जयपूरमधील विविध हातमाग कारखान्यांत काम करत असलेल्या एकूण १७६ बालकामगारांची सुटका करून त्यांना गुरुवारी पाटणा येथे आणण्यात आले. बिहार सरकारचे काही अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांना पाटणामध्ये आणले. हे सर्व बालकामगार ७ ते १६ वयोगटातील आहेत. राजस्थान पोलिसांचे मानव तस्करीविरोधी पथक आणि जयपूर जिल्हा बालसुरक्षा पथकाच्या मदतीने या बालकामगारांची कारखान्यांतून सुटका करण्यात आली.