जीनिव्हातील एचएसबीसी बँकेतील खात्यात ज्यांच्या नावावर ठोस रकमा आहेत त्यांच्यावर खटले भरण्याची कारवाई प्राप्तिकर विभागाने सुरू केली आहे. प्राप्तिकर खात्याने अर्थमंत्रालयाला पत्र लिहिले असून, नेमकी किती रक्कम असलेल्यांवर करचुकवेगिरीसंदर्भात कारवाई सुरू करायची, याची विचारणा केली आहे. ज्यांच्या खात्यावर पाच कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम आहे त्यांच्यावर खटले भरले जाण्याची दाट शक्यता आहे. फ्रान्स सरकारने जून महिन्यात जीनिव्हातील एचएसबीसी बँकेत खाती असलेल्या लोकांची व त्यांच्या नावावर असलेल्या रकमेची यादी भारताला दिली आहे.