सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा देण्यासाठी शहरात धावणाऱ्या बसगाडय़ांमध्ये २५०० मार्शल्स तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दल व नागरी संरक्षण दलाच्या जवानांना मार्शलचे प्रशिक्षण देण्यात येत असून दिल्ली परिवहन महामंडळाच्या व ऑरेंज बसगाडय़ात त्यांना तैनात करण्यात येणार आहे.
वाहतूक मंत्री गोपाळ राय यांनी सांगितले की, हे जवान ३-४ च्या गटाने बसगाडय़ांमध्ये गस्त घालतील, त्यांना वॉकी टॉकी देण्यात येत असून एकमेकांशी ते बोलू शकतील. बसमध्येच ते गुन्ह्य़ांचा बीमोड करतील. एक मार्शल तैनात करून फायद्याचे नाही तयमुळे आम्ही त्यांना गटाने तैनात करणार आहोत.
सरकारने डीटीसी बसगाडय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे ठरवले असून पहिल्या टप्प्यात २०० गाडय़ांमध्ये ते बसवले जातील.