मुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. दुसऱ्याला काही देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही. काटकसरी वस्तू वापरण्याची सवय असली की मन हे शोधत राहतं, आपण उधळपट्टी तर करत नाही ना? स्वत:ला अनेक दिवस हे शिकवावं लागतं. ते अचानक होत नाही.
तू  – मला आवडतेस.
– माझा तुझ्यावरच विश्वास आहे.
– हे तू छान केलंस हं!
– तुझं मत मला सांग.
– माझं चुकलं बरं का!
 वरील पाच वाक्यं मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. आपण आपल्या आई-वडिलांना आवडतो ही भावना छान असते. आपण थोडेच आपल्या मुलांना ‘आय लव यू, आय लव यू’ असं म्हणणार आहोत? आपलं प्रेम त्यांना आपल्या वागण्यातूनच कळायला हवं. डोळे, भुवया, कपाळ हा भाग मुलांकडे पाहताना जाणीवपूर्वक प्रसन्न ठेवावा. नाही तर कपाळाला आठय़ा घालून, भुवयांचा संकोच करून, डोळे वटारूनच मुलांकडे पाहिलं जातं. असं होऊ नये. पाठीवरून प्रेमानं हात फिरवला की मुलांपर्यंत आपली माया पोचते. मुलाचा चेहरा उतरलेला दिसला की काय झालं बाबा? असं काळजीनं विचारलं की त्याची अर्धी चिंता दूर होते. ‘मुलं ऐकतील असं बोलावं कसं आणि मुलं बोलतील असं ऐकावं कसं?’ ऌ६ ३ ळं’‘ र ङ्र२ि ह्र’’ छ्र२३ील्ल & छ्र२३ील्ल र ङ्र२ि ह्र’’ ळं’‘  नावाचं एक इंग्रजी पुस्तक आहे त्यात अनेक सूचना, कल्पना आहेत. मूल बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणं यातूनही प्रेमच व्यक्त होतं.
‘बालभवना’त एकदा कवितांच्या शिबिरात मी मुलांना म्हटलं; आपल्या मित्राबद्दल चार ओळींची कविता करूया. त्याचं नाव त्यात आलं पाहिजे. तेव्हा वरुणने दोनच ओळींची कविता केली.-
माझा मित्र आहे स्वानंद
मला बघून त्याला होतो आनंद
वरुणचं निरीक्षण किती छान होतं! ज्याला आपल्याला बघून आनंद होतो तोच आपला मित्र समजावा! आपल्याला पाहून आई-बाबांना आनंद होतो हे मुलांपर्यंत पोचवायचे मार्ग शोधून काढूया. माझा तुझ्यावर विश्वास आहे असं आईवडिलांना म्हणावं लागत नाही. ते मुलांबद्दल, मुलींबद्दल काय बोलतात ते मुलांच्या कानावर पडतं आणि त्यावरून त्यांना ते कळतं. एक आई अशी होती की शेजारी तिला सांगत, ‘‘बघा; तुमचा मुलगा काय करत बसलाय. काही तरी खटपट करतोय. काय हे वेळ वाया घालवणं!’’ आई शांतपणे म्हणत असे, ‘‘ तो जे काही करत असेल ते चांगलंच करत असेल.’’ हा मुलगा पुढे शास्त्रज्ञ झाला. त्याचं नाव अरिवद गुप्ता. त्यानं वाया गेलेल्या वस्तूंमधून अनेक विज्ञान खेळणी बनवली. मुलांना शिकवली. आपल्याबद्दल आई असं म्हणते ते त्यानं ऐकलं असणारच. एकदा माझ्या आईला तिच्या मत्रिणी सांगत होत्या. ‘‘ तुमची मुलगी कायम त्या अमुक मुलीबरोबर असते. ती मुलगी काही चांगली नाही. तुमची मुलगी बिघडेल.’’ त्यावर आई शांतपणे म्हणाली, ‘‘माझी मुलगी बिघडणार तर नाहीच उलट त्या मुलीला ती सुधरवेल.’’ हे मी ऐकलं आणि माझ्यावर केवढी जबाबदारी आईनं टाकलीये याची जाणीव झाली. त्या मुलीशी माझी अजूनही चांगली मत्री आहे. ‘माझा तुझ्यावर विश्वास आहे.’ हे मुलांपर्यंत पोचलं की मुलं त्या विश्वासाला जागतात.
