केरळमधील २९ परिचारिकांची एक तुकडी शनिवारी इराकमधून मायदेशी परतली. या परिचारिका इराकच्या बकुबा सर्वसाधारण रुग्णालयात सेवेत होत्या.
परिचारिकांची ही तुकडी प्रथम शारजाह येथे आणि तेथून कोची येथे परतली, असे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. बॉम्बस्फोटांचे कानठळ्या बसविणारे आवाज आम्हाला ऐकावयास येत होते; परंतु रुग्णालयात आम्हाला कोणतीही काळजी नव्हती, असे एका परिचारिकेने सांगितले.कर्ज काढून तीन महिन्यांपूर्वीच आपण इराकला मोठय़ा अपेक्षेने गेलो होतो. मात्र तेथील स्थितीमुळे मायदेशी परतावे लागले, असे एका परिचारिकेने सांगितले.
इराकमध्ये ‘इसिस’ दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या ४६ परिचारिका ५ जुलै रोजी मायदेशात आल्या, त्यांपैकी ४५ जणी केरळच्या, तर एक तामिळनाडूतील होती. या परिचारिकांच्या पुनर्वसनासाठी केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलाविली होती.