अमृतसरमधील एका व्यक्तीच्या पोटातून शस्रक्रिया करुन तब्बल ४० चाकू बाहेर काढण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून ही व्यक्ती चाकू खात होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर पाच डॉक्टरांनी तब्बल  पाच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही  शस्रक्रिया यशस्वी केली. शस्रक्रिया करणाऱ्या डॉ. जितेंद्र मल्होत्रा यांनी माझ्या कारकिर्दीतील भयानक शस्रक्रिया असल्याचे सांगितले. शस्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याने प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. मला चाकू खायची इच्छा होत असल्यामुळे मी ते खात गेलो, अशी प्रतिक्रिया सुरजित सिंह याने दिली आहे.


पोलिस विभागात कार्यरत असलेला सुरजित सिंह याने गेल्या दोन महिन्यात २८ चाकू गिळून टाकले होते. विशेष म्हणजे एवढे चाकू पोटात असूनही तो जिवंत राहिला. दरम्यान पोटात वेदना आणि वजन कमी होत असल्याची तक्रार करत तो रुग्णालयात दाखल झाला. डॉक्‍टरांनी त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करून त्यातून ४० चाकू बाहेर काढले. याबाबत शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर जितेंद्र मल्होत्रा यांनी माहिती दिली.