किशोरवयीन कृष्णवर्णीय मुलावर अत्यंत निर्घृणरीत्या गोळीबार करून त्याला ठार केल्यावरून अमेरिकेतील फर्गसन शहरात पोलीस आणि निदर्शकांमध्ये उसळलेला संघर्ष अद्यापही सुरूच आहे. मंगळवारी निदर्शक आणि पोलीस एकमेकांना भिडले. परिस्थिती हाताबाहेर जाईल, या भीतीने राष्ट्रीय सुरक्षा जवानांना पाचारण करण्यात आले; परंतु त्यांनी यात तत्काळ हस्तक्षेप करणे टाळले. अखेर बेभान झालेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. सोमवारी निदर्शक पुन्हा रस्त्यावर उतरले. त्यामुळे पोलिसांनी जागोजागी शस्त्रसज्ज वाहने उभी केली. या वेळी निदर्शकांनी पोलिसांच्या दिशेने काचेच्या बाटल्या फेकल्या. या वेळी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात किमान दोघांना गोळ्या लागल्या आहेत, अशी माहिती फर्गसन येथील सुरक्षा अधिकारी कॅप्टन रॉन जॉन्सन यांनी दिली. या वेळी ३१ जणांना अटक करण्यात आली. निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत चार अधिकारी जखमी झाले आहेत.

मुलगा शरण आला होता..
गोळीबारात ठार झालेला १८ वर्षांचा ब्राऊन हा पोलिसांसमोर शरण आला होता. त्याच्यावर गोळीबार करण्यात आला, तेव्हा त्याने आपले हात वर केले होते व त्याची त्याची पाठ पोलिसांच्या दिशेने होती. कारण शवविच्छदेन अहवालात त्याच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याचे स्पष्ट झाले.