तालिबान ही संघटना भयानक आहे पण दहशतवादी गट नाही, असा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेने असे म्हटले आहे की, इसिस व अल काईदा यांच्याप्रमाणे त्यांनी जगभरात कारवाया केलेल्या नाहीत तर त्यांच्या दहशतवादी कारवाया अफगाणिस्तानपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.
 अफगाणिस्तानी तालिबान हे सशस्त्र बंडखोर आहेत या भूमिकेचे समर्थन करताना अमेरिकेचे प्रसिद्धी सचिव जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले की, अमेरिकी सैन्य दलातील सदस्यांनी तालिबानशी लढाईत प्राणार्पण केले आहे कारण ते अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हिताला धोका निर्माण करीत होते. तालिबान दहशतवादासारख्याच कारवाया करते पण ते त्यांचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी दहशतवादी हल्ले करतात असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले.
उपप्रसिद्धी सचिव एरिक शुल्टझ यांनी सांगितले होते की, तालिबान हा सशस्त्र बंडखोरीचा लढा आहे. इसिस म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट हा दहशतवादी गट आहे.
अमेरिकने तालिबानला दहशतवादी न ठरवण्यामागे वेगळेत कारण असून त्यांच्या नेत्यांविरोधात आर्थिक र्निबध लादण्यासाठी हा आम्ही नवीन युक्तिवाद तयार केला आहे, पण हे तितकेच खरे आहे की, तालिबान व अल काईदा यांच्यात फरक करणे गरजेचे आहे. तालिबानने दहशतवादी कारवाया केल्या आहेत, पण त्या अफगाणिस्तानपुरत्या मर्यादित आहेत. तालिबान ही घातक संघटना आहे व अफगाण सरकारचे अध्यक्ष सुरक्षा दलेही तयार करीत आहेत व तालिबानशी लढत आहेत. अल काईदापेक्षा त्यांचे डावपेच वेगळे आहेत ते अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमेपलीकडचे नाहीत.
एका प्रश्नावर अर्नेस्ट यांनी सांगितले की, पाकिस्तानी तालिबान हे अफगाण तालिबानचे मित्र आहेत. त्यांच्यावर र्निबधासाठी आम्ही जरूर प्रयत्न केले आहेत पण ते अल काईदापेक्षा वेगळे आहेत.