राजधानी दिल्लीच्या काही भागांमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान जपानमध्ये किनारी भागात ७.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. दरम्यान, सुनामीचा कुठलाही धोका नसल्याचे पॅसिफिक सुनामी इशारा केंद्राने सांगितले. सायंकाळी साडेआठ वाजता हा भूकंप झाला तेव्हा निवासी इमारती हादरल्या, पण नुकसानीचे वृत्त नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली ६७६ कि.मी.वर भूकंपाचे केंद्र होते. पॅसिफिक  महासागरात टोकियोच्या दक्षिणेला ८७० कि.मी. अंतरावर हे केंद्र होते, पण ते फार खोलीवर असल्याने सुनामी लाटांचा धोका कमी होता. भूकंप केंद्राच्या नजीक चिचिजिमा येथे अतिथिगृह चालवणारे योशियुकी सासामोटो यांनी सांगितले, की भूकंपाचा हादरा खूप मोठा
होता.
दरम्यान, दिल्लीमधील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पण या भूकंपामध्ये कोणतीही वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.