दिल्ली आणि परिसरात १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आणखी ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
इंदिरा गांधींचे मारेकरी शीख असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीत हिंसक दंगल पेटली होती. या दंगलीमध्ये तब्बल ३३२५ शिखांचा बळी गेला होता. अन्य बळी उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये गेले होते.
या सगळ्यांच्या निकटच्या नातेवाईकांना आणखी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना आजवर मिळालेल्याोभरपाईव्यतिरिक्त ही रक्कम मिळणार आहे.केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून या शीखविरोधी दंगलग्रस्तांकडून अनेक निवेदने सादर करण्यात आली होती. योगायोग म्हणजे  अधिकची भरपाई देण्याचा निर्णय इंदिराजींच्या ३० व्या पुण्यतिथीदिनीच आला आहे.