तुमच्या पक्षाच्या सदस्यांची लोकसभेतील संख्या दिल्लीतील तापमानापेक्षाही कमी आहे, असा टोमणा आम आदमी पार्टीचे (आप) खासदार भगवंत मान यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाला मारला आणि सभागृहात हास्यस्फोट झाला. दिल्लीत ४९ दिवस आपचे सरकार होते त्या सरकारच्या कारभारावरून काँग्रेस आणि आपच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली होती. त्यानंतर भगवंत मान यांनी वरील टोमणा मारल्याने सभागृहात हास्यस्फोट झाला. दिल्ली अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे सदस्य दीपेंद्रसिंग हुडा यांनी भाजप सरकारवर टीका केली. सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नाही तर भाजपची अवस्था आपसारखी होईल, असे हुडा म्हणाले. त्यामुळे भगवंत मान यांनी काँग्रेसला टोमणा मारला.