२०१४ हे वर्ष सर्वार्थाने नरेंद्र मोदींचे ठरले असून त्यांच्या या वाटचालीत लोकप्रिय घोषणा आणि संज्ञांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. ‘एबीसीडी’ ( आदर्श, बोफोर्स, कोल स्कॅम आणि दामाद) या संज्ञेने मोदींनी यावर्षीच्या निवडणूक प्रचारची धडाक्यात सुरूवात झाली आणि मागील आठवड्यात झालेल्या मेक इन इंडिया कार्यशाळेत पुन्हा एकदा ‘एबीसीडीचा’ (अव्हॉईड, बायपास, कन्फ्युज, डिले) उल्लेख करत मोदींनी वर्षाची यशस्वी सांगता केली. जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी नरेंद्र मोदींनी वापरलेल्या अशाच काही चटकदार आणि लक्षवेधी संज्ञांचा घेतलेला हा आढावा.

आरएसव्हीपी- यंदाच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी वारंवार गांधी घराण्याला लक्ष्य केले. संपूर्ण गांधी घराण्याचा एकाचवेळी उल्लेख करण्यासाठी त्यांनी ‘आरएसव्हीपी’ (राहुल, सोनिया, वढेरा, प्रियांका) या संज्ञेचा वारंवार उपयोग केला.

सबका- उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींनी जनतेला काही राजकीय पक्षांची भ्रष्ट राजवट उखडून टाकण्याचे आव्हान केले. यामध्ये ‘सबका’ (सपा, बसपा, काँग्रेस) यांची अभद्र युती जनतेला नाकारण्याचा सल्ला मोदींनी दिला.

एके ४७  आणि एके ४९- माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टोनी यांचा उल्लेख करण्यासाठी मोदींनी ‘एके 47’ या मजेशीर संज्ञेचा वापर केला. तर नवी दिल्लीत केवळ 49 दिवसांचे सरकार चालवणाऱ्या आपच्या अरविंद केजरीवाल यांचा ‘एके 49’ असा उपहासात्मक उल्लेख मोदींनी प्रचारादरम्यान केला.

फोर पी- सरकारच्या कारभार सुधारणा आणण्यासाठी ‘पीपीपीपी’ (पीपल, प्रायव्हेट, पब्लिक पार्टनरशिप) गरजेचे असल्याचा उल्लेख नरेंद्र मोदी वारंवार आपल्या भाषणातून करत असतात.

स्मार्ट- देशातील सुरक्षेव्यवस्थेविषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी ‘स्मार्ट’ या संज्ञेचा उपयोग केला होता. ‘एसएमएआरटी’ म्हणजे स्ट्रिक्ट बट सेन्सेटिव्ह, मॉर्डन अॅण्ड मोबाईल, अलर्ट अॅण्ड अकांऊटेबल, रिलायबल अॅण्ड रिस्पॉन्सिव्ह, टेक सॅव्ही अॅण्ड ट्रेन असे पोलिस दल आपल्याला अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मॉम- यंदा भारतीय अंतराळ संस्थेचे (इस्त्रो) यान यशस्वीपणे मंगळावर उतरले होते. या यशानंतर ‘मास ऑर्बिटर मिशन’ या मोहिमेचा उल्लेख ‘मॉम’ (आई) असा करत, ती आपल्याला कधीच निराश करत नसल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले होते.

एनडीए- लोकसभा निवडणुकीत भाजप आणि घटकपक्षांच्या युतीचा उल्लेख करताना मोदींनी नॅशनल डेव्हलपमेंट अलायन्स(एनडीए) या संज्ञेचा वापर केला होता.

थ्री एस- मोदींनी वापरलेल्या लोकप्रिय संज्ञांपैकी ‘थ्री एस’ ही आणखी एक संज्ञा. चीनसारख्या देशांशी स्पर्धा करायची असेल तर भारताला स्किल, स्केल, स्पीड यांनी परिपूर्ण असलेल्या तरूण मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले होते. याशिवाय, सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पाचा उल्लेख त्यांनी समावेश, सर्वदेशक, सर्वस्पर्शी असा केला होता.

पी2जी2- नरेंद्र मोदींनी आपल्या सरकारचा उल्लेख ‘प्रो पीपल गुड गर्व्हनस’ असा केला होता.

बी2बी- नरेंद्र मोदी भुतानच्या दौऱ्यावर गेले असताना भारत आण भुतान यांच्यातील संबंधांचा उल्लेख करताना मोदींनी ‘भारत टू भुतान’ (बी2बी) ही संज्ञा वापरली होती.