सकाळी सूर्याला नमन करणे हा आपल्या संस्कृतीने घालून दिलेला अत्यंत सुंदर संस्कार आहे. प्रचंड ऊर्जेचा स्रोत असलेला, आपल्याला ज्ञात असलेला एकच सूर्य आहे; परंतु अनंत कोटी सूर्यमालिका या प्रचंड ब्रह्मांडात आहेत, असे विज्ञान व अध्यात्म या दोहोंचेही मानणे आहे. वाढत्या वयानुसार शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक अशा चारही पातळ्यांवर महत्त्वाचा असलेला समंत्र सूर्यनमस्कार घालण्यास मर्यादा असल्यास, सूर्यनमस्काराची प्रथम पायरी प्रणामासन आपण मागे पाहिला. आता दुसऱ्या पायरीचा अभ्यास करू या. दुसरा टप्पा आहे, हस्त उत्थानासन.
 हस्त उत्थानासन
हस्त उत्थानासन करण्यासाठी दंडस्थितीत दोन्ही पायांत अंतर घेऊन उभे राहा. आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर उचला. दोन्ही हात एकमेकांना समांतर राहू द्या. दोन्ही हातांमध्ये दोन खांद्यांइतकेच अंतर ठेवा. हात वर उचल्यावर शरीर आपल्या क्षमतेनुसार थोडेसे मागे झुकवा. आता मान वरच्या दिशेला वळवा. मानेच्या मणक्यांचे आजार असल्यास कृती अत्यंत सावधानतेने करा. या आसनाच्या सरावाने पाठकणा, पोटावरील त्वचा ताणली जाते. पोटातील अवयवांचे स्वास्थ्य, हात व खांद्यांचे स्नायू गळ्यातील सप्तपथ यांचे आरोग्य सुधारते. अंतिम स्थितीत दीर्घश्वसनाची आवर्तने केल्यास श्वसनक्षमता सुधारते.

कायद्याचे कार्यक्षेत्र आणि संकल्पना
या सदरातील मागील लेखात (२१ जून) आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा विशेष कायदा ‘कल्याण कायदा २००७’ व त्याच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. या मालिकेतील आजच्या या पहिल्या भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्राबाबत व संकल्पनांबाबत सविस्तर विवेचन पाहू या. हा कायदा संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मीरशिवाय) लागू असून असून प्रत्येक राज्य सरकारला राजपत्र काढून त्या तारखेपासून हा कायदा राज्यात लागू करण्यास सांगितले आहे. सदर कायद्याचा भाग-१ हा प्राथमिक स्वरूपाचा असून त्यामध्ये विविध संज्ञांच्या माध्यमातून पोटगीचा अर्थ, तो मागण्याचा हक्क, पोटगी कोणाकडून व काय स्वरूपात मागता येईल इ. बाबत सविस्तर माहिती दिली आहे.
या कायद्यात उद्धृत केल्याप्रमाणे ‘मुले’ या संज्ञेमध्ये पुत्र, पुत्री, नातू, नात यांचा समावेश होतो व यांच्याकडून पोटगी मागता येते, परंतु अल्पवयीन व्यक्तीकडून पोटगीचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांस नसतो. या कायद्यांतर्गत पोटगीमध्ये अन्न, वस्त्र, निवारा तसेच औषधोपचार व त्याच्या खर्च अंतर्भूत होतात. या कायद्यांतर्गत ‘पालक’ या संज्ञेमध्ये जन्म देणारे, दत्तक घेणारे अथवा सावत्र, मग ते ज्येष्ठ नागरिक असो वा नसो, यांचा समावेश होतो. म्हणजेच या कायद्यांतर्गत उपरोक्त सर्व लोकांना त्यांच्या पाल्याकडून पोटगीचा तसेच औषधोपचार आणि अन्न/वस्त्र/ निवाऱ्याच्या अधिकाराची मागणी करता येते. या कायद्यात दिल्याप्रमाणे
सज्ञान कायदा १८७५ प्रमाणे सज्ञान नसणाऱ्या व्यक्तीकडून मात्र अशा पोटगीचा अधिकार मागता येणार नाही.
