उत्तर काश्मीरमधील कू पवाडा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी झालेल्या धुमश्चक्रीत एक दहशतवादी ठार झाला, कालपासून तीन चकमकीत एकूण सात दहशतवादी मारले गेले आहेत. शुक्रवारी कूपवाडा जिल्ह्य़ात चकमक झाली असून त्यात एक दहशतवादी मारला गेला. आतापर्यंत तीन चकमकीत सात दहशतवादी मारले गेले. काल याच जिल्ह्य़ातील लोलाब भागातील डोबवान जंगलात चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. काल सायंकाळी येथील एका जंगलात तीन दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, सुरक्षा दलांनी आज स्फोटक पदार्थ शोधून मोठा अनर्थ टाळला. पाच किलो वजनाची आइडी स्फोटके राइस कुकरमध्ये ठेवली होती. श्रीनगर येथे हैदरपोरा भागात आज सकाळी पोलिसांनी ती शोधून काढली, असे पोलिसांनी सांगितले.