ईशान्य म्यानमारमध्ये प्रवाशांनी खच्चून भरलेली दुमजली बोट सागरात बुडाल्याने ३३ जण मृत्युमुखी पडले असून अनेकजण बेपत्ता आहेत. मदतकार्य करणाऱ्यांनी १६७ जणांना सागरातून वाचवले आहे.
आंग तागुन ३ ही बोट रखाइन राज्यात होट मेबोन येथे बुडाली. म्यानमार रेडक्रॉस आपत्ती व्यवस्थापन प्रमुख माँग माँग खिन यांनी सांगितले की, वाचवण्यात आलेल्या अनेकांना घरी जाऊ देण्यात आले. या घटनेत ३३ जण मरण पावले असून आणखी काही बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे. म्यानमारच्या माहिती मंत्रालयाने सांगितले की, ५० जण बेपत्ता आहेत.