|
|
|
 |
 |
|
क्रीडा
|
|
|
 |
|
|
सिडलचे पाच बळी; ऑस्ट्रेलियाला आघाडी
सिडनी, ५ जानेवारी / पीटीआय
पीटर सिडलने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यावर पकड मिळवून दिली. आज तिसऱ्या दिवशी सिडलच्या अचूक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा
पहिला डाव ३२७ धावात गुंडाळला आणि दिवसअखेर बिनबाद १३ धावांची मजल मारत एकूण १५१ धावांची आघाडी मिळवली. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मॅथ्यू हेडन (१८) आणि सायमन कटिच (९) खेळपट्टीवर होते.
त्याआधी, कालच्या १ बाद १२५ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३२७ धावात संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेतर्फे हशिम अमला (५१), मार्क बाऊचर (८९) आणि मोर्न मॉर्केल (४०) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. बौचर आणि मॉर्केल यांनी सहाव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ आज फलंदाजीला आला नाही. स्मिथच्या अनुपस्थितीत नील मॅकेन्झीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज पीटर सिडलने ५९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी मिळवले.
स्मिथने माघार घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मदार जॅक कॅलिसच्या (३७) कामगिरीवर अवलंबून होती पण, तो आज सुरुवातीलाच जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, अमलाने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर एकापाठोपाठ दोन फलंदाज बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद १६६ अशी अवस्था झाली. अब्राहम डिव्हिलियर्स (११) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यानंतर धावसंख्येत पाच धावांची भर पडली असता अॅन्ड्रय़ू मॅक् डोनाल्डने अमलाला माघारी परतवत पहिला कसोटी बळी नोंदवला. डय़ुमिनीला (१३) लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ५ बाद १९३ अशी अवस्था असताना बाऊचर आणि मॉर्केल या जोडीने शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला तीनशेपार मजल मारून दिली. बाऊचर सुदैवी ठरला. हॉरित्झने बाऊचरचा बचाव भेदण्यात यश मिळवले आणि चेंडू यष्टीला लागला पण, बेल्स पडली नाही. बेल्स पडण्यासाठी मदत होईल म्हणून मॅथ्यू हेडन आणि ब्रॅड हॅडिन यांनी त्यांच्या स्थानावर उडय़ा मारल्या पण, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. मॉर्केलही सुदैवी ठरला. जॉन्सनचा चेंडू यष्टीला चाटून गेला पण, बेल्स पडली नाही. बाऊचरच्या ८९ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४४५.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव :- नील मॅकेन्झी पायचित गो. सिडल २३, ग्रॅमी स्मिथ रिटायर्ड हर्ट ३०, हशिम अमला पायचित गो. मॅक् डोनाल्ड ५१, जॅक्वेस कॅलिस झे. हेडन गो. जॉन्सन ३७, ए.बी. डिव्हिलियर्स धावचित ११, जीन पॉल डय़ुमिनी पायचित गो. जॉन्सन १३, मार्क बाऊचर त्रि. गो. सिडल ८९, मोर्न मॉर्केल त्रि. गो. सिडल ४०, पॉल हॅरिस पायचित गो. सिडल २, डेल स्टेन त्रि. गो. सिडल ०६, मखाया एनटिनी नाबाद ०. अवांतर (लेगबाईज १२, वाईड ९, नोबॉल ४) २५. एकूण १२०.५ षटकांत सर्वबाद ३२२. बाद क्रम : १-७६, २-१३१, ३-१६१, ४-१६६, ५-१९३, ६-३०८, ७-३१०, ८-३१६, ९-३२७. गोलंदाजी : सिडल २७.५-११-५९-५, बोलिंगर २३-४-७८-०, जॉन्सन २८-६-६९-२, मॅक्डोनाल्ड २२-८-४१-१, हॉरित्झ २०-४-६८-०.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव :- मॅथ्यू हेडन खेळत आहे १८, सायमन कॅटिच खेळत आहे ०९. अवांतर (लेगबाईज ६) ६. एकूण ६ षटकांत बिनबाद ३३. गोलंदाजी : स्टेन ३-०-१७-०, एनटिनी ३-०-१०-०. |
|
|
|
 |