पाकिस्तानमधील बलूचिस्तानला आज (शनिवार) सकाळी पुन्हा एकदा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी मोजण्यात आली आहे. तसेच या भूकंपाचे झटके राजधानी दिल्लीतही जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंध आणि बलूचिस्तान भागात भूकंप झाला असून अवारानपासून उत्तरेला ९६ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अद्याप तरी कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

 

(संग्रहित छायाचित्र)