प्रीतेश सी. देशपांडे – pritesh388@gmail.com

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

मोकळा वेळ आहे कुठे?
मला क्रिकेट खेळण्याची लहानपणापासूनच खूपच आवड होती; परंतु कौटुंबिक परिस्थितीमुळे मला त्या छंदाच्या ‘नादी’ लागणे जमले नाही. एखादे वाद्य तरी आपल्याला वाजवता आले पाहिजे, असे सारखे वाटत होते. वयाच्या सत्तरीपर्यंत काहीना काही कारणांमुळे त्यासाठीही वेळ देता आला नाही. त्यातही हार्मोनियम (बाजाची पेटी) वाजविण्याची आणि ते वाद्य शिकण्याची प्रचंड आवड, परंतु वेळ व कुटुंबाची जबाबदारी या गोष्टी त्या छंदाआड सतत येत होत्या. मात्र वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर आयुष्यात बराच स्थिर झालो आणि या छंदाविषयी गांभीर्याने विचार करू लागलो. यासाठी कोण्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावासा वाटला म्हणून मी श्रेष्ठ गायक- वादनकार विपुल कुर्लेकर यांच्याशी संपर्क साधला आणि विचारणा केली की, ७३ व्या वर्षी मला पेटी शिकता येईल काय?
 सल्ला होकारार्थी आला आणि मी त्यांच्याकडे पेटीवादनाचे शिक्षण घेऊ लागलो. चार महिने झाल्यानंतर थोडा खंड पडला आणि त्यानंतर मात्र डिसेंबर २०१३ पासून मला भूषण सामंत यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली आणि गेले वर्षभर मी नित्यनियमाने त्यांच्याकडे शिक्षण घेत आहे, थोडेफार जमते आहे याची मला खात्री आहे, मन लावून शिकतो, घरी सुमारे १ ते २ तास नियमित पेटीवर रियाज करतो, अशा तऱ्हेने छंद जोपासण्याचा आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे.
याशिवाय वृत्तपत्रात पत्र लिहिणे, लेख लिहिणे, कविता व कथा लिहिणे, वाचन करणे व जमेल तसे स्वत:ला सामाजिक कार्यात गुंतवून ठेवणे हेच आता माझ्या आयुष्यात ध्येय होऊन गेले आहे. या विविध छंदांमुळे मला वेळ कसा घालवावा, असा प्रश्नच कधी पडत नाही. गोरेगावमध्ये ब्राह्मण सेवा संघाचा ‘वधू-वर सूचक मंडळ’ हा उपक्रम चालू आहे. त्यामध्येही माझा सहभाग असतो.
या विविध छंदांमुळे मनाला समाधान व आनंद तर मिळतोच आणि विचारांना प्रगल्भता येण्यास खूप मदत होते, आपल्या ज्ञानात भर पडते ते वेगळेच. आयुष्याकडे संकुचित वृत्तीने बघण्याची सवय नष्ट होऊन विशालता प्राप्त होते आणि यामुळे लोकसंग्रह वाढीस लागण्यास हातभार लागतो. तेव्हा माझे सर्व ज्येष्ठ नागरिकांना असे सांगणे आहे की, त्यांनी असा जमेल तो छंद लावून घेऊन तो वाढविण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे आयुष्यात नैराश्य व एकलकोंडेपणा येण्याची भावना पार दूर पळून जाते. आयुष्यात सुख, शांती, समाधान व आनंद डोकावू लागतो. उर्वरित आयुष्य सुखात जगावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने काहीतरी छंद जोपासणे सुरू करावे व त्यापासून मिळणाऱ्या आनंदात यथेच्छ डुंबावे असे माझे मन मला सांगते.
रामचंद्र मेहंदळे

ही वाट दूर जाते..
