मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका किशोरवयीन मुलीवर अ‍ॅसिड फेकले त्यात ती गंभीर जखमी झाली आहे असे पोलिसांनी सांगितले. ही एका पोलीस हेडकॉन्स्टेबलची मुलगी असून सतरा वर्षांची आहे.
तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. ती अकरावीत शिकत असून एका शोरूममध्ये पार्टटाइम काम करते.
जेव्हा ती कामाच्या ठिकाणाहून सुरिंदरनगर वसाहतीतील तिच्या घरी जात होती तेव्हा तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयितांना पकडण्यासाठी सर्वत्र शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ही मुलगी बोलण्याच्या अवस्थेत नसून हे तरुण तिच्या मागावर होते किंवा काय हे तिच्या कुटुंबीयांनाही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.