जोडीदाराविषयी असणारा आपल्यातील ‘अनरोमँटिकपणा’ दूर करता येतो. कारण ही एक कला आहे, ज्याला मी ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणतो. इतर कलांप्रमाणे ही कला आपण शिकू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. नात्यामध्ये ‘अहं’च्या ‘आय’ला जर मुरड घालता आली तर जोडीदाराला ‘व्हिटॅमिन आय (इंटिमसी)’ आपण देऊ शकतो.
प्रेम, सेक्स आणि सर्वकाही स्त्रीच्या एकाच नजरेत असतं, पण सेक्स, सेक्स आणि सेक्स पुरुषाच्या नजरेत भरलेलं असतं. म्हणून स्त्रीचे ‘नेत्रप्रेमालाप’ व पुरुषाचे ‘नेत्रमथुन’ ही मनोलंगिकता निसर्गदत्त असली तरी लंगिक व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा व्यक्ती व्यक्तीमध्ये आढळून येतात. हळूवार प्रणयी भावनेचे पुरुष वा आक्रमक लंगिक स्वभावाच्या स्त्रियाही आढळतात. म्हणून लंगिकतेमध्ये विशिष्ट लंगिक ‘रोल प्लेइंग’ एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित करणे हे चुकीचे ठरू शकते. परंतु वैवाहिक जीवनात अशा अपेक्षांमुळे उठणारी वादळं लंगिक संबंध विस्कळीत करतातच, पण नात्यातील ताणही वाढवतात.
‘तुझा मुखचंद्र आणि पौर्णिमेचा चंद्र यामध्ये अधिक सुंदर कोण हे मी सांगू शकत नाही. पण खरं सांगतो, त्या चंद्राला पाहताच तुझी आठवण येते आणि तुला पाहताच मी त्याला विसरून जातो.’ अशी प्रणयी भावुकता दाखवणारा पुरुष हा स्त्रीला जितका भावतो तितकाच पलंग-शृंगारतत्पर पुरुषही तिला आकर्षति करीत असतो. स्त्रीची मनोलंगिकता ही अत्यंत गुंतागुंतीची आणि वैयक्तिक तफावतीची असल्यानेच ‘देवो न जानाति कुतो मनुष्य:’ अशी स्त्रीमनाची व्यावहारिक जगात परिस्थिती असते. म्हणून डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी प्रांजळपणे कबूल केले आहे की, ‘माझ्या तीस वर्षांच्या स्त्री मनाच्या अभ्यासावरून एका प्रश्नाचे उत्तर अजिबात मिळाले नाही हे मी कबूल करतो, की स्त्रीला नेमकं काय पाहिजे असतं? (व्हॉट डज अ वूमन वाँट?)’
काहींचे मत पडते की, स्त्रीला प्रेम पाहिजे असते, तर काही स्त्रियाच ही गोष्ट खोडून काढतात आणि सांगतात, स्त्रीला प्रेमही हवं असतं. याचाच मथितार्थ स्त्रीला तेही हवं असतं जे पुरुषाला हवं असतं.. उद्दीपित करणारा पलंग-शृंगार! आणि सर्वसामान्य पुरुष तिच्या या मानसिकतेविषयी अनभिज्ञ असल्यानेच केवळ ‘पलंगतोड’ उपायांच्या मागे लागून (ज्यात जाहिरातबाजी, मित्रत्वाचे(?) अनुभवी सल्ले यांचा समावेश होतो) स्वत:लाच त्या प्रसंगी खजील करून घेत असतो. स्त्रीजन्य प्रेमळपणा हा भावुकतेच्या राज्यातील असतो तर पुरुषी प्रेमळपणा हा केवळ वासनालिप्त सहवास असतो. या मानसिकतेमध्ये दोघांनीही बदल करणे आवश्यक असते. म्हणजेच पुरुषाने प्रेमभावुकता विकसित करून स्वत:ला शृंगार-अलंकृत केले पाहिजे तर स्त्रीने स्वत:ला पलंग-शृंगारात तरबेज केले पाहिजे. म्हणजेच नात्याचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी ‘व्हिटॅमिन एस (सेक्सलाइफ)’ आणि ‘व्हिटॅमिन आय(इंटिमसी)’ ही दोन्हीही जीवनसत्त्वे आवश्यक असतात.
जर केवळ एकांगी मनोलंगिकता ठेवली तर अशा स्त्री-पुरुषाचा नातेसंबंध विकलांग होऊ शकतो. म्हणूनच पुरुषांनी प्रेमकला, तर स्त्रीने शृंगारकला मुद्दामहूनच शिकली पाहिजे. ‘प्रेम म्हणजे प्रेम असलं तरी तुमचं आमचं सेम कधीच नसतं’ हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ‘प्रेम’ ही आकर्षणाची जाणीव असून वेगवेगळय़ा ज्ञानसंवेदनांनी (दृष्टी, स्पर्श, श्रवण इ.) त्या त्या व्यक्तीच्या मेंदूतील विशिष्ट भागात त्या संवेदनांचे पृथक्करण व विश्लेषण (अॅनॅलिसीस व इंटरप्रीटेशन) कशा प्रकारे केले जाते त्यावर अवलंबून असते.