  ‘नाना-नानी पार्क’ आता काही नवीन नाही राहिलंय! राहत्या अपार्टमेंटपासून ते नजीकच्या जॉगर्स पार्कपर्यंत एक छोटीशी जागा खास आजी-आजोबांसाठी राखून ठेवलेली असते. वजन कमी करणे आणि त्यासाठी नियमित चालणे अथवा व्यायाम करणे हे आता लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठीच जरुरी आहे. वजन कमी करण्यामागे कारणं काहीही असोत, पण मी कित्येक आजी-आजोबांना अगदी नियमित चालताना नेहमी बघते. कालच्या दिवसातल्या एकूण रुग्णांपकी सर्वात उत्साही रुग्ण म्हणजे अरोरा – वय वर्षे ८३. रोज २.५-३ किलोमीटर चालतात. ऐकून छान वाटलं!
चालताना पायात गोळे येणे किंवा पायाला मुंग्या येणे, थकवा जाणवणे किंवा गुडघे दुखणे किंवा ‘सोबत’ नसल्यामुळे चालण्यात आत्मविश्वास न वाटणे वगरे अडचणी येतात. पाऊस सुरू झाल्यावर तर आडकाठी येतेच. असो. तर मुद्दा असा आहे की, अडचणींवर मात कशी करता येईल (पाऊस सोडून)! इतर अनेक आहार तत्त्वांव्यतिरिक्त आज आपण थोडंसं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्व ‘ड’ विषयी बोलू या. संतुलित आहार तर जरुरी आहेच, पण त्याचबरोबर काही विशेष पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे जरुरी आहे. ‘सप्लिमेंट’ची गरज कितपत आहे ते प्रत्येक व्यक्तीनुसार आम्ही ठरवतो, पण आहारातून पौष्टिकता वाढवली तर एकंदरीत बराच फरक पडतो.
नियमित आहाराव्यतिरिक्त जरुरी पदार्थ  तुळस, वाळवलेली किंवा ताजी कोिथबीर, अळशीचे दाणे, सुका मेवा, भोपळा बिया, लोणी, दह्य़ातील पाणी (विरजणातील दह्य़ाची निवळी), हातसडीचा तांदूळ, जव, राजगिरा, काकवी, तीळ, हिरव्या पालेभाज्या.
मॅग्नेशियमविषयी आपण जास्त बोलत नाही. पण शरीरातील महत्त्वाच्या क्रियांसाठी मॅग्नेशियमची जरुरी असते- सर्वात महत्त्वाची क्रिया- ऊर्जानिर्मिती. म्हणूनच थकवा कमी करण्यासाठी, हातापायाच्या मुंग्या न येण्यासाठी वरील पदार्थ आवर्जून आहारामध्ये समाविष्ट करावेत- अर्थात आपली प्रकृती लक्षात घेऊनच!
ज्यूस –
कोिथबीर + गाजर + सफरचंद + पुदिना
तुळस, दालचिनी, पुदिना घातलेला ग्रीन टी
नाश्ता – काकवीमध्ये घोळवलेले शेंगदाणा लाडू, राजगिरा लाही + ताक, काजू, बदाम, अक्रोड चुरा, अळशी चटणी, भोपळा बिया, मुखवास, गायीचे तूप-मीठ घालून केलेला जिरेसाळ लाल भात.
मधल्या वेळी खाण्यासाठी –
 चारोळी १ चमचा, भोपळ्याच्या बिया १ चमचा, अळशीच्या बिया १ चमचा (थोडय़ाशा भाजून), ओवा १ चिमूट, बडीशेप १ चमचा, काळ्या मनुका २ चमचे, आवळा पावडर पाव चमचा, सर्व मिश्रण एकत्र करावे.
आपल्या मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी चालत राहा, घरात किंवा बाहेर, सकाळी किंवा संध्याकाळी..
वैदेही अमोघ नवाथे, आहारतज्ज्ञ – vaidehiamogh@gmail.com