24 October 2017

News Flash

असा झाला अफजल गुरुचा फाशीपर्यंतचा प्रवास

संसदेवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरुला शनिवारी सकाळी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अफजल

नवी दिल्ली | Updated: February 9, 2013 10:05 AM

संसदेवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरुला शनिवारी सकाळी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अफजल गुरुला न्यायालयाने दोषी ठरविण्यापासून ते त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास असा घडला.
घटनाक्रम
१८ डिसेंबर २००२ –
दिल्लीतील न्यायालयाने अफजल गुरुला संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दोषी ठरविले. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला करण्याचा कट अफजल गुरुनेच आखल्याचा आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले.

२९ ऑक्टोबर २००३ – दिल्ली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

४ ऑगस्ट २००५ – सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय़ कायम ठेवला आणि अफजल गुरुची याचिका फेटाळली.

२० ऑक्टोबर २००६ – या दिवशी अफजल गुरुला फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्याच्या पत्नीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्यांतर फाशीच्या अमलबजावणीला स्थगिती देण्यात आली.

२३ जानेवारी २०१३ – अफजल गुरुला फाशी देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली.

२६ जानेवारी २०१३ – राष्ट्रपतींनी अफजल गुरुचा दयेचा अर्ज फेटाळला आणि फाशीची शिक्षा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ कायम ठेवला.

First Published on February 9, 2013 10:05 am

Web Title: afzal gurus journey from parliament attack to hanging