 मुलांना काय चांगलं, काय वाईट हे कुठे माहीत असतं? घरात आईला मदत करणं छान आहे, मन लावून अभ्यास करणं छान आहे, ओळखीच्या गरीब मुलांना मदत करणं चांगलं आहे, एखादेवेळी हवी असलेली वस्तू घेता नाही आली तर रागावून न बसणं चांगलं आहे, आजी-आजोबांशी प्रेमाने वागणं चांगलं आहे अशा किती तरी लहानसहान- मोठय़ाही गोष्टींबद्दल मुलाचं कौतुक सहजपणे झालं पाहिजे.
 कौतुकाचे शब्द कोणते? हा एक गमतीचा प्रश्न आहे. मुलांनी घरात काही काम केलं तर त्याचा अर्थ ‘‘आता आपण कामाच्या बाईंना काढून टाकू’’ असा नाही होत तर ‘‘आपली कामं आपण केली की किती चांगलं वाटतं ना?’’ हे म्हटलं गेलं पाहिजे. नाही तर मुलाला, मुलीला वाटेल, ‘‘मी काय कामाची बाई आहे का?’’
माझं चुकलं बरं का! हे वाक्य पालकांनी म्हणणं याला खूप महत्त्व आहे. मुलांचं काही चुकलं की घरात त्याचा केवढा बाऊ केला जातो! ‘राहा देवापुढे उभा, कर नमस्कार. म्हण मी असं पुन्हा कधी वागणार नाही. आजीला नमस्कार कर. सांग मी पुन्हा असं करणार नाही.’ आणि आपलं चुकतं तेव्हा? आपण म्हणतो का ‘सॉरी’? माझं चुकलं बरं का! असं आईबाबा म्हणत असतील तर मुलांवर बरेच चांगले परिणाम होतात. एक तर चुकणं म्हणजे भयंकर मोठं पाप आहे असं दडपण त्यांच्यावर येत नाही. चुकलं तरी ‘सॉरी’ म्हणता येतं असं ती शिकतात आणि स्वत: सहजपणे ‘माझं चुकलं!’ म्हणू शकतात. मग त्यांना खोटं बोलण्याची, आपल्या चुका लपवण्याची गरज भासत नाही.
आणि आपल्याला काय वाटतं? देवापुढे उभं करून मुलं पापभीरू, देवभक्त बनतात? उदाहरण असं आहे की लहानपणी सारखं देवापुढे उभं केल्यामुळे मूल देवाचाच तिरस्कार करू लागलं, देव मानेनासं झालं, नास्तिक झालं. त्याच्या दृष्टीने हे चांगलं का वाईट ठरवणं कठीण आहे पण पालकांसाठी धडा असा की जे शिकवण्याचा आपण अट्टहास करतो, त्याच्या बरोबर उलटे धडे मुलं गिरवतात.
एक जोडपं त्यांच्या मुलांच्या लहानपणीदेखील खूप समाजकार्य करीत असे. इतकं की मुलांसाठी त्यांच्याकडे वेळच नसे. पुढे त्यांची मुलं मोठी झाल्यावर म्हणू लागली की आम्ही मुळीच सोशल वर्क करणार नाही. मुलं असं का म्हणतात असं पालकांना विचारलं तर पालक म्हणाले, ‘‘ आम्हाला वाटतंय, आम्ही जरा जास्तच केलं.’’ असं काहीही घरात अति झालं की मुलं वेगळं टोक गाठू शकतात.
