सत्तेवर येण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांना खूश करण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षाने आज घोषित केलेल्या जाहीरनाम्यात चोवीस तास वीजपुरवठा करणे व शहरात मोफत वाय-फाय सुविधा पुरवणे यासारख्या आश्वासनांची खैरात केली आहे.
हा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून पक्षाचा ‘गीता, बायबल, कुराण व गुरू  ग्रंथसाहेब’ आहे आणि सत्तेवर आल्यास त्यातील सर्व मुद्दय़ांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

ठळक बाबी
*‘परवडणाऱ्या दरात’ चोवीस तास वीजपुरवठा
*शहरात मोफत वाय-फाय सुविधा
*महिलांच्या सुरक्षिततेसाठी किमान १० लाख सीसी टीव्ही कॅमेरे
*पाणी मिळणे हा कायदेशीर हक्क
*‘व्हॅट’ रद्द करणार