सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेली गरिबीची व्याख्या सी. रंगराजन यांच्या समितीने फेटाळून लावली. देशातील २०११-१२ या वर्षांत गरिबांचा आकडा हा एकूण लोकसंख्येच्या २९.५ टक्के इतका होता, म्हणजेच प्रत्येक १० जणांमध्ये ३ व्यक्ती या गरीब असल्याचे या समितीने स्पष्ट केले.
यापूर्वी रंगराजन समितीने नियोजन मंत्री राव इंद्रजित सिंह यांना सादर केलेल्या अहवालानुसार शहरात दिवसाला ४७ रुपयांहून कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब
मानली गेली. सुरेश तेंडुलकर समितीने दिवसाला हा खर्चाचा आकडा ३३ रुपये निश्चित केला होता.