घरानं मुलांना स्वतंत्र, स्वावलंबी केलं पाहिजे. मुलांनी आपल्यावर अवलंबून असावं असं कोणत्या पालकांना वाटेल? तसं तर जेव्हा पालकांच्या कार्यशाळेत मी विचारते की आपली मुलं कशी व्हावीत असं तुम्हाला वाटतं? तेव्हा पालक मोठी यादीच सांगतात- आनंदी, यशस्वी, आज्ञाधारक, स्वतंत्र विचार करणारी, मोठय़ांना मान देणारी, सामाजिक जाणीव असलेली, समाधानी, कृतज्ञ, इतरांना मदत करायला तत्पर, हसतमुख, प्रेमळ, नम्र, प्रामाणिक, उद्योगी, सर्वाशी मत्री करणारी, स्वावलंबी, इतरांच्या उपयोगी पडणारी, जबाबदार, कर्तव्यदक्ष, संवेदनक्षम यादी संपतच नाही.
मग असं विचारलं की हे सगळे गुण कोणी शिकवायचे? याचे कुठे क्लासेस असतात का? उघडच आहे. ‘‘येथे प्रामाणिकपणा शिकवला जाईल’’, ‘‘मुलांना पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी- अमुक अमुक क्लास’’ अशा पाटय़ा तर नसतात. तर यातला एकेक गुण मुलांच्या अंगी यावा असं वाटत असेल तर त्याची काही एक प्रक्रिया लहानपणापासून सुरू करावी लागते. मूल धीट व्हावं असं वाटत असेल तर त्याला सारखी बागुलबुवा, पोलीस, वॉचमन, राक्षस यांची भीती घालून कसं चालेल? मोठय़ा वयात त्याच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या नाहीत तर ते धीट कसं होईल?
आपण किती काय काय सांगत असतो मुलांना! पण आपण ते करत असतो का़  एकदा एक बाबा बालभवनात आले. मला म्हणाले, ‘‘ मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी काय करावे ते मला सांगा.’’ एवढे जागरूक पालक बघून मला तर भरून आलं. मी म्हटलं, ‘‘ मला फार छान वाटतं आहे तुमचं हे वाक्य ऐकून. मला एक सांगा तुम्हाला वाचनाची गोडी कशामुळे लागली?’’ त्यावर बाबा ताडकन म्हणाले, ‘‘ छे! छे! अहो! मी काही वाचतबिचत नाही. पण पोरांनी वाचलं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे.’’ मी थक्क झाले! ठाम मतंवाल्यांची मला जरा दहशतच वाटते!
तेव्हा मुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. जसं रोज दात घासायची सवय असली की तो आवश्यक भागच होतो दिनक्रमातला. तसंच विविध गुणांचं असतं. दुसऱ्याला देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही. काटकसरी वस्तू वापरण्याची सवय असली की मन हे शोधत राहतं- ‘‘ आपण उधळपट्टी तर करत नाही ना?’’ स्वत:च्या गरजा जो कमी ठेवील तो श्रीमंत असं म्हणण्याची वेळ आली आहे. या सगळ्यावर मुलांनी विचार केल्याशिवाय, त्या सवयी पचवल्याशिवाय गुण येणार नाहीत अंगी! स्वत:ला अनेक दिवस हे शिकवावं लागतं. अचानक काही होत नाही.
 आमच्या मुलीनं अगदी साधं लग्न केलं. घरातल्याच हॉलमध्ये वीस माणसांच्या उपस्थितीत, रजिस्ट्रारला बोलावून नवरा-नवरीने सह्या केल्या. सर्वानी जेवण केलं. मी तिला म्हटलं, ‘‘ कसा गं निर्णय घेतलात हा?’’ ती म्हणाली, ‘‘ तो काही एका क्षणाचा निर्णय नसतो. याआधी आपण काय पाहिलंय, कशाचा विचार केलाय, कशाच्या चर्चा केल्यात, कसले कपडे वापरले, दागिन्यांचं काय केलं? रूढी किती पाळल्या? या सगळ्याचं ते फलित असतं.’’ किती खरं आहे! मुलांमध्ये अमुक गुण यावेत असं वाटत असेल, तर तशी कामं त्यांना दाखवणं, तशी माणसं भेटवणं, तसं वाचन करायला देणं, प्रत्यक्ष अनुभव देणं, त्यांचे विचार चच्रेतून पक्के करणं, हे सगळं व्हावं लागतं.
आपण कोणत्या गुणांची अशी विचारपूर्वक प्रक्रिया घडवतो आहोत?

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता