी माझी पत्रिका पाहून
माझं नाव धर्मशाळा ठेवलं
मला बघण्यापूर्वी ही सारी मंडळी
धुतल्या तांदळाची होती
खेळण्याच्या नशिबात जास्तीत जास्त
तुटणंच असतं..
स्त्री तर माणसाला जन्म देऊनही
तिचं खरंपण स्वीकारलं जात नाही.
स्त्रीपेक्षा चांगली कबर कोणतीच नसते.
 अशा आरोप आणि प्रत्यारोपांना तोंड देण्यापेक्षा उग्ररूप धारण करून सारा घराबाहेर पडली ते आपल्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांचा ताबा घेण्यासाठी. त्यासाठी तिने घर विकले. आणि ते पसे आपल्या पहिल्या पतीला मुलांच्या बदल्यात देऊ केले. पण पसे देऊनही अन् न्यायालयातून मुलांचा ताबा वैधपणे मिळवूनही मुले तिला मिळू शकली नाहीत. मुलांचा ताबा घेण्यासाठी तिने आपल्या पतीचे पितृत्वदेखील नाकारले होते. एवढा निर्भीडपणा तिच्यातील ज्वालामुखीचे शिलाखंड झाल्याने साकारला होता.
साराच्या जीवनात आपल्या त्या मृत पावलेल्या मुलाचे स्थान अनन्यसाधारण होते.
त्यावर ती लिहिते,
लिबास पर पडे हुए धब्बे
मेरे बच्चों के दुख के थे
और मेरी कब्र मुझे छुपकर देख रही है।
  जगण्यालाच किंवा माणसांच्याच कृतघ्नतेचाच जास्त प्रत्यय आलेल्या. फक्त दु:ख, दु:ख आणि दु:खच भोगणाऱ्या साराजवळ सईदने आपले प्रेम व्यक्त करून तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा ती म्हणते,
कूएँ में डोलती रस्सी जल तो सकती है,
प्यास नहीं बुझा सकती
किस किस के हाथ पे आँखे रख दूँ
और किस किस को अलविदा न कहूँ..
मं भी पहले पेडों की तरह सोचा करती थी
जानेवाले को मुबारकबाद देती थी
और आनेवाले का अलविदा..
साराच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये हळूहळू सलगता राहिली नाही. आयुष्यात निरंतर घडणाऱ्या दु:खद घटनांमुळे साराचे मानसिक संतुलन बिघडू लागले होते. बोलता बोलताच ती खळखळून हसायची. ज्याचा संवादाशी काहीच संबंध नसे. तिला खाण्यापिण्याचीही अनेकदा शुद्धही नसे पण कविता लिहिताना मात्र ती एकाग्र असे.
आग पर पिरदे सेंकने लगी
तो भूक मेरी एडी से डर निकली
-माझ्या भावनांना अपंग करण्यात आलं
मी संपूर्ण संवाद करूच शकत नाही
सारा शगुफ्ताचा छंदोबद्ध किंवा लयबद्ध काव्यावर विश्वास नव्हता. ती स्त्रीमुक्तीची समर्थक तसेच मुस्लिम समाजातील पडदा प्रथेविरुद्ध आवाज उठविणारी होती. ती म्हणते,
थकामाँदा सुबह का तारा
जब सारे आसमान पर अकेला होता है
उसी वक्त की कद्र करती हूँ
 माणसाची व्याख्या करताना ती म्हणते –
इन्सान वो है जो बदी को भी इमानदारी खर्च करे
मंने यह पसे कभी खर्च नहीं किए
खैरात कर दिए..
मानसिक तोल ढळल्यामुळे साराला वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते, पण तिचे जीवनविषयक भान मात्र जागृत होते. कारण त्याच अवस्थेतली तिची ही कविता,
मौत कहकहा लगाना चाहती है
लेकिन मेरे पास वक्त और हँसी कम हैं
बदन से दिल उखड गया है
बेखबरी ठण्डे कदम चलने लगी है
और वो बाल खोले मुझे बुला रही है
अशाच उन्मानावस्थेत ४ जून १९८४ रोजी रेल्वेरुळांवर साराने आत्महत्या केली. मात्र सईदच्या नावे तिने जे पत्र लिहून ठेवले होते त्यावरून लक्षात येते, की तिची सारासार विवेकबुद्धी खरं तर शाबूत होतीच.
उर्दूची ती पहिली अँग्री यंग पोएट्स म्हणता येईल. केवळ १४ वर्षांतील पाचशे कवितांच्या बळावर साराचे नाव उर्दू काव्यविश्वात परवीन शाकिर, फहमिदा रियाज, किश्वर नाहिद यांसारख्या मान्यवरांच्या नामावलीत अंतर्भूत होऊन तिच्या कवितेचे विश्लेषण तिच्या जीवनप्रवासाच्या पाश्र्वभूमीवर आजही केले जाते. ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रितम यांनी सारा शगुफ्ता यांच्या कवितांचं ‘एक थी सारा’ नावाने संकलन केले आहे, तसेच ‘उर्दू पोएम्स ऑफ सारा शगुफ्ता’ नावाने काही कवितांचं हिंदी व इंग्रजीमध्ये रूपांतरही केले आहे. तिच्या कवितेतील प्रतीकात्मकता कधी सुबोध, कधी दुबरेध वाटल्या तरी मनाला विषण्ण करतात, एवढं मात्र खरं.
दोन घोट तहान अधिक
भुकेच्या स्पर्शाने ती जागी झाली.
डहाळीच्या मोडण्याच्या आवाजाने.
दोन घोट तहान अधिक
ईश्वराने भुकेचे कितीतरी स्वाद निर्माण
केलेय माळी बुवा,
ते फूल माझ्या बाहुलीच्या रंगाचे आहे
अन् सूर्यमुखी फुलांत तर तू माझे केस ओवलेस
माझे जोडे काळ्या गुलाबासारखे आहेत
आणि हे पांढरे फूल
माझ्या भाकरीच्या रंगाचे आहे.
   (उर्दू शब्दांचे मराठी अर्थ – तरतीब- क्रम, बदी- कुकर्म, एडी- टाच, लम्स- स्पर्श, क्यारी- रोपटय़ाभोवतीचं आळं.)   
डॉ. राम पंडित- dr.rampandit@gmail.com