आम आदमी पार्टीचे (आप) दिल्ली विभागाचे सचिव दिलीप पांडे यांना अटक केल्याबद्दल आपने भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशाच्या राजधानीत भाजप गुजरातसारखा कारभार करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका आपने केली आहे.गुजरातमध्येही विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला, असे आपच्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य संजय सिंग यांनी म्हटले आहे.जनतेला चिथावणी दिल्याच्या आणि काँग्रेसच्या आमदाराविरोधात पोस्टर्स लावल्याच्या आरोपावरून पांडे आणि अन्य चार जणांना पोलिसांनी अटक केली. पांडे यांना कोणत्याही ठोस पुराव्याविनाच अटक करण्यात आली, असे सिंग म्हणाले. दिलीप पांडे यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली, असे मनीश सिसोदिया म्हणाले. दरम्यान काँग्रेस आमदाराच्या विरोधात प्रक्षोभक फलक लावून जनतेला चिथावणी दिल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना २ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली सरचिटणीस दिलीप पांडे, रामकुमार झा आणि जावेद अहमद यांचा समावेश आहे.
‘आप’च्या तीन कार्यकर्त्यांना कोठडी
काँग्रेस आमदाराच्या विरोधात प्रक्षोभक फलक लावून जनतेला चिथावणी दिल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना २ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली सरचिटणीस दिलीप पांडे, रामकुमार झा आणि जावेद अहमद यांचा समावेश आहे. भाजप विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आपने केली आहे.