आनंदमय ज्ञानसंवेदना, विशेषत: दृश्यसंवेदना, मेंदूतील मागील भागातील दृष्टिज्ञान मेंदूकडून, व्हिज्युअल ब्रेनकडून, डोळय़ांच्या खोबणीवरील असणाऱ्या मेंदूभागाकडे, ऑर्बायटोफ्रंटल कॉर्टेक्सकडे व मेंदूतील गाभ्यातील व्हीटीए, कॉडेट व मॅमीलरी बॉडी या भागांकडे जातात. पुरुषांमधे कॉडेट न्यूक्लिअस भाग हा ‘सौंदर्य पारखी’ तर मॅमीलरी बॉडी भाग हा ‘सौष्ठव पारखी’ असतो. दिसणाऱ्या व्यक्तीची आकर्षकता (चेहरा व शारीरिक) या भागांमध्ये ठरवली जाते. पुरुषांमध्ये ढोबळ मानाने स्त्रीविषयक शारीरिक आकर्षणाचे मोजमाप जवळपास सारखे असू शकते. म्हणजेच सर्वसाधारण पुरुषांमध्ये आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या (चेहरा, शरीरसौष्ठव) स्त्रीच्या मोहकतेविषयी दुमत असण्याचे प्रमाण नगण्य असते.
परंतु स्त्रीमध्ये मात्र पुरुषाच्या शारीरिक आकर्षणाशी संबंधित कॉडेट व मॅमीलरी बॉडी या मेंदूभागांचा सहभाग कमी व भावनिक संवेदनांशी निगडित असणाऱ्या अँटीरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स व इन्शुला या भागांचा संबंध पुरुषविषयक आकर्षणाशी जास्त प्रमाणात असल्याचे आढळते. स्त्रीमध्ये या भागांमध्ये पुरुषाचा ‘घनिष्ठता मूल्यांक’ मापला जातो. याचा संबंध पुरुषाकडून अपेक्षित असणारी शारीरिक, मानसिक व आíथक सुरक्षितता कितपत मिळू शकेल हे स्त्रीकडून जोखले जाते. म्हणून स्त्रीचे प्रेमाकर्षण बहुआयामी वा मल्टिफॅक्टोरियल असते. स्त्रीला जास्त गरज ‘व्हिटॅमिन आय’ (इंटिमसी)ची असते हे पुरुषी मानसिकतेने जाणून घेतले पाहिजे.
‘भावनिक संवेदना’ ही गोष्टच मुळी व्यक्तिनिष्ठ असते. म्हणजेच एखाद्या स्त्रीला न भावलेला पुरुष दुसरीला मनापासून जवळचा वाटू शकतो. म्हणूनच ‘कुठली स्त्री कुठल्या पुरुषाकडे का व कशी आकर्षति होईल’ हे  ‘कधीही न सुटणारे कोडे’ आहे.
प्रेम ही भावना निसर्गाने ज्या आकर्षणातून केली आहे ती बहुतेकांना कुठल्याही वयात मोहात पाडत असते. फक्त पुरुषाला स्त्रीचे ‘शारीरिक गुण’ तर स्त्रीला पुरुषाचे ‘कर्तृत्वगुण’ हे जास्त प्रभावित करीत असतात. परंतु कुठल्या स्त्रीला पुरुषाचा कुठला गुण ‘कर्तृत्वगुण’ वाटेल हेच न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे प्रेमाला कुठलीही उपमाच देता येत नाही. म्हणून प्रेमावर मला खालीलप्रमाणे काही ओळी सुचल्या आहेत,
मोहक गुलाब येतो जगती लेऊन दाहक काटे
तरुण मनांची त्याच्यावरती तरीही प्रीती जडते
लाज लाजूनी चूर होतसे लाजवंती स्पर्शाने
प्रेम भुकेले हे जग असते निसर्गी जाणून येते
प्रेमाला उपमा कसली ते तर देवाघरचे लेणे
कधीही होते कुणाही वरती हे गतजन्मीचे देणे
गतजन्मीचे लागेबंधे गतजन्मीचे नातेधागे
त्या धाग्यांचे या जन्मीचे प्रेम हे रेशमी वेढे
थोडक्यात, बरेच जणांना प्रेम ‘होत’ असते, पण अखेर पुष्कळांची लग्ने मात्र ‘अॅरेंज्ड’च होत असतात. प्रेमविवाह वा ठरवून केलेल्या विवाहात महत्त्वाचा फरक काय? प्रेमविवाहात तुम्ही तुमच्याच बॉयफ्रेंडशी (वा गर्लफ्रेंडशी) लग्न करता, पण तसे ठरवून केलेल्या विवाहात होत नाही. म्हणून या विवाहात पहिल्यांदा आपल्या जोडीदाराला आपला ‘बॉयफ्रेंड’ (किंवा आपली ‘गर्लफ्रेंड’) करणे  जरुरीचे आहे. प्रेमविवाहातही काळाच्या ओघात वास्तवाचे चटके व अपेक्षाभंगाचे फटके मिळाल्यामुळे ‘आकर्षण प्रेम’ कमी होऊन जोडीदारापासून दुरावा येऊ लागतो. म्हणून तिथेही मत्रीचा ‘पुनश्च हरिओम’ करावा लागतो. ‘प्रेमभाव’ हा नात्याचा स्थायिभाव असून ‘व्हिटॅमिन आय (इंटिमसी)’चे मूलतत्त्व आहे. ‘आकर्षण प्रेमातून’ ‘अॅटॅचमेंट प्रेमा’कडे वळणे हे ‘इंटिमसीचा प्रेमभाव’ विकसित करण्याचे गमक आहे.
