आम आदमी पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह शनिवारी थेट हाणामारीवर आला. आम आदमी पक्षाने (आप) आज सकाळी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा  व्हिडिओ जाहिर केली आहे. प्रचंड गदारोळ, जोरदार घोषणाबाजी या बैठकीत करण्यात आली होती. राष्ट्रीय परिषदेत प्रा. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आगमन होताच बैठक सुरू झाली होती. साधारण तासाभरानंतर केजरीवाल बैठकीतून बाहेर पडले. त्यांच्या अनुपस्थितीत गोपाल राय यांनी बैठकीची सूत्रे हाती घेत यादव व भूषण यांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर झालेल्या गोंधळातच सिसोदिया यांनी यादव व भूषण यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली.
सदर व्हिडिओ ट्विटरवर प्रदर्शित करण्यात आला आहे.