पाकिस्तानात वायव्य भागात भूकंपाचे धक्के बसले असून त्यात १५ जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर होती. इस्लामाबाद, रावळपिंडी, मनशेरा, मुरी, अबोटाबाद, स्वात, हरिपूर, मलकंद, नौशेरा, शांगला हिल, बट्टाग्राम येथे हे धक्के जाणवले.
भूकंपाने मातीची कच्ची घरे कोसळून पाचजण जखमी झाले आहेत. बट्टाग्राम येथे मातीचे घरे कोसळून नऊ जण जखमी झाले असून, सहा जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारण तीन ते पाच सेकंद हा भूकंप जाणवला असून त्याचे केंद्र ३२ मीटर खोलीवर होते.