प्रेम आले की प्रेमभंग आला आणि मग त्याला निस्तरण्याचा सोपस्कारही आला. त्यामुळे ‘वो न मिला तो उसका मलाल (दु:ख) क्या, जो गुज़्ार गया सो गुज़्ार गया. जो तेरा है उसको गले लगा, जो गुज़्ार गया सो गुज़्ार गया’  हे ब्रीद ठेवले तर दु:खाला न कुरवाळता पुढे जाता येईल. या प्रवृत्तीमुळे आपल्या सद्यस्थितीतील वैवाहिक जीवनावर त्यामुळे विपरीत परिणाम होणार नाही. नाहीतर बरेचदा आपल्या, ‘आता आपल्या नसलेल्या’ परंतु मनात अजूनही जपलेल्या प्रेमप्रतिमेशी जोडीदाराची तुलना केल्यास स्वत:लाच नराश्य येऊन कामस्वास्थ्य अस्वस्थ होत राहते.
माणसाला लागलेला सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे त्याला त्याचा स्वभाव बदलता येतो. यासाठी आवश्यकता असते ती केवळ स्वत:चा स्वभाव बदलण्याच्या इच्छाशक्तीची व जिद्दीची. आणि तो स्वभाव बदल्यासाठी गरज असते ती योग्य ज्ञानाची व मार्गदर्शनाची. ‘समुपदेशन’ हेच एकमेव औषध कानातून थेट मेंदूत जाऊन परिणाम करीत असते. यासाठी ‘कान ते मेंदू’ हा मार्ग मात्र स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. जोडीदाराविषयी असणारा आपल्यातील ‘अनरोमँटिकपणा’ दूर करता येतो. परिस्थिती स्वीकारून ती आनंदाने कशी घालवता येईल याचा विचार केला तर सर्वसामान्य दाम्पत्य आपल्यात रोमँटिकपणा आणू शकते. कारण ही एक कला आहे, ज्याला मी ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणतो. इतर कलांप्रमाणे ही कला आपण शिकू शकतो हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. ते कृतीतही आणले पाहिजे. नात्यामध्ये ‘अहं’च्या ‘आय’ला जर मुरड घालता आली तर जोडीदाराला ‘व्हिटॅमिन आय(इंटिमसी)’ आपण देऊ शकतो.
स्वपसंतीने केलेली बहुतांश अॅरेंज्डमॅरेज प्रकारातील लग्ने ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ने जिवंत ठेवता येतात. परंतु अर्थातच कामस्वास्थ्य दुर्लक्षित न करता.
थोडक्यात, इंटिमसीचे व सेक्सचे महत्त्व न नाकारता जगायला शिकणे हे दाम्पत्याला अत्यावश्यक असते. अन्यथा कामजीवनातील सुस्ती वैवाहिक जीवनात मरगळ आणू शकते. म्हणून ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ बरोबरच ‘आर्ट ऑफ फोरप्ले’ माहीत करून घेणे तेवढेच आवश्यक असते. सेक्सच्या भावनेला ‘एक्सपायरी डेट’ नसते, परंतु सेक्सच्या ‘क्रियाशक्ती’मध्ये समस्या येऊ शकते. अशा समस्या न ओळखल्यानेच त्या वर्षांनुवष्रे रेंगाळत राहतात व बहुतेकजण स्वत:ला सेक्समधून ‘रिटायर’ करून टाकतात.
यासाठी गरज असते केवळ सेक्सकडे विधायकपणे बघण्याची व स्वत:ची सेक्समधील क्रियाशक्ती सेक्शुअल फिटनेसने वाढवण्याची. नियमित ‘व्हिटॅमिन एस’ आणि ‘व्हिटॅमिन आय’ ही जीवनसत्त्वे सोडून जगातील इतर कुठलेही औषध कामस्वास्थ्य वाढवत नसते. सेक्सच्या समस्या या आजार किंवा रोग न मानता त्यांची उकल करण्यासाठी औषधे घेणे टाळावीत. ‘काउन्सेिलग’ व सेक्स थेरपी यांचाच उपयोग अशा वेळी होत असतो. डॉक्टरांनीही ‘सेक्स’बाबतचे काउन्सेिलग करून व इतर कुठलीही ‘सेक्स टॉनिक्स’ न देऊन (त्याच्या निरुपयोगीतेमुळे व अनावश्यक खर्चीकतेमुळे) समजासेवा करावी, असे मनापासून वाटते.    
shashank.samak@gmail.com

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…