आधार कार्ड प्रकल्पावर आतापर्यंत सरकारने ५,६३० कोटी रुपये खर्च केले असून ७८ कोटी ६५ लाख लोकांना आधारकार्डाचे वाटप करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली.
सन २००९ ते २०१७ दरम्यानच्या कालावधीत ही योजना राबविण्यासाठी १३ हजार ६३३.२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून उपरोक्त रक्कम २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत खर्च करण्यात आल्याचे नियोजनमंत्री इंद्रजित सिंग यांनी लोकसभेत सांगितले. १० मार्च २०१५ या तारखेपर्यंत ७८ कोटी ६५ लाख नागरिकांना आधारकार्डे देण्यात आल्याचे ते म्हणाले.