कांद्याचे दर कमालीचे वाढलेले असताना दिल्लीकरांना कमी दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱया केजरीवाल सरकारचा ‘प्रताप’ माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. महागाई कमी करण्याचा नारा देत दिल्ली सरकार ना नफा ना तोटा तत्त्वार ३० रुपये किलो दराने कांद्याची विक्री करीत आहे. पण हा कांदा सरकारने १६ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारवर आता सर्वत्र टीका सुरू झाली आहे.
दिल्लीकरांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्याची घोषणा करीत आप सरकारने ४० रुपये प्रतिकिलोने खरेदी केलेला कांदा १० रुपयांची सवलत देऊन जनतेला ३० प्रतिकिलो दराने विकत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीतून ‘आप’चे गौडबंगाल समोर आले आहे. मात्र, आपकडून हे सर्व दावे फेटाळून लावण्यात आले असून प्रत्युत्तरात जनतेच्या फायद्याकरीता आम्ही सबसिडीवर कांदा बाजारात आणल्याचा खुलासा दिल्लीचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री असिम अहमद खान यांनी केला आहे