दिल्लीहून भुवनेश्वरकडे निघालेल्या एअर इंडियाच्या एअरबस विमानाचे मंगळवारी लखनौ विमानतळावर ‘इमर्जन्सी लॅंडिंग’ करण्यात आले. विमानाच्या बाजूच्या काचेच्या आवरणाला तडा गेल्याचे लक्षात आल्यावर वैमानिकाने पुढील धोका टाळण्यासाठी लखनौ विमानतळावर ‘इमर्जन्सी लॅंडिंग’ केले. यावेळी विमानात एकूण १६९ प्रवासी होते आणि ते सर्व सुखरुप असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
लखनौ विमानतळाचे संचालक एस. सी. होटा म्हणाले, भुवनेश्वरकडे निघालेल्या या विमानाच्या मागील बाजूस असलेल्या एका काचेला तडा गेल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर वैमानिकाने सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी लखनौमधील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. यावेळी विमान मध्य प्रदेशातील खजुराहोजवळ होते. वैमानिकाने लखनौ विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी मागितली. त्यांना लगेचच परवानगी देण्यात आली. दुपारी १२.३७ वाजता या विमानाने लखनौ विमातळावर ‘इमर्जन्सी लॅंडिंग’ केले.