पाकिस्तानात सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या निदर्शकांच्या हत्येबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
निदर्शकांच्या हत्येबद्दल शरीफ आणि अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिल्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
शरीफ यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेला हा फौजदारी स्वरूपाचा दुसरा गुन्हा आहे.शरीफ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी पाकिस्तान अवामी तेहरिक (पीएटी) पक्षाचे नेते ताहिरुल कादरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
कादरी आणि इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला होता त्या वेळी पोलीस आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीत तीन निदर्शक ठार झाले तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते.